महत्वाच्या पोस्ट

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा

Overview of the State
Overview of the State 

राज्याचा संक्षिप्त आढावा


भौगोलिक क्षेत्र (३.०८ लक्ष चौ. किमी ) व लोकसंख्या दोन्ही बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर . राज्याची लोकसंख्या सुमारे ११.२४ कोटी (२०११ जनगणना) असून ती देशातील लोकसंखेच्या ९.३ टक्के आहे. राज्यातील ४५ .२ टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते.

चालू किंमतीनुसार २०१२-१३ या वर्षाचे अंदाजित स्थूल राज्य उत्त्पन्न(Gross State Domestic Product) १३,२३,७६८ कोटी असून देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सुमारे १४.१ टक्के हिस्सा आहे. राज्यातील औद्योगिक व सेवा या दोन्ही क्षेत्रांचा राज्य उत्पन्नात एकत्रित हिस्सा ८९.१ टक्के तर कृषी व संलग्न कार्ये या क्षेत्राच हिस्सा १०.९ टक्के आहे.

राज्यातील २३१ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर ५२.१ लाख हेक्टर वनांनखाली आहे .

देशातील पशुधन व कुक्कुटपालन यामध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे ७ व १० टक्के आहे.

जनगणना २०११ नुसार देशाच्या ७३ टक्के साक्षरता दाराच्या(literacy rate) तुलनेत राज्याचा साक्षरता दर ८२.३ टक्के होता.

भारताचा मानव विकास अहवाल २०११ अनुसार देशाचा मानव विकास निर्देशांक(Human Development Index) ०.४६७ आहे व ०.५७२ च्या मानव विकास निर्देशांकासह राज्याचा देशात ५ वा क्रमांक आहे.

महिला धोरण राबवणारे तसेच महिलाच्या विकासासाठी 'महिला व बालकल्याण' या स्वतंत्र विभागाची स्थापना करून अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. 'रोजगार हमी योजना' राबवणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्राने ही योजना अंगिकारली आहे.   


   

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.