Khushwant Singh
![]() |
Khushwant Singh |
खुशवंत सिंग यांचा जन्म २ फेब्रुवरी १९१५ मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला. 1951 साली ऑल इंडिया रेडियोच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. योजना, हिंदुस्थान टाइम्स तसेच टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे त्यांनी संपादकपद भूषवले आहे. सिंग यांना राज्यसभा सदस्यत्वही देण्यात आले होते. ते 1980 ते 86 पर्यंत राज्यसभा सदस्य होते.
खुशवंत सिंग यांना १९७४ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पण १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतर झालेल्या शिख दंगलींमुळे त्यांनी पुरस्कार भारत सरकारला परत केला. त्यानंतर २००७ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्म विभूषण पुरस्काराने गौरव केला. २०१० साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
खुशवंत सिंग यांची अनेक पुस्तकं गाजली. ट्रेन टू पाकिस्तान, आय शाल नॉट द नाइटएंजल, द सनसेट क्लब, द हिस्ट्री ऑफ द सिख, द सिख टुडे आणि दिल्ली अशी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली. २००२ मध्ये ट्रुथ, लव अॅण्ड लिटिल मेलिस हे त्यांचं आत्मचरित्र पेंग्विनने प्रकाशित केलं.वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी द सनसेट क्लब या पुस्तकाचे लेखन केले आहे.
नुकताच त्यांनी आपला ९८वा वाढदिवस साजरा केला होता, त्यावेळी 'खुशवंतनामा' हे नवीन पुस्तक सादर केले होते. 'खुशवंतनामा - द लेसन्स ऑफ माय लाइफ' असे या पुस्तकाचे नाव असून, त्यात त्यांनी निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी व आरोग्यपूर्ण कसे जगावे याविषयी काही मते मांडली आहेत. भारतातील राजकारण, राजकारणी व देशाचे भवितव्य, धर्म म्हणजे काय यावरही भाष्य केले आहे.
खुशवंतसिंग यांची निवडक साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे:
- दी मार्क ऑफ विष्णू अँड अदर स्टोरीज
- दी हिस्टरी ऑफ सिख्स
- दी ट्रेन टू पाकिस्तान
- दी व्हॉइस ऑफ गॉड अँड अदर स्टोरीज
- दी सिख्स टुडे
- रणजीतसिंग, महाराजा ऑफ पंजाब
- ट्रॅजेडी ऑफ पंजाब
- सेक्स स्कॉच अँड स्कॉलरशिप
- वुई इंडियन्स
- विमेन अँड मेन इन माय लाइफ
- दी कंपनी ऑफ विमेन
- विथ मलाइस टोवर्डस वन अँड ऑल
- व्हाय आय सपोर्टेड इमर्जन्सी एसेज अँड प्रोफाइल्स
- एग्नॉस्टिक खुशवंतसिंग, देअर इज नो गॉड
- दी गुड, दी बॅड अँड दी रिडिक्युलस
खुशवंत सिंग खुशवंत सिंग यांचे २० मार्च २०१४ नवी दिल्ली येथे निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.
No comments:
Post a Comment