महत्वाच्या पोस्ट

Mpsc Current Affairs March- प्रश्नमंजुषा (४०)

MPSC Current Affairs

Mpsc Current Affairs- Multiple Choice Questions                                             

                          



१) खुशवंत सिंग यांच्या संबंधी खालील विधाने पहा.

a) ट्रेन टू पाकिस्तान, आय शाल नॉट द नाइटएंजल, द सनसेट क्लब, द हिस्ट्री ऑफ द सिख, द सिख टुडे आणि दिल्ली अशी पुस्तकं त्यांनी लिहिली.
b) २००२ मध्ये ट्रुथ, लव अॅण्ड लिटिल मेलिस हे त्यांचं आत्मचरित्र पेंग्विनने प्रकाशित केलं.
c) खुशवंत सिंग यांना १९७४ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. पण १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतर झालेल्या शिख दंगलींमुळे त्यांनी पुरस्कार भारत सरकारला परत केला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Orgnisation) जगातल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी अलिकडेच प्रसिद्ध केली. या यादीत लुधियाना चौथ्या आणि कानपूर नवव्या स्थानावर आहे.
b) डब्ल्यूएचओच्या प्रदूषित शहरांच्या यादीत इराणचे अहवाज (Ahvaz) अव्वलस्थानी आहे. दुस-या क्रमांकावर मंगोलियाचे उलन बतोर (Ulan Bator), तिस-या क्रमांकावर इराणचे सननदज (Sanandaj) आहेत.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) मिझोराममध्ये वांशिक दंगलींचा उद्रेक झाल्यानंतर 'ब्रू' समाजातील लोकांनी मिझोराममधून पळ काढला होता.
b) मिझोराममधील विस्थापित झालेले 'ब्रू' समाजातील निर्वासित त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्य़ात स्थायिक झाले असून त्यांना टपालाद्वारे मतदान करण्याची अनुमती देण्यात आली असल्याचे त्रिपुराच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) योग्य पर्याय निवडा.

a) उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या वाळवंटातील हवेमध्ये वाढलेल्या धूलिकणांमुळे (एरोसेल )भारतातील मान्सून प्रभावित होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. वायव्य पॅसिफिक राष्ट्रीय प्रयोगशाळेतील फील आणि 'आयआयटी, भुवनेश्वर' येथील व्ही. विनोज आणि सहकारी संशोधकांनी नुकताच हा अभ्यास केला आहे.
b) वायूकणातील धूळ सूर्यप्रकाश शोषून घेत असल्याचे आणि वायूकण पावसावर प्रभाव टाकत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासातून धुलिकण सूर्यप्रकाश शोषून घेऊ शकतात आणि मान्सूनच्या दृढीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) 'बायसेप-२'च्या दक्षिण ध्रुवावरील दुर्बीणीच्यामाध्यमातून गुरुत्वाकर्षण लहरी आढळल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
b) विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी झालेल्या महास्फोटानंतर फोटॉनच्या आकाराचे विश्व क्षणार्धात छोटय़ा चेंडूच्या आकारापर्यंत प्रसरण पावले. हा प्रसरणाचा वेग अतिप्रचंड होता. हे सांगणाऱ्या सिद्धांताला 'इन्फ्लेशन सिद्धान्त' असे म्हणतात.
c) या दुर्बिणीतून मिळवलेले छायाचित्र हे इन्फ्लेशन सिद्धान्त खराकरणारा थेट पुरावा असल्याचेवैज्ञानिकांचे मत आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त c)

Mpsc Current Affairs March- प्रश्नमंजुषा (३९)

६) खलील दोन विधाने पहा.

a) ट्विटरला या सोशल मीडिया साइटला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली.
b) 'जस्ट सेटिंग अप माय ट्विटर' या ट्विटने सह संस्थापक जॅक डोर्सी याने २१ मार्च २००६ रोजी ट्विटर ही मायक्रो ब्लॉगिंग साइट सुरू केली.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) सूर्यावर २०१२ मध्ये झालेल्या चुंबकीय वादळाच्या(Solar flare) तडाख्यातून पृथ्वी थोडक्यात बचावली. हे वादळ सेकंदाला ३००० किलोमीटर वेगाचे होते. एक मिनिटात पृथ्वीला पाच वेळा प्रदक्षिणा पूर्ण करण्याची त्याची क्षमता होती.
b) नासाच्या सोलर टेरेस्ट्रियल ऑब्झव्र्हेटरी या अवकाशयानानेही या चुंबकीय वादळाचे निरीक्षण केले.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) मायक्रोसॉफ्टने बारा वर्षांपूर्वी 'विंडो एक्सपी' ही ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणली मात्र, आता आठ एप्रिलपासून ही सिस्टिमच बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे या सिस्टिमवर चालणाऱ्या सेवांना 'मायक्रोसॉफ्ट'चा प्लॅटफॉर्म वापरता येणार नाही.
b) यामुळे 'विंडो एक्सपी' ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे बँकांचे व्यवहार व एटीएम सेवा आठ एप्रिलनंतर बंद होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना पाठवलेल्या निवेदनात मांडली आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) 'अल् अदिल ट्रेडिंग'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना नुकतेच 'मॅन्युकॅक्चरिंग सीईओ' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
b) डॉ. दातार हे आखातातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या ५० जणांच्या यादीत १४व्या क्रमांकावर आहेत. संयुक्त अरब अमिरातीत सुमारे ३० वर्षांपूर्वी त्यांनी पहिले स्टोअर उघडले. c) सीईओ अॅवॉर्ड्स २०१४ द्वारे पश्चिम आशियाई व्यवसायातील असाधारण यश, अभिनवता नैतिकतेचा गौरव केला जातो.

  A. फक्त a) बरोबर
  B. विधान a) बरोबर b) नाही
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) सक्तीचे मानवी हस्तांतरण, सक्तीचा देहविक्रय आणि बालमजुरी २०२० सालापर्यंत जगातून हद्दपार करण्यासाठी जगातील ख्रिस्ती व मुस्लीम धर्मातील प्रमुख धुरीण 'द ग्लोबल फ्रीडम नेटवर्क' या संस्थेच्य माध्यमातून एकत्र आले.
b) ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश उद्योगपती अॅण्ड्रय़ू फॉरेस्ट यांनी या संघटनेचा पाया घातला.
c) जगात गुलामांची संख्या २०१३च्या पाहणीनुसार दोन कोटी ९८ लाख.गुलामगिरी पश्चिम आफ्रिकी देश मॉर्टानियात सर्वाधिक. दुसऱ्या क्रमांकावर हैती आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान.

  A. a),b),c)
  B. b)आणि c)
  C. a) आणि b)
  D. एकही असत्य नाही


Infographic on Lok Sabha Elections in India


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.