महत्वाच्या पोस्ट

पृथ्वीचे अंतरंग भाग २


पृथ्वीचे अंतरंग भाग १ या पोस्ट मध्ये आपण पहिले की मानवाला प्रत्यक्ष पृथ्वीच्या भूगर्भात जाने शक्य झाले नसल्यामुळे भूकंप लहरींच्या निरीक्षणाद्वारे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी निष्कर्ष काढले गेले. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगाची रचना थोडक्यात पाहू या:

प्रारंभी पृथ्वी हा एक उष्ण व वायुरूप गोळा होता. नंतर तो थंड झाला. त्याचे प्रथम द्रवस्थितीत व नंतर घनस्थितीत रुपांतर झाले. परिणामी भूकवचाची निर्मिती झाली. भूशास्त्रज्ञांनी  ज्वालामुखीचा स्पोट, भूकंपाच्या लहरी व खोल खाणीतील अनुभव यांचा अभ्यास करून पृथ्वी ही अनेक थरांची बनली असल्याचे अनुमान काढले.

पृथ्वीच्या अंतरंगाची रचना 


शिलावरण/कवच (Lithosphere/Crust) 


  1. पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य घानारुपास शिलावरण असे म्हणतात.
  2. शिलावारणाचा २९% भाग भूमीने व ७१% भाग जलाने व्यापला आहे.
  3. शिलावारणाची जाडी ४० किमी पर्यंत आहे. 
  4. शिलावारणाचे 'सियाल' व 'सीमा' असे दोन थर आहेत.


  • सियाल (Sial) -

  1. भूपटलाच्य सर्वात वरच्या थरास 'सियाल' म्हणतात.
  2. या थराची सरासरी जाडी २९ किमि आहे.
  3. भूमीखंड हे सियाल थरापासून तयार झालेले आहेत.
  4. सियाल थर Si म्हणजे सिलिका व Al म्हणजे अॅल्युमिनिअम या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे.
  5. या थरामध्ये सर्व प्रकारच्या भूकंप लहरींचा वेग कमी असतो.
  6. सियाल थराची सरासरी घनता २.७ इतकी आहे.

  • सिमा/सायमा (Sima) -

  1. सियाल थराच्या खालील थरास 'सायमा' असे म्हणतात.
  2. या थराची सरासरी जाडी ११ किमी आहे. म्हणजे शिलावारणाचा थर ४० किमी चा (सियाल २९ + सायमा ११ मिळून ) आहे.  
  3. सायमा या थरापासून सागरतळाची निर्मिती झाली आहे.
  4. सायमा थर Si म्हणजे सिलिका व Ma म्हणजे मॅग्नेशियम या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे.
  5. सायमा थराची सरासरी घनता ३.३ इतकी आहे.

कॉनरॅड विलगता (Conrad Discontinuity): सियाल व सायमा या सोन थरांना विलग करणाऱ्या पातळीला कॉनरॅड विलगता असे म्हणतात.

प्रावरण (Mantle) 


  1. शीलावरनाच्या खालील थरास 'प्रावरण' असे म्हणतात.
  2. प्रावारनाची जाडी सुमारे २०८० किमी आहे. 
  3. प्रावारणाची सरासरी घनता ५.५ इतकी आहे.
  4. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी प्रावरणाने ८३% भाग व्यापलेला आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानापैकी प्रावरनाचे वस्तुमान ६८% आहे.

मोहो विलगता (Moho Discontinuity ): सायमा थराच्या खाली भूकवच व प्रावरण यांना विलग करणारी पातळी म्हणजे 'मोहो विलगता' होय.            

प्रावरणाचे प्रमुख थर

  • ऊर्ध्व प्रावरण-
  1. याचा विस्तार अंतरंगात ४० ते ७०० किमी खोलीवर आढळतो.
  2. शिलारसाच्या उत्पत्तीशी याच थराचा संबंध असावा.
  3. प्रावरणाच्या अंतर्गत शक्तीमुळेच भूखंड वहन, सागरतळ विस्तार, पर्वत निर्माणकारी हालचाली व भूकंप होत असावेत.


  • अधो प्रावरण-
  1. याचा विस्तार अंतरंगात ७०० ते २८८० किमी खोलीवर आढळतो. 
  2. अधो प्रावरनामध्ये अधिक घनतेची सिलिका द्रव्ये आहेत.

रेपेटी विलगता (Repetti Discontinuity): ऊर्ध्व प्रावरण व अधो प्रावरण यांना विलग करणारी पातळी म्हणजे 'रेपेटी विलगता' होय.                            

गाभा (Core)


  1. अंतरंगात २८८० किमी ते ६३७१ किमी पर्यंत म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदूपर्यंतच्या पृथ्वीच्या आंतरांगास 'गाभा' असे म्हणतात.     
  2. हा भाग अतिशय कठीण अश्या खनिजद्रव्यापासून बनला आहे यात निकेल व लोह या धातूंचे मिश्रण असल्याने त्यास 'निफे' (Nife) असे म्हणतात.   

गटेनबर्ग विलगता (Gutenberg discontinuity): प्रावरण व गाभा यांना विलग करणारी पातळी म्हणजे 'गटेनबर्ग विलगता' होय.    

गाभ्याचे प्रमुख थर

  • बाह्य गाभा/द्रवरूप गाभा (Outer Core): 
  1. अंतरंगात २८८० किमी ते ५१५० किमी पर्यंतच्या पृथ्वीच्या आंतरंगास 'बाह्य गाभा' असे म्हणतात.       
  2. बाह्य गाभ्यातून दुय्यम भूकंप लहरी जाऊ शकत नसल्याने हा भाग द्रवरूप असावा असे मानले जाते.
  3. या गाभ्याची सरासरी घनता १२.३ इतकी आहे.


  • आंतरिक गाभा/घनरूप गाभा (Inner Core):
  1. अंतरंगात ५१५० किमी ते ६३७१ किमी पर्यंतच्या म्हणजे पृथ्वीच्या केंद्रबिंदू पर्यंतच्या आंतरंगास 'बाह्य गाभा' असे म्हणतात.
  2. आंतरिक गाभा हा घनरूप अवस्थेत आहे. असा अनुमान काढण्यात आला आहे.
  3. आंतरिक गाभ्याची सरासरी घनता हि १३.६ इतकी आहे.    

आयोगाचे प्रश्न: 


MPSC State Services mains 2013      

१) पृथ्वीच्या अंतरंग भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले तीन विभाग ओळखले गेले. उदा. कवच, प्रावरण व गाभा.
अ) सियाल व सीमा यांच्यामधील घनतेत बदल होणाऱ्या क्षेत्रास कॉनरॅड विलगता म्हणून ओळखले जाते.
ब) भूकंप लहरींमध्ये अचानक बदल होणाऱ्या क्षेत्रास मोहो विलगता म्हणून ओळखले जाते.
क) प्रावरण-गाभा सीमारेषा हि गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते.
वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधाने सत्य आहेत.

a) अ फक्त 
b) ब आणि क फक्त 
c) अ आणि क फक्त 
d) अ ब आणि क 

२) पृथ्वीच्या आंतरांगातील गाभ्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 

a) पृथ्वीच्या आंतरांगाचा गाभा सियालपासून बनलेला आहे.  
b) पृथ्वीच्या आंतरांगाचा गाभा सायमापासून बनलेला आहे.     
c) पृथ्वीच्या आंतरांगाचा गाभा निफेपासून बनलेला आहे.    
d) पृथ्वीच्या आंतरांगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.  

३) खालील वैशिष्ट्ये कोणत्या भूकंप लहरींची आहेत?

अ) भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात.
ब) जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो.
क) द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो.

a) प्राथमिक लहरी 
b) दुय्यम लहरी 
c) पृष्ठीय लहरी 
d) सामान्य लहरी 

४) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?

a) सियाल 
b) सायमा 
c) निफे 
d) शिलावरण 

५) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ............ हि विलगता आढळते?

b) मोहोरव्हीसिक 
c) गटेनबर्ग 
d) विचर्ट
e) भूभौतिक   
 
उतारे: १) d २) c ३) a  ४) c ५) b  

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.