महत्वाच्या पोस्ट

Rajyaseva Pre Exam 2014 - History

MPSC Prelims 2014- History Questions                                                                                               






१) खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लीहीली?

अ.प्रियदर्शिका
ब.रत्नावली
क.नागानंद

  A. (अ) फक्त
  B. (अ) आणि (ब) फक्त
  C. (ब) आणि (क) फक्त
  D. तिन्ही

----------------------------------------------------------------------
२) काँग्रेस स्थापनेसंदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांता’ ला ‘दंतकथा संबोधून कोणी नाकारले आहे?

   A. ए. ओ. ह्युम
   B. ए. आर. देसाई
   C. ताराचंद
   D. बिपन चंद्र

-----------------------------------------------------------------------
३) त्याला “निझाम-ऊल-मुल्क” हा किताब देण्यात आला होता.त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते.त्याने आसफ जाही राजघराणे स्थापन केले.त्याच्या उत्तराधिकार्यांना हैदराबादचे निझाम म्हणून ओळखले जाते.त्याला ओळखा?

  A. चिन क्विलीच खान
  B. मुर्शिद कुली खान
  C. सादत खान
  D. हुसेन अली खान

------------------------------------------------------------------------
४) मराठा साम्राज्यात मूळतः काही उणीवा होत्या ज्यामुळे त्यांचा अधःपात झाला.पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती?

  A. मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले.
  B. इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडींमुळे नवीन शत्रू निर्माण झाले.
  C. त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा
  D. वरील पैकी एकहि नाही

-------------------------------------------------------------------------
५) अजात शत्रू बाबत पुढील पैकी कुठली विधाने बरोबर आहेत?

(अ) त्याचे नाव कुणिक सुधा होते
(ब) तो हर्यक घराण्याचा शेवटचा शासक होता
(क) त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली
(ड) त्याने लीच्छवी राज्याला मगध मध्ये विलीन केले

  A. (अ) (ब) आणि (ड)
  B. (अ) (क) आणि (ड)
  C. (अ) (ब) आणि (क)
  D. (ब) (क) आणि (ड)

-------------------------------------------------------------------------
६) पुढील दिलेल्या ब्रिटीश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा.

(अ) कलकत्ता
(ब) सुरत
(क) मद्रास
(ड) बॉम्बे

  A. (अ) (ब) (क) (ड)
  B. (ड) (अ) (क) (ब)
  C. (ब) (क) (ड) (अ)
  D. (ब) (क) (अ) (ड)

-------------------------------------------------------------------------
७) खालीलपैकी कोणता क्रांती कारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता?

  A. दामोदर चाफेकर
  B. विनायक दामोदर सावरकर
  C. अरविंद घोष
  D. भगात सिंग

-------------------------------------------------------------------------
८) फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशनाबाबत खालील पैकी कोणते विधान सत्य नाही?

  A. ते काँग्रेस चे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन होते.
  B. त्या अधिवेशनाला सुमारे ४०,००० शेतकरी उपस्थित होते.
  C. त्या अधिवेशनाच्या आयोजनात धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी यांनी महत्वाची भूमिका पार पडली.
  D. शंकरराव देव हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

MPSC Current Affairs 2013

९) आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी २० व्य शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला :

  A. अर्जविनंत्यांच्या राजकारणाद्वारे
  B. घटनात्मक साधनांद्वारे
  C. आंदोलनात्मक मार्गद्वारे
  D. वसाहतवादाच्या आर्थिकसमीक्षेद्वारे

-------------------------------------------------------------------------
१०) खालील (अ) आणि (ब) विधाने वाचून पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय निवडा.

(अ) भारतीय समाज व्यवस्था सात जातींमध्ये विभागल्याचा उल्लेख मेगॉस्थोणीस करतो.
(ब) मेगॉस्थोणीसचा जात व व्यवसाय यात गोंधळ उडालेला दिसतो.

  A. (अ) आणि (ब) दोन्ही विधाने सत्य असून (ब) हे (अ) ची योग्य कारणमिमांसा देते.
  B. (अ) आणि (ब) दोन्ही विधाने सत्य आहेत,परंतु (ब) हे (अ) ची योग्य कारणमिमांसा देत नाही.
  C. (अ) सत्य आहे,परंतु (ब) चूक आहे.
  D. (अ) चूक आहे,परंतु (ब) सत्य आहे.

-------------------------------------------------------------------------
११) जोड्या लावा.उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

         यादी क्र.१                यादी क्र.२
(अ) आदिलशाही            १. बीदर
(ब) निजामशाही            २. गोलकोंडा
(क) इमादशाही              ३. विजापूर
(ड) कुतुबशाही               ४. अहमदनगर
(इ) बरीदशाही                ५. बेरार

                 अ   ब  क  ड    इ
  A.     ३    ५   २   ४    १
  B.     ५    ४   १   २    ३
  C.     ३    ४   ५   २    १
  D.    ५     ४   २   ३    १

-------------------------------------------------------------------------
१२) औरंगजेब नंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता अंबरचा सवाई राजा जय सिंग! त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले.त्याने पाच ठिकाणी जंतर मंतर बांधले.पुढील किती ठिकाणी त्याने,जंतर मंतर बांधले नाही?

(अ) बनारस
(ब) उजैन
(क) मथुरा
(ड) उदयपुर
(इ) इलाहाबाद

  A. एक
  B. दोन
  C. तीन
  D. चार

-------------------------------------------------------------------------
१३) उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालील पैकी कोणी केला?

(अ) बल्बन
(ब) अल्लाउद्दीन खिलजी
(क) महम्मद बिन-तुघलक
(ड) फिरोजशाह तुघलक

  A. (अ) आणि (ब)
  B. (ब) आणि (क)
  C. (क) आणि (ड)
  D. (ड) आणि (अ)

-------------------------------------------------------------------------
१४) जुलै १९४७ पर्यंत काही संस्थांचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती :

(अ) बडोदा
(ब) त्रावणकोर
(क) बिकानेर
(ड) भोपाल
  A. वरील सर्व
  B. (अ),(क)
  C. (ब),(क)
  D. (ब),(ड)

-------------------------------------------------------------------------
१५) .कार्य काळानुसार क्रमाने बाबर, हुमायुन, अकबर, जहांगीर, सह्जाहन व औरंगजेब हे ग्रेट मुगल्स म्हणून गणल्या जातात.औरंगजेब च्या मृत्यू नंतर आलेल्या मुगल सम्राटांना “लेटर मुगाल्स” “नंतरचे मुगाल्स” म्हणून संबोधले जात. पुढील लेटर मुगाल्स चा कालावधी प्रमाणे क्रम लावा.

(अ) अहमद शहा
(ब) बहादूर शहा
(क) जहांदर शहा
(ड) महम्मद शहा

  A. अहमद शहा, बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा.
  B. बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा, अहमद शहा.
  C. बहादूर शहा, महम्मद शहा, जहांदर शहा, अहमद शहा.
  D. जहांदर शहा, महम्मद शहा, बहादूर शहा, अहमद शहा.

इतिहास- प्रश्नमंजुषा ७

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.