MPSC मार्फत घेण्यात येणार्या विविध राज्यासेवा,PSI,STI/Asst या परीक्षांच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परिक्षेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये देण्यात येणार्या पुरस्कारांना फार महत्व असते यावर दरवर्षी चालू घडामोडींमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातात.
MPSC ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्याला अशा विविध क्षेत्रांमध्ये देण्यात येणार्या पुरस्कारांबद्दल ते का दिले जातात? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पुरस्काराचे नाव काय? पुरस्कार सुरू करण्यामागील घटना किंवा उद्दिष्ठ्ये? पुरस्कार कोणाला मिळाला व का मिळाला? यांसारख्या विविध बाजूंनी अद्ययावत असले पाहिजे.
तसेच गतवर्षीच्या MPSC द्वारे घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका पहिल्या तर आपल्या लक्षात येईल की ज्या वर्षी परीक्षा घेण्यात आली आहे त्याच्या मागील एक-दोन वर्षांपूर्वीही देण्यात आलेल्या पुरस्कारांबद्दल प्रश्न विचारण्याचा MPSC चा कल दिसतो. (चालू घडामोडींच्या सर्व घटकांना हे लागू पडते) त्यामुळे याचा अभ्यास करताना किंवा नोट्स काढताना मागील दोन वर्षांचे नोट्स काढावे.
वर्गीकरण:
पुरस्कारांचे वर्गीकरण करताना त्यांच्या स्थरानुसार आणि क्षेत्रांनुसार करावे.
स्थरानुसार - 1. राज्य स्थरिय पुरस्कार (महाराष्ट्र)
2. राष्ट्रीय पुरस्कार
3. आंतराष्ट्रीय पुरस्कार
क्षेत्रांनुसार - 1.साहित्य 2. चित्रपट 3. पत्रकारिता 4. क्रीडा 5. विज्ञान 6. नागरी सन्मान 7.विविध जीवनगौरव पुरस्कार 8. संगीत 9. औद्योगिक क्षेत्रासंबंधी 10. सरकारी/ शासनाचे पुरस्कार
गतवर्षीचे प्रश्न:
1. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? (STI Pre 2011)
a) गगन नारंग
b) रमपाल
c) राजेंद्र सिंह
d) जाहीर खान
2. 57 व्या राष्ट्रीय फिल्म मोहत्सवामद्धे खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास 'उत्कृष्ठ फीचर फिल्म' हा पुरस्कार प्राप्त झाला? (STI Pre 2011)
a) नाटरंग
b) गंध
c) जोगवा
d) यापैकी नाही
3. 2011 चा 'स्वरभास्कर' पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? (STI Pre 2011)
a) लता मंगेशकर
b) आशा भोसले
c) सुमन कल्याणपूरकर
d) उषा मंगेशकर
4. 'मेगासेस' पुरस्कार कोणता देश देतो?
a) इंडोनेशिया
b) भारत
c) फिलिपेन्स
d) ब्रिटन
5.5. 2011 चा पद्म विभूषन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? (STI Pre 2011)
a) नरेंद्र जाधव
b) भालचंद्र मुंगेकर
c) मोंटेक सिंह अहलुवालिया
d) यापैकी नाही
6. खालीलपैकी कोणती व्यक्ति आंतराष्ट्रीय सामंज्यास्यासाठी जवाहरलाल नेहरू पुरस्काराची मानकरी नाही? (राज्यासेवा Pre-2011)
a) बराक ओबामा
b) होस्नी मुबारक
c) अंजेला मार्केलं
d) रॉबर्ट गेब्रियल मुगावे
7. 'फॉटोग्राफर ऑफ द ईयर' 2011पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? (राज्यासेवा Pre 2012)
a) शंकरराव बोरकर
b) बौजू पाटील
c) हेमंत कुलकर्णी
d) सुभाष देशमुख
8. सन 2008 मध्ये 'भारत रत्न' पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ? (राज्यासेवा Pre 2011)
a) पंडीत रवी शंकर
b) भीमसेन जोशी
c) उस्ताद झाकीर हुसैन
d) सचिन तेंडुलकर
9. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (2009) यांना देण्यात आला? (राज्यासेवा Pre 2011)
a) अरुण शौरी
b) शेखर गुप्ता
c) एन राम
d) निखिल वागळे
10. 2009 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला? (राज्यासेवा Pre 2011)
a) उपेंद्र लिमये
b) सुलोचना
c) संध्या
d) आशा काळे
Ans-1)d 2)a 3)a 4)c 5)c 6)a 7)b 8)b 9)c 10)b
वरती दिलेल्या गतवर्षीच्या प्रश्नांचे निरीक्षण केले की असे दिसते की विविध क्षेत्रात दिल्या जाणार्या पुरस्कारांवरती प्रश्न विचारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पुरस्कार कोणता देश देतो असे विचारले आहे तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये पुरस्काराचा कोण मानकरी नाही असे विचारले आहे त्यामुळे या आधी तो पुरस्कार कोना कोणाला मिळाला हे माहीत असणे आवश्यक आहे.अशा प्रकारे सर्व आंगणे अभ्यास करणे गरजेचे आहे.पुढील पोस्ट पुरस्कारांवरती असेल.
"Best Wishes to all of You"
Read More:PSI Exam Notes (General Science) 5
Read More:प्रश्नमंजुषा(१६) चालू घडामोडी (PSI)
No comments:
Post a Comment