महत्वाच्या पोस्ट

Online MPSC Guidance

"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा"



ONLINE MPSC GUIDANCE 
                 या वेबसाइटचा कोणी एक व्यवस्थापक नाही. ही वेबसाइट चालवणार्‍यांमध्ये विविध स्पर्धापरीक्षांचा अनुभव असणार्‍या तज्ञांचा समावेश आहे. तसेच बर्‍याच वेळी जे विद्यार्थी चालू वर्षामध्ये स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांचा यामध्ये समावेश असतो. स्पर्धापरीक्षांच्या तयारीमध्ये एक नवा आमुलाघ्र बादल करण्याचे ONLINE MPSC GUIDANCE ही वेबसाइट सुरू करणार्‍या व्यवस्थापकांचा निश्चय आहे.
स्पर्धापरीक्षांचे हिंदवी स्वराज्य 
              स्पर्धापरीक्षांमध्ये भाग घेणार्‍या तरुण मुला-मुलींमध्ये सध्याच्या काळात झपाट्याने वाढ होत आहे. UPSC मधून संपूर्ण भारतात तर MPSC मधून महाराष्ट्रात विविध परीक्षांमध्ये मराठी विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत आणि ही संख्या वाढतच जात आहे. स्पर्धापरीक्षांच्या मार्गदर्शनासाठी शहरी भागात अनेक छोटे मोठे कोचिंग सेंटर्स उपलब्ध आहेत. परंतु अशा सेंटर्समध्ये मार्गदर्शन मिळवण्यासाठी मोठाले शुल्क आकारले जाते. आज इंटरनेट गावागावांपर्यंत पोहचले आहे. मोबाइल फोन्सच्या एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हाताशी आले आहे. याच इटेरनेटचा वापर करून स्पर्धापरीक्षांसाठी (खास करून MPSC) उपयोगी पडेल असे मार्गदर्शन पुरवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. यामध्ये आपलाही हातभार लागावा अशी मनापासून इच्छा.
‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ 
             "स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन" हे ही वेबसाइट सुरू करण्यामागचे दुय्यम कारण आहे. वेबसाइट सुरू करण्याचे महत्वाचे कारण हे आज इंटेरनेटवरती मराठी भाषेचे फारच थोडे अस्थित्व जाणवते. विकिपीडिया सारख्या इंटेरनेटवरील सर्वात मोठ्या ज्ञानकोशातही मराठी चे अस्थित्व नगण्य असे आहे. या वेबसाइटच्या च्या माध्यमातून जमेल तितक्या विषयांवर मराठीमध्ये लेखन केले जाईल. तसेच Guest Writer(पाहुणे लेखक) हा प्रकल्प सुरू करून सर्वांना या महायज्ञात सामील करण्याचे प्रयोजन आहे. त्यामुळे या आपल्या सर्वांच्या प्रिय 'मराठीचे' जगत स्थान निर्माण करण्यासाठीचा हा अल्पसा प्रयत्न.

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.