महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२६) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) युरोपचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार असलेल्या 'साखारोव्ह पुरस्कार' पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असताना तालिबानच्या प्राणघातक हल्ल्याचा सामना करावा लागलेल्या मलाला युसुफझाई हिला प्रदान करण्यात आला.
b) याआधी हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता नेल्सन मंडेला, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यु की यांसारख्या मान्यवरांना मिळाला आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

----------------------------------------------------------------------
२) Child Rights and You (CRY) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टबद्दल खालील विधाने पहा.

a) क्रायच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सन् २०१२- १३ या वर्षांत राज्यातील सुमारे पन्नास टक्के लहान मुले कुपोषित आहेत.
b) २०११ च्या तुलनेत २०१२ मध्ये राज्याला एकही बालमृत्यू रोखता आला नाही.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) नुकतेच इंटरनेटवरील बाललैंगिक अत्याचाराच्या व्हिडीओ आणि छायाचित्रांचा फैलाव रोखण्यासाठी ........... कंपनीने इंग्रजीसह दीडशे भाषांतून अशा व्हिडीओ व छायाचित्रांसाठी दिले जाणारे 'शोधसंदेश' पुढील सहा महिन्यांत रोखले जाणार असे सांगितले आहे.

  A. याहू
  B. गुगल
  C. अल्ताविस्ता
  D. यापैकी नाही

------------------------------------------------------------------------
४) अत्यंत प्रतिष्ठेच्या ' इन्फोसिस सायन्स फौंडेशन ' च्या २०१३ सालच्या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात आले आहे?

  A. डॉ. राजेश गोखले
  B. सत्यजित मयोर
  C. इम्रान सिद्दिकी
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
५) मंगळाने पाणी व जीवसृष्टीस आवश्यक असलेली उष्णता कशी गमावली याचा शोध घेण्यासाठी कोणत्या देशाने नुकतेच 'मार्स अॅटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्यूशन' (मावेन) हे यान मंगळावर पाठवले?

  A. चीन
  B. भारत
  C. युरोपियन संघ
  D. अमेरिका

-------------------------------------------------------------------------
६) ‘क्रांती ज्योती’ या उपक्रमासंबंधी खालील विधाने पहा.

a) महिलांना कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक तसेच राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने "क्रांती ज्योती' हा उपक्रम राबवला आहे.
b) "यूएन वूमन' या संस्थेने राज्य निवडणूक आयोगाची पाठ थोपटली आहे तसेच प्रत्येक विकसनशील देशातील महिलांपर्यंत क्रांती ज्योत पोहोचविण्याचा युनोचा मानस आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील दोन विधाने पहा.

a) 'अब्दुल्ला यामीन' यांनी मालदीवचे सहावे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
b) ते प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवज या पक्षाचे उमेदवार होते व माजी अध्यक्ष महंमद नाशीद यांचा त्यांनी पराभव केला.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) 'मिस्टर सायन्स ऑफ इंडिया' अशी ओळख असलेले ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डॉ. चिंतामणी नागेश रामचंद्र उर्फ सी.एन.आर. राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
b) राव यांनी पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले आहे.
c) ब्रिटनमधील रॉयल सोसायटीने सन २००० मध्ये ह्युजेस पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
d) भारत विज्ञान पुरस्काराचे ते पहिले मानकरी (सन २००४) आहेत.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

-------------------------------------------------------------------------
९) भारतीय महिला बँकेसंबंधी खालील विधाने पहा.

a) राज्यात नाशिक येथे 'भारतीय महिला बँकेची' शाखा सुरु करण्यात आली.
b) 'सबल महिला, बलवान भारत' असे ब्रीदवाक्य आहे.
c) तर २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात बँकेसाठी १,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

वरील कोणती विधाने चूक आहेत?
  A. a) आणि b)
  B. a)आणि c)
  C. a), b)आणि c)
  D. फक्त a)

-------------------------------------------------------------------------
१०) 'आयएनएस विक्रमादित्य' या युद्धनौकेसंबंधी कोणती विधाने सत्य आहेत.

a) रशियाकडून खरेदी करण्यात आलेली 'अॅडमिरल गोर्शकोव्ह' अर्थात 'आयएनएस विक्रमादित्य' ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
b) नौका ४४ हजार ५०० टन वजनाची आणि २८४ मीटर लांबीची आहे. मिग-२९के, कामोव्ह-३१ आणि कामोव्ह-२८ पाणबुडीविरोधी यंत्रणा यांनी ही नौका सुसज्ज आहे.
c) यापूर्वी भारतीय नौदलात विराट ही युद्धनौका १९८७ पासून विमानवाहू युद्धनौका म्हणून कार्यरत होती.

  A. b), c) आणि a)
  B. a) आणि c)
  C. फक्त b)
  D. वरील सर्व

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.