महत्वाच्या पोस्ट

नामदेव ढसाळ

अल्पपरिचय

ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे लहाणपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. पुढे मुंबईतील गोलपीठा या रेड लाइट भागात त्यांचं बालपण गेलं.

डॉ. आंबेडकरांवर नितांत श्रद्धा असलेले नामदेव ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य असो, गद्य असो की वृत्तपत्रांतील स्तंभलेखन असो, आपल्या साहित्यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार तितक्याच प्रखरपणे मांडण्याचे काम ढसाळ यांनी केले. अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रभागी होते. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.

दलित चळवळीचे बिनीचे शिलेदार

साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे एक बिनीचे शिलेदार होते. महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या 'दलित पँथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या व साहित्यिकांच्या साथीने त्यांनी १९७२ मध्ये पँथरची स्थापना केली. अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर' चळवळीपासून प्रेरणा घेऊन जन्मलेल्या या संघटनेने दलित चळवळीला एक आक्रमक चेहरा दिला. दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली. तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घ्यायला भाग पाडले. त्यावेळच्या प्रत्येक आंदोलनात ढसाळ यांनी हिरीरीने भाग घेतला. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, 'दलित पँथर'शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होतं.

१९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह 'गोलपीठा' प्रकाशित झाला. यानंतर 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' तुझी इयत्ता कंची?, 'खेळ' आणि 'प्रियदर्शीनी' या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य समृध्द केले. नामदेव ढसाळ यांना २००४ मध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार व  पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.

नामदेव ढसाळ यांची साहित्य संपदा

काव्य

  • गोलपीठा
  • तुही यत्ता कंची
  • खेळ
  • मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले
  • प्रियदर्शिनी
  • या सत्तेत जीव रमत नाही
  • गांडू बगीचा
  • मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे
  • तुझे बोट धरुनी मी चाललो आहे
  • आंधळे शतक - मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे


गद्य

  • आंबेडकरी चळवळ
  • हाडकी हाडवळा
  • उजेडाची काळी दुनिया
  • सर्वकाही समष्टीसाठी
  • बुद्ध धर्म: काही शेष प्रश्न

नाट्य

  • अंधारयात्रा

मानसन्मान

  • पद्मश्री - १९९९
  • महाराष्ट्र शासन पुरस्कार - १९७३, १९७४, १९८२, १९८४
  • सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार - १९७४
  • साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार - २००४

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.