Rules Regarding Election Expenses
- उमेदवाराला त्याला हवा तितका खर्च निवडणूकीत करता येतो का ?
नाही. उमेदवाराला वाटेल तितका खर्च निवडणूकीत करता येत नाही. संबंधित मतदार संघासाठी नमूद केलेल्या किमान मर्यादेपेक्षा जास्त निवडणूक खर्च कायदयान्वये करता येत नाही.
(संदर्भ : निवडणूक आचार नियम 1961 चा नियम 90 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 123 (6))
- उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या मोठया राज्यांच्या संसदीय मतदारसंघासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा किती असते ?
निवडणूक खर्चाची मर्यादा वेळेनुसार बदलत असते. सध्या उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश अशा मोठया राज्यातील संसदीय मतदारसंघात साठवणूक खर्चाची मर्यादा 40 लाख रुपये आहे.
(संदर्भ : निवडणूक आचार नियम, 1961 चा नियम 90)
- अशा मोठया राज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा किती असते ?
या मोठया राज्यातील विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा सध्या 16 लाख रुपये इतकी आहे.
(संदर्भ : निवडणूक आचार नियम, 1961 चा नियम 90)
- सर्व राज्यात ही मर्यादा सारखी असते का? जर नाही, तर तुम्ही सांगू शकता का की कुठल्या संसदीय मतदार संघासाठी सर्वात कमी मर्यादा आहे ?
नाही. राज्या-राज्यानुसार निवडणूक खर्चाची किमान मर्यादा बदलते. सध्या दादरा नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्पि या मतदारसंघाची निवडणूक खर्चाची मर्यादा सर्वात कमी आहे ती 16 लाख रुपये इतकी आहे.
(संदर्भ – निवडणूक आचार नियम, 1961 चा नियम 90)
- निवडणूक खर्चाचा जमाखर्च उमेदवाराने सादर करणे आवश्यक असतो का ?
होय. प्रत्येक उमेदवाराला त्याच्याकडून किंवा त्याच्या निवडणूक अभिकर्त्याद्वारे स्वतंत्र आणि योग्य अशा निवडणूकीसंदर्भातील सर्व खर्चाची नोंद ठेवणे आवश्यक असते. हा खर्च त्या उमेदवाराला नामांकन मिळाल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होण्यापर्यंतच्या कालावधीतील असावा, दोन्ही तारखा या कालावधीत समाविष्ट आहेत. या जमाखर्चाची सत्य प्रत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक निकाल लागल्यानंतर 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक असते.
(संदर्भ – लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 77 आणि 78)
- हा जमाखर्च दाखल करण्यासाठी अधिकृत व्यक्ती कोण असते ?
निवडणूक लढवणारा उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, त्या जिल्हयातील जिल्हा निवडणूक अधिका'याकडे उमेदवाराने आपला निवडणूकीचा जमाखर्च सादर करावयाचा असतो.
(संदर्भ – लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 77)
- जर उमेदवार एकापेक्षा जास्त मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्याला स्वतंत्र जमाखर्च देणे आवश्यक आहे की एकच ?
जर उमेदवार एकापेक्षा जास्त मतदारसंघातून निवडणूक लढवत असेल तर त्याला प्रत्येक निवडणूकीचा जमा खर्च स्वतंत्ररित्या सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदारसंघाची निवडणूक स्वतंत्र असते.
(संदर्भ – लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 77 )
- उमेदवाराने जर निवडणुकीचा खर्च सादर केला नाही तर काय दंड आहे?
जर उमेदवार निवडणुकीचा खर्च लोकप्रतिनिधी कायदाअंतर्गत किंवा योग्य पध्दतीत ठराविक मुदतीत सादर करण्यास असमर्थ ठरल्याचे निवडणूक आयोगाला पटल्यास आणि जर उमेदवाराकडे यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी समाधानकारक उत्तर नसल्यास त्या उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे अशा उमेदवाराच्या संसदेचा किंवा राज्य विधीमंडळाचा सदस्य म्हणून त्याची निवड झाल्यापासून तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात येते.
- राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून पक्षाच्या प्रचार कार्यक्रमासाठी वाहतुकीवर झालेला खर्च त्या पक्षाच्या उमेदवाराकडून झालेला खर्च म्हणून समजला जातो का? जर हो तर अटी काय?
राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारांची जी यादी पक्षाकडून सादर केली जाते, अशा प्रचारकांचा वाहतूकीचा खर्च यामध्ये समाविष्ठ आहे. (राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील राजकीय पक्षासाठी स्टार प्रचारकांची संख्या 40 आहे तर नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षासाठी ही संख्या 20 आहे.) ही यादी अधिसूचनेनंतर सात दिवसांच्या आत निवडणूक आयोगाला आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला सादर करणे आवश्यक आहे. असे करण्यास असमर्थ ठरलेल्या पक्षाचा हा खर्च त्या पक्षाच्या उमेदवाराकडून झाल्याचे समजले जाते.
(संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 1 ते 77 च्या स्पष्टीकरणाचे उपवाक्य(अ))
- पक्षाचा सदस्य नसलेली व्यक्ती प्रचारासाठी पक्षाचा स्टार प्रचारक प्रमुख म्हणून नामांकित केला जाऊ शकतो का?
नाही. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 77 (1))
- स्टार प्रचारकांची यादी आयोगाला सादर केल्यानंतर त्यातील नावात अदलाबदल करण्यास परवानगी असते का?
नाही. स्टार प्रचारकांच्या यादीतील व्यक्तीचे निधन झाल्यास किंवा व्यक्तीने संबंधित पक्षाचे सदस्यपद सोडल्यास या यादीत बदल केला जाऊ शकतो, अन्यथा नाही. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 77 (1) चे स्पष्टीकरण 2)
- एखाद्या राजकीय पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून घोषित झाल्यानंतर तो उमेदवार ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या स्वत:च्या मतदारसंघात त्या पक्षाचा स्टार प्रचारक ठरतो का?
नाही. स्वत:च्या मतदारसंघात असा नेता त्याच्या राजकीय पक्षाचा स्टार प्रचारक ठरत नाही. स्वत:च्या मतदारसंघात तो प्रथम एक उमेदवार असतो. त्याच्याकडून त्याच्या मतदारसंघात झालेला खर्च त्याचा निवडणूक खर्च म्हणून विचारात घेतला जातो.
- उमेदवाराच्या परवानगीशिवाय त्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवाराचा मित्र खर्च करू शकतो का?
उमेदवाराच्या परवानगीशिवाय निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 रुपयापेक्षा जास्त खर्च झाल्यास दंडनीय आहे.
(संदर्भ: भारतीय दंड संहितेचे कलम 17 एच)
- उमेदवाराच्या परवानगीने जर मित्राने उमेदवाराच्या प्रचारासाठी खर्च केला तर हा खर्च उमेदवाराच्या जमाखर्चात समाविष्ट होतो का?
होय. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 77)
No comments:
Post a Comment