Eligibility for Contesting For Elections
- लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवाराचे किमान वय किती असावे लागते?
नामनिर्देशन पत्राच्या पडताळणीच्या दिवशी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी नसावे. यासाठी भारतीय संविधानाचे कलम 84 (ब) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 36 (2) संविधानाच्या कलम 173 (ब) मध्ये विस्तृत माहिती दिली आहे.
- कुठल्याही मतदारसंघात मतदार म्हणून माझी नोंद नाही. मी निवडणूक लढवू शकतो का?
नाही. निवडणूक लढवण्यासाठी चालू मतदार यादीत मतदार म्हणून तुमची नोंद असली पाहिजे.
(संदर्भ : लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 4 (ड) आणि कलम 5 (क))
- ठराविक राज्यात मतदार म्हणून मी नोंदणी केली आहे. त्या राज्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यातून मी निवडणूक लढवू शकतो का?
होय. आसाम, लक्षद्वीप आणि सिक्कीमच्या स्वायत्त जिल्ह्यांव्यतिरिक्त देशातील कुठल्याही मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवू शकता.
(संदर्भ : लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4)
- ठराविक राज्यात एखादी व्यक्ती अनुसूचित जातीचा सदस्य आहे. दुसऱ्या राज्यात अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तो लोकसभेसाठी निवडणूक लढवू शकतो का?
होय. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या कुठल्याही राज्यातील जागेवरून तो निवडणूक लढवू शकतो.
(संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4)
- एखादी व्यक्ती ठराविक राज्यात अनुसूचित जमातीचा सदस्य आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या कुठल्याही राज्याच्या जागेवरुन ती व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवू शकते का?
होय. लक्षद्वीप तसेच आसामच्या स्वायत्त जिल्ह्यांव्यतिरिक्त आणि आसामचा आदिवासी प्रांत वगळता अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या इतर कुठल्याही राज्यातील जागेवरुन ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
(संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4)
- एखादी व्यक्ती ठराविक राज्यातील मतदार आहे. तो दुसऱ्या राज्यातील जागेवर विधानसभा निवडणूक लढवू शकतो का?
नाही. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 5)
- एखादी व्यक्ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती समुदायाच्या सदस्य आहे. ती व्यक्ती सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो का?
होय. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 4 आणि 5)
- समजा एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरली आणि त्याला दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकते का?
नाही. (संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 8 (3)
- समजा अशी व्यक्ती जामिनावर आहे त्याच्या याचिकेवरचा निकाल प्रलंबित आहे, अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकते का?
नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एखादी व्यक्ती दोषी ठरल्यानंतरही जामिनावर असेल आणि त्याच्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असेल तर अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहे. मात्र ती व्यक्ती दोषी असल्याचा निर्णय राखून ठेवण्यात आला असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
- तुरुंगात बंदिस्त असलेली व्यक्ती निवडणुकीत मतदान करू शकते का?
नाही. तुरुंगात बंदिस्त असलेली व्यक्ती निवडणुकीत मतदान करू शकत नाही.
(संदर्भ : लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 62 (5))
- एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून स्थानबध्द करण्यात आले असेल तर तो मतदान करू शकतो का?
होय. तो टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतो.
(संदर्भ: लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 62 (5) आणि निवडणूक आचार संहिता नियम 1961 चा नियम 18 (अ) (4))
No comments:
Post a Comment