महत्वाच्या पोस्ट

भारताची राज्यघटना- प्रश्नमंजुषा ४४

Constitution of India                                                                                              






१) भारताच्या घटना समितेचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर, १९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद ........ यांनी भूषविले होते.

  A. डॉ राजेंद्रप्रसाद
  B. हृदयनाथ कुंजरू
  C. डॉ बाबासाहेब आंबेडकर
  D. डॉ सच्चिदानंद सिन्हा

----------------------------------------------------------------------
२) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता?

   A. पंडित जवाहरलाल नेहरू
   B. महंमद आली जिना
   C. वल्लभभाई पटेल
   D. आचार्य कृपलानी

-----------------------------------------------------------------------
३) खालीपैकी कोणते विधान गैरलागू वा चुकीचे आहे?

  A. भारताची घटना समिती प्रत्याक्षरित्या जनतेकडून निवडली गेली नव्हती.
  B. भारताच्या घटना समितीने घटनेचा मसुदा जनतेपुढे मतदानासाठी ठेवला नव्हता
  C. मान्यवर नेत्यांचा समावेश असलेल्या या समितीत समाजातील विविध स्थारांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला गेला होता.
  D. ब्रिटीश कायदेमंडळाने भारतीय नेत्यांशी चर्चा करूनच घटना समितीची निवड केली होती.

------------------------------------------------------------------------
४) खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते?

  A. मौलाना आझाद
  B. महात्मा गांधी
  C. बाळासाहेब खेर
  D. गोविंद वल्लभ पंत

-------------------------------------------------------------------------
५) 'घटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.' हे विधान......

  A. संपूर्णतः चूक आहे
  B. पूर्णतः बरोबर आहे
  C. विपर्यस्त आहे
  D. संदिग्ध स्वरूपाचे आहे

-------------------------------------------------------------------------
६) भारतीय घटनेच्या संदर्भात खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  A. भारतीय घटनेत संघराज्याची तसेच एकात्मिक राज्याची अशी दोहोंची वैशिष्ट्ये उतरलेली आहेत.
  B. आणीबाणीच्या काळात देशात केंद्राचा प्रभाव व नियंत्रण अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येते.
  C. शांततेच्या काळात मात्र भारतात घटक राज्यांना केंद्राच्या बरोबरीने किंबहुना अधिकच अधिकार प्राप्त होतात.
  D. 'मध्यवर्ती शासन प्रबळ असलेली संघराज्यात्मक घटना' अशा शब्दांत भारतीय घटनेचे वर्णन करणे अधिक उचित होईल.

-------------------------------------------------------------------------
७) खालीपैकी कोणते विधान गैरलागू वा चुकीचे आहे?

  A. एकात्मिक शासनपद्धतीकडे झुकणारे संघराज्य असे भारतीय शासनपद्धतीचे वर्णन करता येईल.
  B. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही.
  C. केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणी पाहता भारतात केंद्रसत्ता अधिक प्रबळ असल्याचे दिसते.
  D. नियोजन आयोगाची रचना घटनात्मक तरतुदींनुसार झालेली आहे.

-------------------------------------------------------------------------
८) 'घटनेतील कलम ५१ अ नुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य ठरते.' हे विधान......

  A. संपूर्णतः चूक आहे
  B. पूर्णतः बरोबर आहे
  C. वस्तुस्थितीशी सुसंगत आहे
  D. अंशतः बरोबर आहे

MPSC Current Affairs- प्रश्नमंजुषा(४३)

९) भारतीय घटनेतील विविध तरतुदींच्या संदर्भात खाली केलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  A. मुलभूत हक्कांवर गदा आल्यास भारतीय नागरिकास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.
  B. एखाद्या नागरिकाने घटनेतील कलम '५१ अ' मध्ये दिलेल्या मुलभूत कर्तव्याचे पालन न केल्यास त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नाही.
  C. राज्याने व केंद्राने घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते.
  D. आजच्या घटनात्मक तरतुदी लक्षात घेता मुलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा प्राधान्य देण्यात आलेले दिसून येते.

-------------------------------------------------------------------------
१०) घटनेतील मार्गदर्शक तत्वे पुढे संमत केल्या जाणाऱ्या सर्व कायद्यांचा मूलाधार असावीत, असे ........ यांचे प्रतिपादन होते.

  A. पंडित जवाहरलाल नेहरू
  B. डॉ बाबासाहेब आंबेडकर
  C. डॉ राजेंद्रप्रसाद
  D. के. एम. मुन्शी

-------------------------------------------------------------------------
११) ......... म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.

  A. घटनेचा मसुदा
  B. मार्गदर्शक तत्वे
  C. घटनेचा सरनामा
  D. लिखित घटना

-------------------------------------------------------------------------
१२) भारतीय राज्याघटनेत सुरवातीस ....... इतकी आर्टिकल्स व ...... इतकी शेड्युल्स होती.

  A. ३९५ ब ८
  B. ४०९ व ९
  C. ३९९ व ८
  D. ३९५ व १०

-------------------------------------------------------------------------
१३) भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्याक्तीस्वातंत्र्याची हमी दिली आहे?

  A. १९
  B. २०
  C. २१
  D. २२

-------------------------------------------------------------------------
१४) भारतीय संघराज्यात नवीन राज्य सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्यपुनर्रचनेचा अधिकार संसदेस आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये हा अधिकार संसदेस प्राप्त झाला आहे?

  A. दुसऱ्या
  B. तिसऱ्या
  C. चौथ्या
  D. पाचव्या

-------------------------------------------------------------------------
१५) 'स्वातंत्र्याचा हक्क' या मुलभूत हक्कांतर्गत बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यांपैकी कोणते स्वातंत्र्य चाव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार वगळण्यात आले?

  A. भाषणस्वातंत्र्य
  B. संचारस्वातंत्र्य
  C. संपत्ती मिळविणे, बाळगणे, तिची विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य
  D. व्यवसायस्वातंत्र्य

MPSC लोकसभा निवडणूक -प्रश्नमंजुषा (४२)

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.