महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२२) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन(A) व त्याचे कारण(R) यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

प्रतिपादन(A):जागतिक अन्न दिवस १६ ऑक्टोबर ला साजरा केला जातो.
कारण(R): संयुक्त राष्ट्रांनी अन्न व कृषी संस्था स्थापन केली.

  A. (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत व (R) हे (A) चे योग्य कारण आहे.
  B. (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत परंतु (R) हे (A) चे योग्य कारण नाही.
  C. (A) सत्य आहे पण (R) असत्या आहे.
  D. (A) असत्या आहे पण (R) सत्य आहे.

----------------------------------------------------------------------
२) पुलोत्सवा संबंधी खालील विधाने विचारात घ्या.

a) यंदाचा पुलोत्सव सन्मान पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांना देण्यात येणार आहे.
b) तरुणाई पुरस्कार आनंदगंधर्व गायक आनंद भाटे यांना देण्यात येणार आहे.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) मॅन बुकर या पुरस्कारसंबंधी खलील विधाने विचारात घ्या?

a) न्यूझीलंडच्या लेखिका 'एलेनॉर कॅटन' यांना साहित्यक्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मॅन बुकर पारितोषकाने गौरवण्यात आले आहे.
b) केवळ २८ व्या वर्षी या पुरस्कारावर मोहर उमटवणारी ती सर्वांत तरुण लेखिका ठरली आहे.
c) त्यांच्या 'द ल्युमिनरीज' या कादंबरीला पुरस्कार देण्यात आला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व

------------------------------------------------------------------------
४) खलील विधाने विचारात घ्या?

a) ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्सनुसार भारतात जगातील सर्वाधिक जास्त लोक या ना त्या प्रकारच्या गुलामगिरीचे जिणे जगत आहे.
b) ' द ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्स २०१३ ' या निर्देशांकात भारताला 'लोकसंखेच्या प्रमाणात गुलामगिरीचे प्रमाण' यात चौथे स्थान देण्यात आले आहे
c) ऑस्ट्रेलियातील वॉक फ्री फाउंडेशन या मानवी हक्क संघटनेने ही पाहणी केली.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत?

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

-------------------------------------------------------------------------
५) 'इंद्र २०१३' हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशा दरम्यान नुकताच थरच्या वाळवंटात सुरु झाला?

  A. अमेरिका
  B. रशिया
  C. फ्रांस
  D. जर्मनी

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने विचारात घ्या?

a) सौदी अरेबियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व फेटाळून लावले.
b) सुरक्षा परिषदेत सात कायम सदस्य असून, इतर दहा अस्थायी सदस्यांची निवड क्रमवारीनुसार केली जाते.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) 'कांताई बंधाऱ्या' संबंधी खालील विधाने पहा.

a) कांताई बंधारा हा जळगाव जिल्ह्या मध्ये गिरणा नदीवर आहे.
b) कांताई बंधारा हा खासगी क्षेत्राच्या सहयोगातून बांधण्यात आलेला जलसंधारणाचा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खलील दोन विधाने विचारात घ्या?

a) ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे होणार आहे.
b) ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. फ. मु. शिंदे यांची निवड झाली आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
९) मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी शिफारस करण्यासाठीच्या राज्य शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

  A. विनोद तावडे
  B. नारायण राणे
  C. पृथ्वीराज चव्हाण
  D. अजित पवार

-------------------------------------------------------------------------
१०) सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?

  A. लोकहितवादी
  B. आगरकर
  C. विठ्ठल रामजी शिंदे
  D. महात्मा फुले

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.