महत्वाच्या पोस्ट

Dr. Narendra Dabholkar

डॉनरेंद्र अच्युत दाभोलकर यांचा अल्पपरिचय


Dr Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar

जन्म- नोव्हेंबर १९४५
शिक्षण- एम.बी.बी.एस.

दाभोलकरांचा जीवनप्रवास :

दाभोलकर यांचा जन्म सातार्यात झाला. दाभोलकर कुटुंबातच सामाजिक कार्याची परंपरा आहे. केरळचे रॅशनालिस्ट विचारवंत बी. प्रेमानंद, डॉ. बाबा आढाव, युक्रांदचे नेते डॉ. कुमार सप्तर्षी आणि भारतीय सवरेदय संघाचे कार्याध्यक्ष असलेले बंधु देवदत्त दाभोलकर यांच्या प्रेरणेने दाभोलकर यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. सातारा येथे डॉक्टरीची चांगली प्रॅक्टिस असताना सामाजिक कार्याच्या ओढीने त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात नास्तिक या शब्दावर खल होऊन या मंचाने अंधश्रद्धा निर्मलून समिती हे नाव धारण केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मलून समितीची धुरा दाभोलकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सर्मथपणे सांभाळली होती. समितीच्या महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक, गोवा येथे जवळपास 00 शाखा आहेत.
१९८२ पासून ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.
१९८९ मध्ये त्यांनी "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची" स्थापना केली. तेव्हापासून समितीचे कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. अंधश्रद्धाविरोधी काम करणारी अशा प्रकारची ही देशातील एकमेव संघटना आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्थेचे काम चालते

डॉ. दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंनिस पुढील क्षेत्रांत प्रामुख्याने कार्यरत राहिली    

  • वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि मानवता यांची जोपासना 
  • नागरिकांचे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा मोडून काढण्यासाठी सातत्याचे प्रयत्न
  • धार्मिक रूढी आणि परंपरांची सर्वसमावेशक विचाराने मीमांसा            
  • हानीकारक रूढी आणि अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवून त्या रूढींसाठी पर्याय सुचवणे
  • अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि त्यांना कारणीभूत ठरणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध अंनिसने उभारलेल्या मोहिमा गाजल्या

साधनाचे मानद संपादक

  • साने गुरुजी यांनी सुरू केलेल्यासाधना या साप्ताहिकाचे मानद संपादकपद ते गेली बाराहून अधिक वर्षे सांभाळत होते.
  • ध्येयवादी पत्रकारितेचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या साधनाने नुकतीच ६५ वर्षे पूर्ण केली आहेत.
  • सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परिवर्तनाचे विषय साधनातून सातत्याने हाताळले गेले आहेत.

सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्यवाह

  • परिवर्तनवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाबद्दल मानधन देता यावे म्हणूनसामाजिक कृतज्ञता निधीची सुरुवात करण्यात आली. या निधीच्या स्थापनेपासून डॉ. दाभोलकर त्याचे कार्यवाह म्हणून काम पाहत होते
  • हा निधी एक कोटी रुपयांचा आहे. या रकमेच्या व्याजातून दरमहा पन्नास कार्यकर्त्यांना एक हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
  • गेली अठरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे.

परिवर्तन संस्थेचे संस्थापक कार्यवाह

  • परिवर्तन ही संस्था स्थापन झाल्यापासून डॉ. दाभोलकर संस्थेचे कार्यवाह होते.  
  • या संस्थेमार्फत व्यसनमुक्तीसाठी निवासी स्वरूपाचे कार्य मोठय़ा प्रमाणावर चालवले जाते.
  • जैविक शेती, पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रबोधन ही कार्येही संस्था करते.

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू

  • डॉ. दाभोलकर कबड्डी या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू होते.
  • खेळात कार्यरत असताना बांग्लादेशाविरोधातील कबड्डी कसोटी सामन्यात देशाकडून खेळण्यासाठी त्यांची निवड झाली होती.
  • कबड्डीसाठी देण्यात येणारा राज्य शासनाचाशिवछत्रपती हा सर्वोच्च पुरस्कार तसेचशिवछत्रपती युवा पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

दाभोलकरांची साहित्य संपदा :

  • अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
  • अंधश्रद्धा विनाशाय
  • ऐसे कैसे झाले भोंदू
  • झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोलकर विनोद शिरसाठ.
  • ठरलं... डोळस व्हायचंय
  • तिमिरातुनी तेजाकडे
  • प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)
  • भ्रम आणि निरास
  • विचार तर कराल?
  • विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी
  • श्रद्धा-अंधश्रद्धा


अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विधेयक


 प्रवास
  • अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अशासकीय विधेयक जुलै १९९५ मध्ये विधानसभेत मांडण्यात आले.
  • १३ एप्रिल 00 रोजी शासकीय विधेयक आले. मात्र विरोधामुळे स्थगित.
  • १६ डिसेंबर 00 रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत पारित होऊ शकले नाही.
  • नंतर विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे गेले पुढे विधेयक व्यपगत झाले.
  • 0११ मध्ये नव्याने विधेयक मांडले गेले पण त्यावर चर्चाही झाली नाही. विरोधाचे सूर कायम राहिले.
  • चालू वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात ते सुधारणांसह मांडण्याची तयारी सरकारने केली. हे विधेयक या अधिवेशनात आणले जाईल, असा मनोदय सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
  • तथापि, विधेयक अधिवेशनात आलेच नाही. वारकर्यांशी चर्चा करूनच विधेयक आणले जाईल, असे स्पष्ट करीत सरकारने माघार घेतली.
  • ता मंत्रिमंडळाने वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला.


या विधेयकात नमूद केलेल्या गुन्ह्यांबद्दल कमीत कमी सहा महिने आणि पाच हजार रुपये दंड ते जास्तीतजास्त वर्षे कारावास आणि 0 हजार रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

ही कलमे अशी

) भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्रविष्ठा खायला लावणे अशी कृत्ये गुन्हा ठरतील.(भूत उतरविण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर तो गुन्हा ठरत नाही.
) एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे गुन्हा ठरेल.
) जिवाला धोका निर्माण होतो, अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात,
अशा अमानुष अघोरी प्रथांचा अवलंब
करणे हा गुन्हा.
) गुप्तधन, जारणमरण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट अघोरी कृत्य करणे किंवा नरबळी देणे.
) अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी देणे, फसविणे, ठकविणे हा गुन्हा असेल पण केवळ अंगात येणे हा गुन्हा नाही.
) एखादी व्यक्ती करणी करते, जादुटोणा करते, भूत लावते, जनावरांचे दूध आटवते, अपशकुनी आहे, सैतान आहे असे जाहीर करणे.
) चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर
बंदी घालणे.
) भूत पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली, असे सांगणे.
) कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या
व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून
रोखणे किंवा त्याऐवजी मंत्रतंत्र-गंडेदोरे असे उपचार करणे.
0) बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती महिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.
११) स्वत:ला विशेष शक्ती असल्याचे सांगून अथवा गेल्या जन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून लैंगिक संबंध ठेवणे.अलौकिक
शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत लैंगिक संबंध ठेवणे.
१२) एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा, व्यवसायासाठी करणे.

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.