महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुष(३०) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट' (सीएसई) या संस्थेने केलेल्या अभ्यासाबाबत खालील विधाने पहा.

a) सौंदर्यप्रसाधनांमध्ये (कॉस्मेटिक्स) पारा हा विषारी धातू वापरण्यास बंदी असतानाही देशातील ४४ टक्के फेअरनेस क्रीममध्ये पारा आढळतो.
b) 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट्स अँड रूल्स ऑफ इंडिया'नुसार सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा वापरण्यास बंदी आहे. पारा हा विषारी धातू असून, त्याचे विष मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते.
c) नियमित स्वीकारार्ह मर्यादा म्हणजेच 'अॅक्सेप्टेबल डेली इनटेक लिमिट' (एडीआय). भारतात पाऱ्यासाठी 'एडीआय' ठरविलेला नाही.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
b) मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी यांच्यानंतर अल्पसंख्याक समजाचा दर्जा मिळालेला जैन हा सहावा समाज आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबतचा करार रद्द झाल्यानंतर संरक्षण मंत्रालय आता अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी एम आय १७ ही हॅलिकॉप्टर वापरण्याच्या तयारीमध्ये आहेत. ही हेलिकॉप्टर भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे?

  A. फ्रांस
  B. जर्मनी
  C. इंग्लंड
  D. रशिया

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) आर्थिक विकासासाठी परदेशी गुंतवणूकदारांवर अनावश्यक अवलंबून असणाऱ्या विकसनशील देशांना आता 'फ्रजाइल फाइव्ह' असे संबोधले जाऊ लागले आहे.
b) तुर्की, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशिया या पाच देशांसाठी हा शब्दप्रयोग गुंतवणूकदार वापरू लागले आहेत.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) पोलिओसंदर्भात खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) सलग तीन वर्षे देशात एकही नवा पोलिओ पेशंट आढळून न आल्याने भारताने स्वत:ला पोलिओमुक्त देश म्हणून जाहीर केले.
b) २००९ साली जगातील एकूण पोलिओ पेशंटांपैकी निम्मे भारतात होते. पण अवघ्या साडेचार वर्षांत भारताने पोलिओमुक्त देशाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
c) नायजेरिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये पोलिओचे आव्हान अजूनही कायम असून पाकमधून भारतात येणाऱ्या बालकांना सीमा ओलांडताच डोस दिला जातो.
d) वायव्य पाकिस्तानातील पेशावर हे पोलिओची सर्वाधिक लागण झालेले शहर आहे, अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केली आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) मल्टिब्रँड रिटेल क्षेत्रातील परकी गुंतवणुकीला (एफडीआय) दिल्लीपाठोपाठ कोणत्या राज्याने मंजुरी नाकारली?

  A. महाराष्ट्र
  B. कर्नाटक
  C. राजस्थान
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
७) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी खालील विधाने पहा.

a) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आएएस, आयपीएस आणि आयएफओएस या तिन्ही सेवांमधील अधिकाऱ्यांना यापुढे एकाच ठिकाणी दोन वर्षे काम करणे बंधनकारक केले आहे.
b) दोन वर्षांच्या आत अधिकाऱ्याची बदली करायची झाल्यास केंद्र किंवा राज्य सरकारला नागरी सेवा मंडळाची शिफारस आवश्यक आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली असे मंडळ स्थापन करावे लागणार आहे.
  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) नागरी पुरास्कारांसंबंधी खालील विधाने पहा.

a) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉ. रघुनाथ माशेलकर आणि विश्वविख्यात योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
b) अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यात स्वतःला झोकून देणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
९) तुळशीमधील औषधी गुणधर्मसंबंधी खालील विधाने पहा.
a) अनेक औषधांवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीमधील औषधी गुणधर्म जेनेटिक इंजिनीअरिंगचा वापर करून तुळशीमधील 'युजेनॉल' नावाचे रसायन वाढवण्याचा प्रयत्न पश्चिम केंटुकी विद्यापीठातील 'प्लांट मॉलेक्युलर बायोलॉजी'चे शास्त्रज्ञ करत आहेत.
b) ब्रेस्ट कॅन्सरवर 'युजेनॉल' अत्यंत प्रभावशाली असून, त्यामुळे हा कॅन्सर आटोक्यात ठेवता येतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?
a) भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवर अण्वस्त्रवाहक अग्नी-४ क्षेपणास्त्राची डीआरडीओने मोबाइल लाँचरवरुन चाचणी घेतली.
b) अग्नी-४ भारताचे दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेपणास्त्र आहे. तब्बल चार हजार किमी पर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. हलक्या वजनाचे अग्नी-४ क्षेपणास्त्र तीन हजार अंश उष्णतेतही तग धरू शकते.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि c)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.