१. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ = ३,०७,७१३ चौ. कि. मी.
२. विस्तार –
पूर्व-पश्चीम सुमारे लाांबी ८०० कि. मी.
उत्तर-दक्षिण सुमारे लांबी ७०० कि.मी. आहे.
३. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनांतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.
४. महाराष्ट्राच्या वायव्येस -गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आांध्रप्रदेश, दक्षिनेस - कर्नाटक आणि अगदी दक्षिनेस - गोवा हे राज्य आहे. राज्याच्या पश्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.
५. महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्ट्या कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, आणि महाराष्ट्र पठार असे ३ प्रमुख विभाग पडतात.
६. समुद्रकिनारा- ७२० कि. मि.
७. प्रशासकीय विभाग- १) कोकण २) नाशिक ३) औरंगाबाद ४) पुणे ५) अमरावती ६) नागपूर एकूण प्रशाकीय विभाग सहा (नांदेड हा प्रस्तावित सातवा प्रशासकीय विभाग)
८. महारष्ट्रात एकूण ३५ जिल्हे आहेत.
९. स्थानिक स्वराज्य संस्था-
महानगरपालिका- २६
नगर परिषदा- २२२
जिल्हा परिषदा- ३३
पंचायत समित्या- ३५५
ग्राम पंचायत- २८८१३
१०. राज्यातील नद्या-
मुख्य पूर्व वाहिनी नद्या: गोदावरी,भीमा,कृष्णा.
पश्चिम वाहिनी नद्या: तापी,नर्मदा,उल्हास,वैतरणा,सावित्री.
पूर्ववाहिनी नद्या-
गोदावरी- हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून तिला 'दक्षिण भारताची गंगा' असे म्हणतात. सह्याद्री पर्वतातील त्र्यंबकेशवर(नाशिक) जवळील ब्रह्मगिरी येथे उगम पावते. उपनद्या- वारणाप्रवरा ,मांजरा,वर्धा,पैनगंगा,इंद्रावती.
कृष्णा- कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला आहे. उपनद्या- कोयना,दुधगंगा,वारणा,येलाना व पंचगंगा.
भीमा- भीमा नदीचा उगम पुण्याजवळील भीमाशंकर येथे झाला आहे. उपनद्या- भामा,इंद्रायणी,मुळा-मुठा,नीरा,माण,वेळ,घोड,पवना व सिना.
पश्चिम-वाहिनी नद्या-
तापी- तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई येथे बैतुल टेकड्यांवर होतो. उपनद्या- पूर्णा,नळगंगा,वाघोर,पांजरा,नंद,वाण,गिरणा.
नर्मदा- नर्मदा नदी मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते.
११. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे ६१, ९३९ चौ. कि. मी. आहे. भू-क्षेत्राच्या सुमारे २१% क्षेत्र वनाखाली आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र नागपूर विभागात (२७,५५९ चौ. कि. मी.) आहे. सर्वात कमी वनक्षेत्र औरांगाबाद विभागात (२९१३ चौ. कि. मी.) आहे. नाशिक विभाग - ११८२१ चौ. कि. मी.वनक्षेत्र. अमरावती विभाग ९७२२ चौ. कि. मी. वनक्षेत्र. पुणे विभाग - ६२३७ चौ. कि. मी. वनक्षेत्र. जिल्ह्यांचा विचार करता राज्यात सिावत जास्त वनक्षेत्र गडचीरोली जिल्ह्यात (सुमारे १३००० चौ. कि. मी.) आहे.
१२. राज्यातील राष्ट्रीय उद्याने:
१. ताडोबा राष्ट्रीय उद्यान - चांद्रपूर
२. नवेगाव राष्ट्रीय उद्यान - गोंदिया
३. बोरिवली राष्ट्रीय उद्यान (सांजय गांधी राष्ट्रीय उद्यान) मुांबई उपनगर, ठाणे. याशशिाय नागपूर जिल्ह्यात पेंच आणि अमरावती जिल्ह्यात गुगामल (मेळघाट) ही राष्ट्रीय उद्याने राज्यात आहेत. २००४ साली चांदोली(सांगली) या अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
१३. प्रमुख अभयारण्ये:
राधानगरी - दाजीपूर अभयारण्य - कोल्हापूर. (गव्यांसाठी प्रसिद्ध)
चाांदोली अभयारण्य - साांगली.
सागरेश्वर अभयारण्य - साांगली.
कोयना अभयारण्य - सातारा
माळणी पक्षी अभयारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभरायरण्य) - सातारा.
भीमाशांकर - पुणे, ठाणे.
तानसा अभयारण्य - ठाणे ि
कर्नाळा पक्षी अभयारण्य - (महाराष्ट्रातील पहहले पक्षी अभयारण्य) - रायगड
नाांदूर मध्मेश्वर अभयारण्य - नाशिक (हे अभयारण्य पाणपक्षाांसाठी प्रसिद्ध आहे.)
देऊळगाव - रेहेरकूरी अभयारण्य - अहमदनगर.
माळढोक पक्षी अभयारण्य - सोलापूर. (राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य)
गौताळा - औटरम घाट अभयारण्य - औरांगाबाद, जळगाव.
पाल-यावल अभायारण्य - जळगाव
किनवट अभयारण्य - नाांदेड, यितमाळ.
मेळघाट अभयारण्य - (राज्यातील पहीला व्याघ्र प्रिकल्प) - अमरावती.
बोर अभयारण्य - वर्धा.
नागझीरा अभयारण्य - गोंदीया
१४.खनीज संपत्ती :
१. भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमाांक लागतो.
जिल्हे - नागपूर, भांडारा, सिंधुदुर्ग.
२. भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे.
जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सागांली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे.
जिल्हा - भांडारा.
४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - भांडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.
५. डलेोमाईट - देशातील एकूण साठ्यापैकी ९% डलेोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे -रत्नागिरी, यवतमाळ.
६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.
जिल्हे - यवतमाळ, चांद्रपूर, गडचीरोली, अहमदनगर.
७. महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे. जिल्हे - नागपूर, चांद्रपूर,
८. भारताच्या एकूण लोहखनिज साठ्याांपैकी २% लोहखनिजसाठा महाराष्ट्रात आहे.
जिल्हे - चांद्रपूर, गडचीरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.
९. ग्रॅनाईट - गोंदीया, चांद्रपूर, गडचीरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतो.
१०.ताांबे - नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात अत्यल्प प्रमाणात सापडते.
११.अर्भक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडतो.
१२.टांगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडतो.
१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व वभाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
१५. खनिज तेल: मुांबईनजीक समुद्रातील ‘मुांबई हाय’ या क्षेत्रात खनिज तेल, तसेच नैसर्गिक वायू सापडतात. रायगड जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आढळतात.
१६. महाराष्ट्राला सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. महाराष्ट्रात २ महत्त्वाची बांदरे आहेत
१. मुांबई पोर्ट ट्रस्ट (एम.बी.पी.टी.)
२. न्हावाशेवा(जे. एन. पी. टी./ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) तसेच राज्यात ४८ छोटी बांदरे आहेत.
१७. लोकसंख्या:२०१ १ (अंतरिम निष्कर्ष)
एकूण लोकसंख्या : ११ कोटी २३ लाख ७२ हजार ९७२
पुरुषांची संख्या : ५ कोटी ८३ लाख ६१ हजार ३९७
स्त्रियांची संख्या : ५ कोटी ४० लाख ११ हजार ५७५
दशकातील लोकसंख्यावाढीची टक्केवारी : १५.९९ टक्के
स्त्री-पुरुष प्रमाण : हजार पुरुषांमागे ९२५ स्त्रिया
लोकसंख्येची घनता : प्रती चौ. कि. मि. ३६५ व्यक्ती
१८. साक्षरता: २०११(अंतरिम निष्कर्ष)
एकूण साक्षरता : ८२.९१ टक्के
पुरुषांमधील साक्षरता : ८९.८२ टक्के
स्त्रियांमधील साक्षरता : ७५.७८ टक्के
ग्रामीण भागातील साक्षरता : ७७.०९ टक्के
नागरी भागातील साक्षरता : ८९.८४ टक्के
राज्यातील सर्वाधिक साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगरे (९०.९ टक्के)
राज्यातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार(६३.०४ टक्के)
अधिक आकलनासाठी MAPS पहा
Read More: प्रश्नामाजुषा(४) चालू घडामोडी
अधिक आकलनासाठी MAPS पहा
Read More: प्रश्नामाजुषा(४) चालू घडामोडी
No comments:
Post a Comment