लोकसभा निवडणूक -प्रश्नमंजुषा (४२)

Mpsc Loksabha Election Facts- Multiple Choice Questions                                             

                          



१) खालील विधाने पहा.

a) लोकसभा तयार करण्यासाठी संपूर्ण देशाला 543 संसदीय मतदारसंघात विभाजित केले असून या प्रत्येक मतदार संघातून 1 सदस्य निवडून येतो.
b) भारताचे राष्ट्रपती अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त 2 सदस्यांची निवड करतात.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. दोन्ही चूक
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) लोकसभेतील काही जागा या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
b) वर्ष 2008 मध्ये मर्यादा (डेलिमीटेशन) आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार, 84 जागा अनुसूचित जाती व 47 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींसाठी 5 व अनुसूचित जमातींसाठी 4 संसदीय मतदार संघ राखीव ठेवण्यात आले आहेत.
b) महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे मतदारसंघ राखीव आहेत, तर अनुसूचित जमातींसाठी नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे संसदीय मतदार संघ राखीव ठेवण्यात आले आहेत.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) योग्य पर्याय निवडा.

a) २००९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ७ राष्ट्रीय पक्ष होते.
b) ३० जुलै २०१० रोजी 'राष्ट्रीय जनता दल' या पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता काढून घेण्यात आली.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरली आणि त्याला दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही.
b) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी व्यक्ती दोषी ठरल्यानंतरही जामिनावर असेल आणि त्याच्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असेल तर अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे.
c) मात्र ती व्यक्ती दोषी असल्याचा निर्णय राखून ठेवण्यात आला असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त c)

MPSC निवडणूक -प्रश्नमंजुषा (४१)

६) खलील दोन विधाने पहा.

a) पंधराव्या लोकसभेत(२००९) सर्वाधिक 59 सदस्य महिला होत्या, ही आकडेवारी सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 10.86 टक्के एवढी होती.
b) सहाव्या लोकसभेत(१९७७) महिला सदस्यांची संख्या सर्वात कमी 19 इतकी होती. महिलांचे हे प्रतिनिधित्व सभागृहाच्या 3.50 टक्के इतके होते.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
७) सार्वत्रिक निवडणूक २००९ संबंधी खालील विधाने पहा.

a) सर्वाधिक विजयी महिला – 13 (उत्तर प्रदेश)
b) सर्वात कमी वय असलेले विजयी उमेदवार – 26 (हमदुल्ला सय्यद, लक्षद्विप)
c) सर्वात जास्त वय असलेले विजयी उमेदवार – 88 (राम सुंदर दास, हाजीपूर, बिहार)

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) b) बरोबर
  D. विधान b) c) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) सार्वत्रिक निवडणूक २००९ संबंधी खालील विधाने पहा.

a) उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक (11,60,06,374)मतदार
b) लक्षद्विपमध्ये सर्वात कमी (45,983) मतदार
c) चेन्नई दक्षिण मतदारसंघातून सर्वाधिक (43) उमेदवारांनी निवडणूक लढवली
d) कोकराझर (आसाम) आणि नागालँड मतदार संघात सर्वात कमी (3) उमेदवार

  A. फक्त a) c) बरोबर
  B. फक्त b) d) बरोबर
  C. a) b) आणी d) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) निवडणुका लढणा-या उमेदवारांच्या एकूण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यासंबंधी खालील विधाने पहा.

a) 1952 मध्ये 489 निवडक जागांसाठी 1874 उमेदवार होते
b) 2009 मध्ये 543 जागांसाठी 8070 उमेदवार होते.

  A. फक्त a) बरोबर
  B. वरील सर्व चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) 2009 लोकसभा निवडणुकांमधील महिला उमेदवारांची पक्षनिहाय कामगिरी संबंधी खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लढलेल्या जागा ४३ आणि विजयी २३
b) भारतीय जनता पार्टी लढलेल्या जागा ४४ आणि विजयी १३

  A. फक्त a)
  B. a)आणि b)
  C. फक्त b)
  D. एकही असत्य नाही


Infographic on Lok Sabha Elections in India


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism Copyright © 2014

Powered by Blogger.