महत्वाच्या पोस्ट

राज्य स्थरीय पुरस्कार (महाराष्ट्र) 1

राज्य स्थरीय पुरस्कार (महाराष्ट्र)

"महाराष्ट्र भूषण पुरस्कार"

महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्या राज्य पुरस्कार.
स्वरूप: 5लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र.

१९९६     पु. . देशपांडे,     साहित्य.
१९९७     लता मंगेशकर,     कला,संगीत.
१९९९     विजय भटकर,     विज्ञान.
२००१     सचिन तेंडुलकरक्रीडा.
२००२     भीमसेन जोशी,    कला,संगीत.
२००३     अभय बंग आणि राणी बंग,              समाजसेवा आरोग्यसेवा.
२००४     बाबा आमटे,         समाज सेवा.
२००५     रघुनाथ अनंत माशेलकरविज्ञान.
२००६     रतन टाटा,           उद्योग.
२००७     रा. कृ. पाटील,      समाज सेवा.
२००८     नानासाहेब धर्माधिकारी,   समाज सेवा.
२००८     मंगेश पाडगावकर,             साहित्य.
२००९     सुलोचना              कला, सिनेमा.
२०१०     जयंत नारळीकर, विज्ञान.
२०११     अनिल काकोडकर,विज्ञान.


"पुण्यभूषण पुरस्कार"

त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशनतफेर् देण्यात येतो.
स्वरूप -1 लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह.
2013 चा पुरस्कार सूत्रसंचालक, मुलाखातकार, पत्रकार, लेखक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सुधीर गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला.

पं. भिमसेन जोशी, काका केळकर, शंतनुराव किर्लोस्कर, पु. . देशपांडे, राहुल बजाज, डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, डॉ. रोहिणी भाटे, डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यापूर्वी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.


"पुलोत्सव"

 "आशय सांस्कृतिक' आयोजित.

 'सामाजिक कृतज्ञता पुरस्कार'- डॉ अभय बंग (2012), स्नेहालय संस्था-2011(नगरमध्ये वेश्याच्या मुलांसाठी मोठे कार्य )

'पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार-पंडित जसराज (2012),मंगेश पाडगावकर(2011)

‘पु.ल.स्मृती पुरस्कार’-परेश रावल(2012),नाना पाटेकर (2011)


 "लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार" 

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जातो.

सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे (2012)(डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्य़ातील ‘हेमलकसा’ येथे सुमारे ४० वर्षांपासून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी सेवेला वाहून घेतले आहे.तर, डॉ. विकास आमटे हे बाबा आमटेंनी स्थापलेल्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळून कुष्ठरोग्यांची सेवा करत आहेत.)

डॉ. कोटा हरिनारायण (2011)(आंतरराष्ट्रीय दर्जाची लढाऊ विमानं तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली)

शीला दीक्षित (2010)


"यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार"

 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो.

यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्यांची जपणूक करीत आर्थिक, समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते.

 ई. श्रीधरन(2012)- कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो असे रेल्वे प्रकल्प उभारणारे मेट्रोमॅन.

मार्शल ऑफ इंडियन एअर-फोर्स श्री. अर्जन सिंग(2011)- कै. यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षण मंत्री असताना व भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात श्री. अर्जन सिंग भारताच्या वायुदलाचे प्रमुख होते.

महाश्वेतादेवी(2010)-ज्येष्ठ लेखिका व आदिवासींच्या मुक्तिलढ्यातील नेत्या.




Read More:MPSC,PSI,STI/Asst - विविध पुरस्कारांवरती येणार्‍या प्रश्नांबद्दल
Read More:PSI Exam Notes (General Science) 5





No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.