महत्वाच्या पोस्ट

Sti Pre Question Paper 2013 - Polity

 Sales Tax Inspector Preliminary Examination-2013            






१) नकाराधिकार (राईट टू रिजेक्ट) म्हणजे?

अ) मतदारांना सर्व उम्मेद्वार नाकारण्याचा संपूर्ण हक्क.
ब) त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभे करणे भाग पडेल.
क) मतदानाचा कायदेशीर अधिकार आहे तर नकाराधिकार मुलभूत अधिकार आहे. (सर्वोच्च न्यायालयाच्या मता नुसार)
ड) त्या मुळे निवडणुकीत शुद्धता,पारदर्शकता आणि जिवंतपणा वाढेल.

वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
  A. फक्त अ
  B. अ आणि ब
  C. फक्त क
  D. वरील पैकी कोणतेही नाही

----------------------------------------------------------------------
२) जुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याचा निर्णय दिला.त्यानुसार __________________ पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.

   A. ६ महिने
   B. १ वर्ष
   C. २ वर्ष
   D. ६ वर्ष

-----------------------------------------------------------------------
३) ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधान निवडा.

अ) ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पडतात.
ब) त्यांची निवडणूक राज्य शासनाकडून होते.
क) ते ग्रामपंचायती चे म्हत्वाचे कागदपत्र व हिशेब सांभाळतात.
ड) ते पंचायत समितीच्या सभांच्या नोंदी ठेवतात.

  A. अ,ब,ड
  B. ब,क,ड
  C. क,ड,ब
  D. अ,क

------------------------------------------------------------------------
४) विधान अ: भारताच्या राज्य घटनेत ‘अल्पसांख्य’ शब्दा ची व्याख्या नाही.
विधान ब: अल्पसंख्या आयोग हि बिगर घटनात्मक संस्था आहे.

  A. अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
  B. अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
  C. अ बरोबर आहे पण ब चूक आहे.
  D. अ चूक आहे पण ब बरोबर आहे.

-------------------------------------------------------------------------
५) जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

  A. १५ ऑगस्ट,२०१३
  B. २४ ऑगस्ट,२०१३
  C. २६ ऑगस्ट,२०१३
  D. वरीलपैकी कोणतेही नाही

-------------------------------------------------------------------------
६) खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

  A. मराठी
  B. सिंधी
  C. मारवाडी
  D. संथाली

-------------------------------------------------------------------------
७) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

  A. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते.
  B. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर केवळ ४ दिवस चर्चा होते.
  C. विधानपरिषदेत अर्थसंकल्पावर २४ दिवस चर्चा होते.
  D. विधानपरिषदेतील अर्थसंकल्पाबाबत वरील कोणतेहि पर्याय योग्य नाही.

-------------------------------------------------------------------------
८) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्न उत्तरांचा असतो.
ब) विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात.

  A. केवळ विधान अ चुकीचे ब नाही
  B. केवळ विधान ब चुकीचे अ नाही
  C. दोन्ही चुकीचे आहेत
  D. एकही विधान चुकीचे नाही

MPSC Current Affairs 2013

९) खालीलनं दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे?

अ) डॉ.पी.सी. अलेक्झान्डेर महाराष्ट्राचे अतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते: सुमारे १० वर्ष.
ब) श्री. शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे अतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिले. त्यांचा हि कालावधी सुमारे १० वर्ष होता.

  A. विधान अ योग्य पण ब नाही
  B. विधान ब योग्य पण अ नाही
  C. दोन्ही विधाने योग्य
  D. दोन्ही विधाने अयोग्य

-------------------------------------------------------------------------
१०) एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्य मंत्री राहिले नाहीत?

  A. श्री. शंकरराव चव्हाण
  B. श्री. यशवंतराव चव्हाण
  C. श्री. वसंतराव पाटील
  D. श्री. शरदचंद्र पवार

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.