ऐतिहासिक पार्श्वभूमी
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यु व बाल मृत्यु कमी करणे हा महत्वाचा भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम व इतर आनुषंगीक योजना राबविल्यामुळे आरोग्य संस्थातील प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास मिळणा-या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व त्यांना वाहतूक सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी जननी सुरक्षा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
उद्दिष्टे
राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्या कुटुंबातील माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांचे आरोग्य संस्थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
अंमलबजावणी पध्दत
- राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसुचित जाती व जमाती यांच्या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. सदर लाभ वय वर्ष १९ वरील गरोदर मातांना पहिल्या व दुसर्यात बाळंतपणासाठी देण्यात येत होता. परंतु केंद्रशासनाच्या परिपञकानुसार दिनांक ८ मे २०१३ पासून लाभार्थ्यांचे वय व अपत्यासंबंधीच्या अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत.
- पाञ लाभार्थीकडून जननी सुरक्षा योजनेकरिता आवश्यक असलेली कागदपञे प्राप्त करुन घेणे.
- विहीत नमुन्यातील जेएसवाय (JSY)कार्ड सर्व आवश्यक माहिती भरुन लाभार्थीस देणे.
- पाञ लाभार्थीस प्रसुतीपूर्व तीन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्त गोळया मिळवून देणे अथवा त्याकरिता मदत करणे.
- पाञ जेएसवाय लाभार्थीस शासकीय आरोग्य संस्थेत किंवा शासन मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती करिता प्रवृत्त करणे.
देण्यात येणारे लाभ
लाभार्थ्यास दिले जाणारे लाभ
- ग्रामीण भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्या आत रुपये ७००/- लाभ बॅंक खात्याजमध्ये परस्पर जमा होणा़-या धनादेशाव्दा्रे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
- शहरी भागातील जेएसवाय पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्य संस्था / मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्या आत रुपये ६००/-लाभ बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
- ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांची प्रसूती घरी झाल्यास अशा लाभार्थ्यांस रुपये ५००/- लाभ प्रसुतीच्या तारखेनंतर ७ दिवसाच्याआत बॅंक खात्यामध्ये परस्पर जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
- जेएसवाय पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यास लाभार्थीस रुपये १५००/- लाभ बॅंक खात्यामध्ये परस्परा जमा होणा़या धनादेशाव्दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
आशा कार्यकर्तीस मिळणारे लाभ
- ग्रामीण भागातील पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये ६००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यात येते. त्यामधील रुपये ३००/- प्रसूती पूर्व द्यावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यावर आणि रुपये ३००/- आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
- शहरी भागात पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी लाभार्थीस प्रवृत्त केल्यास एकूण रुपये ४००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून अदा करण्यारत येते. त्यामधील रुपये २००/- प्रसूती पूर्व दयावयाच्या सेवा दिल्याची खाञी केल्यायवर केल्यावर आणि रुपये २००/- आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था
ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा स्ञी रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.
शहरी भागात – वैदयकीय महाविद्यालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे व त्यांच्याकडील इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये.
बिगर शासकिय संस्थांचे कार्य
खाजगी रुग्णालये सुध्दा जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत ज.सु.यो. पाञ लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मानांकित करण्यात आलेले आहेत.
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment