महत्वाच्या पोस्ट


जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। 

         'Guest Writer' ही सुविधा सुरू करून देऊन स्पर्धापरीक्षा तयारी मध्ये आमुलाग्रह बादल करण्याचे आमचे उद्दिष्ट्ये आहे. केवळ पुस्तकी अभ्यास करण्याचे दिवस आता संपले हे आयोगाच्या या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाहून समजलेच असेल. कोणत्याही विषयाची तयारी करताना जर ती एखाद्याला समजाऊन सांगण्याच्या हेतूने केली गेली तर तो विषय जास्त समजतो आणि ते 'ज्ञान' आपले होण्यास मदत होते.

'स्वाध्याय मार्ग' 

 स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे तरुण-तरुणी हे किमान वयाची १८-१९ वर्षे पूर्ण केलेली असतात. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास स्वतःचा स्वतः करता आला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले वाचन, लेखन, शंकांचे निरसन करून घेणे, नोट्स काढणे, विषयाची पोपटपंची न करता तो समजण्यावर भर देणे, समजलेला विषय स्वतःच्या नेमक्या शब्दांमध्ये मांडता येणे ही सगळी स्वाध्याय कौशल्ये आहेत. ती सुधारण्यासाठी तसेच एकूणच व्यक्तिमत्व विकसनासाठी 'Guest Writer' ही सुविधा खूप उपयोगी पडेल यात शंकाच नाही.

कार्यपध्दती 


 विषयाची निवड : 

  •  सामाजिक, संस्कृतिक, विज्ञान, आर्थशास्त्र, इतिहास, चालू घडामोडी, राजकारण यांसारख्या कोणत्याही विषयावरील(Anything under the Sun) लेखांचे स्वागत आहे. 
 मार्गदर्शक तत्वे : 

  • लेखांची भाषा ही 'मराठी' असणे आवश्यक आहे. 
  • सुलभ मराठी टायपिंग साठी खलील लिंक्स चा वापर करावा.
  1. India Typing 
  2. Google Marathi Typing 

  • प्रश्नमंजुषा सोडून इतर लेख हे कमीत कमी ५०० शब्दांचे असावेत. 
  •  लेख हे स्वतःच्या शब्दांमध्ये असावे इतर वेबसाइट वरील कॉपी केलेले नसावे. 
  • लेखाचे श्रेय देण्यासाठी शेवटी आपले नाव आणि फेसबूक किंवा इतर सोशल मीडियाचा पत्ता दिला जाईल. 
  •  'Guest Writer' बनण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी आपले नाव व लेखनाचा विषय 'Contact Us' या पेज मध्ये लिहून संपर्क साधावा. 
  • लेख तपासण्याचा, सुधारण्याचा तसेच प्रकाशित करण्याचे सर्व हक्क ONLINE MPSC GUIDANCE च्या व्यवस्थापकांकडे असतील. 
  • पुढील माहिती आपणास ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
  • आपल्या शंका खलील 'Comment Section' मध्ये विचारा.

2 comments:

  1. Will you accept one post from my end?
    From Admin- www.mpsccurrent.blogspot.in
    (All @ MPSC)

    ReplyDelete

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.