महत्वाच्या पोस्ट

प्रारंभ

         महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या परीक्षा घेते त्या स्पर्धा परीक्षा असतात.स्पर्धापरीक्षा आणि विद्यापीठीय परीक्षा यांमध्ये फरक असतो. विद्यापीठीय परीक्षांमध्ये पास होण्यासाठी मिनिमम गुण ठरलेले असतात.(३५% किवा ४०%) परंतु स्पर्धापरीक्षांमध्ये असे नसते. स्पर्धापारीक्षेमध्ये परीक्षेला बसलेल्या उमेदवारांमध्ये स्पर्धा असते. उदा. समजा ६०० जागांसाठी परिक्षा घेण्यात येत असेल आणि परिक्षेसाठी ६०००० उमेदवारांनी आर्ज भरला तर ६०००० उमेदवारांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ६०० टोपर्समध्ये येण्यासाठी स्पर्धा असते.(विद्यापीठीय परीक्षेमध्ये ४०% गुण मिळवले कि विद्यार्थी पास समजला जातो.)
    आता MPSC च्या तयारीला सुरवात करताना सर्वप्रथम खालील बाबींचा विचार करावा:
   
 १) सिल्याबस:- अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी परीक्षेचा सिल्याबस पाहावा त्यामुळे आपल्याला परीक्षा देण्यासाठी कशाकशाचा अभ्यास करायचा आहे याची idea येते.सिल्याबस तोंडपाठ करावा जेणेकरून सिल्याबस व्यतिरिक्त अभ्यास करण्यात वेळ वय जाणार नाही.(अर्थात वेळ असेल तर कशाचाही अभ्यास करण्यात हरकत नाही)
   
 २) पुस्तके:- सिल्याबस पाहिल्यावर त्यांवरील पुस्तके गोळा करण्यास सुरवात करावी.(Book List पुढील post मध्ये देईल)MPSC च्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यस करताना त्या परीक्षेसाठीचे आपल्याला आवडेल त्या प्रकाशनाचे सर्वसमावेशक गाईड अवश्य घ्यावे ज्येनेकरुन विषयाचे बेसिक आकलन होण्यास मदत होईल.(उदा.राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे गाईड,PSI-STI चे गाईड)
   
३) प्रश्नपत्रिका:- इंटरनेटवरून किंवा मार्केटमधून मागील ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिका मिळवाव्यात आणि त्या सोडवाव्यात त्यामुळे परीक्षेची व्याप्ती कळते आणि अभ्यासाला नेमकेपणा येतो.
  
 ४) इंटरनेटचा वापर:- इंटरनेटवर सर्वप्रकारची माहिती मिळू शकते.मराठी वृत्तपत्रे मोफत उपलब्ध आहेत. Wikipedia सारक्या ज्ञानकोशाचा वापर करावा. तसेच बरीच पुस्तके इंटरनेटवर मोफत उपलब्ध असतात.जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग होतो.(सर्वात महत्वाचे माझा blog वाचायला मिळतो)
  
 ५) नियोजन:-स्पर्धापरीक्षांमध्ये टिकण्यासाठी नियोजन सर्वात महत्त्वाचे आहे. वेळेचे नियोजन,अभ्यासाचे नियोजन,नोट्स काढणे यांसारख्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
   
६) अभ्यासाला सुरवात:- आता अभ्यासाला सुरवात करा आणि यश मिळवा.स्पर्धापारीक्षेसाठीच्या अभ्यासाचे सौंदर्य हे आहे कि धेय्याएवढाच धेय्याकडे वाटचाल करण्याचा रस्ता सुंदर आहे.स्पर्धापारीक्षेचा अभ्यास आपल्या जाणीवेत भर टाकतो आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या घटनांचे आकलन होण्यास मदत होते. काहीनाहीतर रोज रात्री News Channels वर चालू असलेल्या वादाचा विषय नित समजण्यास मदत होते.         

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.