राज्यसेवा PSI-STI-Asst या परीक्षांच्या पुर्वपरीक्षेमधील सात घटकांपैकी भूगोल हा एक घटक आहे.
आयोगाने दिलेला राज्यासेवेसाठीचा भूगोलाचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.
"Maharashtra, India and World Geography - Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World."
आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम विस्तृत दिलेला आहे. २०१२ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये भूगोल व कृषी घटकावर सुमारे ९० प्रश्न विचारण्यात आले होते.
मागील दोन वर्षांपासून MPSC ने परीक्षापद्धतीमध्ये आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये मूलगामी बदल केलेले आहेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठीचा भूगोलाचा दिलेला अभ्यासक्रम हा खूपच विस्तृत आहे तरी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा बारकाईने अभ्यास केला असता भूगोलाच्या अभ्यासक्रमातील उपघटकांची मांडणी करता येते.
भूगोलाची प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक अशी विभागणी करण्यात आली आहे.
प्राकृतिक भूगोल
- महाराष्ट्र:
- भूरुपाकीय तपशील व वैशिष्ट्ये
- रचनात्मक भूगोल
- हवामान व तापमान
- पर्जन्य वितरण
- नद्या व धरणे
- वनस्पती व वने
- भारत:
- भारतीय उपखंड उत्क्रांती
- शेजारील राष्ट्रे, हिंदी महासागर, आशिया व जगाच्या संदर्भात स्थान
- भारताचा रचनात्मक भूगोल व मुख्य रचनात्मक विभाग
- हवामान, पर्जन्यमान व तापमान
- पर्जन्यवृष्टी, भारतीय मान्सूनचे तंत्र, आवर्षण व पूर
- भारतातील नद्या व धरणे
- भारतातील वनसंपत्ती, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प
- जग:
- सूर्यमाला आणि विश्व
- पृथ्वीचे अंतरंग- रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूपे विकास
- अक्षांश व रेखांश
- वातावरण- रचना व संरचना
- हवामानाचे घटक- तापमान, वायुदाब, वारे व हवामान प्रदेश
आर्थिक भुगोल
- महाराष्ट्र:
- नैसर्गिक संपत्ती
- खनिजे व उर्जा साधनसंपत्ती
- महाराष्ट्र पर्यटन
- राजकीय व प्रशासकीय विभाग
- भारत:
- नैसर्गिक साधनसंपत्ती
- खनिजे व उर्जा साधनसंपत्ती
- पर्यटन
- वाहतूक
- व्यापार
- जग:
- मानवाचे मुख्य व्यवसाय
- कृषी- शेतीचे मुख्य प्रकार
- जगामधील साधनसंपत्ती
- वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार
सामाजिक भूगोल
- लोकसंख्या
- स्थलांतर
- ग्रामीण वस्त्या व तांडे
- नागरीकरण
- नागरी समस्या
बुक लिस्ट
- भूगोल मार्गदर्शन पेपर १ - स्टडी सर्कल (राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी)
- ११ वी आणि १२ वी भूगोल - महाराष्ट्र बोर्ड (PSI-STI-ASST परीक्षेसाठी)
- ४ थी आणि ९ वी भूगोल - महाराष्ट्र बोर्ड (महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासण्यासाठी)
- भूगोल व कृषी - ए बी सवदी
- महाराष्ट्राचा भूगोल - स्टडी सर्कल (कृषी माहिती चांगली)
- महाराष्ट्राची आर्थिक पाहणी - सर्व विषयांकरिता महत्वाचे (आकृत्या, आलेख, नकाशे यांसाठी उपयुक्त)
- अॅटलास - नकाशे, पहिल्या पेजेसवरील संकल्पना, शेवटच्या पानांवरील टेबल्स तसेच देशांची नवे त्यांच्या राजधान्या पहाव्यात.
महत्वाच्या टिप्स
- परीक्षेच्या बदलत्या स्वरूपाप्रमाणे ठोकळे अजून बदलले नाही, त्यामुळे ठोकळे वापरणाऱ्यांचे ठोकळे झालेत.
- फक्त एकाच संस्थेवर किंवा एकाच पुस्तकावर अवलंबून राहू नका.
- क्रमिक पुस्तकांवर भर द्या.
- MPSC चा पेपर आधी इंग्रजी मध्ये तयार होतो मग मराठी भाषांतर केले जाते त्यामुळे प्रश्न समाजाला नाही तर इंग्रजीमधील प्रश्न वाचा.
- इथून पुढे संकल्पना, संज्ञा यांवर आधारित प्रश्न जास्त विचारले जातील.
- मुलाखतीमध्येही निगेटिव्ह मार्किंग - पॅनलमध्ये एक सदस्य हा उमेदवार किती प्रश्नांची उत्तरे चुकीची देतो याची नोंद ठेवतो.(त्यामुळे फेका-फेकी करू नका)
- परीक्षेच्या ४-५ दिवस आधीही पेपर सेट होतात त्यामुळे परीक्षेच्या एक आठवडा आधीच्याही चालू घडामोडींचा अभ्यास ठेवा.
- UPSC तसेच IIT यांसारख्या परीक्षांचे पेपर सेटर MPSC आता बोलावते.
No comments:
Post a Comment