महत्वाच्या पोस्ट

राज्य स्थरीय पुरस्कार (महाराष्ट्र) 2

"जनस्थान पुरस्कार"   

 हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.



 श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरूवात केली.

 हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी प्रदान केला जातो.

स्वरुप-एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.

२०१३: भालचंद्र नेमाडे
२०११: महेश एलकुंचवार
२००९: ना.धों. महानोर
२००७: बाबूराव बागूल
२००५: नारायण सुर्वे
२००३: मंगेश पाडगावकर
२००१: श्री.ना. पेंडसे
१९९९: व्यंकटेश माडगूळकर
१९९७: गंगाधर गाडगीळ
१९९५: इंदिरा संत
१९९३: विंदा करंदीकर
१९९१: विजय तेंडुलकर

"गदिमा पुरस्कार" 

हा पुरस्कार गदिमा प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या स्मरणार्थ दिला जातो.

 21 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, असे त्याचे स्वरूप आहे.

साहित्य, चित्रपट आणि कला क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जातो.

२०१२: संगीतकार यशवंत देव
२०११: अभिनेते दिलीप प्रभावळकर
२०१०: लेखक मधू मंगेश कर्णिक


"स्वरभास्कर  पुरस्कार" 

स्वरगंधर्व पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाचा ' स्वरभास्कर ' हा पुरस्कार पुणे महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आला आहे.

एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असेल .

२०११: गानकोकिळा लता मंगेशकर
२०१२: पं. बिरजू महाराज

"लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार" 

पत्रकारितेत राष्ट्रीय पातळीवर लक्षणीय कामगिरी करणा-यांना केसरी-मराठा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 २०१२-१३: विनोद मेहता(‘आऊटलूक समूह’)
 २०११-१२: श्रवण गर्ग(‘भास्कर’)
 २०१०-११: एच. के. दुआ


"बालगंधर्व पुरस्कार"

प्रतिवर्षी पुणे महापालिकेतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

51 हजार रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

2013: अभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे
2012: पं. विनायक वसंत थोरात


"महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा"

2009: विजय बनकर (पुणे)
2010: समाधान घोडके (सोलापूर)
2011: नरसिंघ यादव (मुंबई)
2012: नरसिंघ यादव (मुंबई)


महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (५०वे वर्ष) 

सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
प्रथम - काकस्पर्श (दिग्द. - महेश मांजरेकर/निर्माते - अनिरुद्ध देशपांडे व मेधा मांजरेकर)
द्वितीय - तुकाराम (दिग्द. - चंद्रकांत कुलकर्णी/निर्माते - संजय छाब्रिया)
तृतीय - अजिंठा (दिग्द. - नितीन देसाई/निर्माते - नितीन चंद्रकांत देसाई)
सामाजिक प्रश्‍न हाताळणारा चित्रपट - श्‍यामचे वडील (दिग्द. - आर. विराज/निर्माते - अजय पाठक)
ग्रामीण प्रश्‍न हाताळणारा चित्रपट - धग (दिग्द. - शिवाजी लोटन पाटील/निर्माते - विशाल गवारे)
- राज काझी

सर्वोत्कृष्ट कथा - उषा दातार (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट पटकथा - रवी जाधव, अंबर हडप व गणेश पंडित (बालक पालक)
सर्वोत्कृष्ट संवाद - संजय पवार (भारतीय)
सर्वोत्कृष्ट संगीत - कौशल इनामदार (अजिंठा)
सर्वोत्कृष्ट गीत - ना. धों. महानोर (मन चिंब पावसाळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट गायक - ज्ञानेश्‍वर मेश्राम (जगण्याचा पाया... तुकाराम)
सर्वोत्कृष्ट गायिका - हंसिका अय्यर (मन चिंब पावसाळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - सुभाष नकाशे (लाल होळी... अजिंठा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (निर्माता) - विवा इन व रवी जाधव (बालक पालक)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक) - निखिल महाजन (पुणे 52).
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - श्‍वेता साळवी (कुरुक्षेत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - हंसराज जगताप (धग)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - विजय पाटकर (लावू का लाथ)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता - अरुण नलावडे (शूर आम्ही सरदार)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - मृण्मयी देशपांडे (मोकळा श्‍वास)
विशेष पुरस्कार (अभिनेता) - उमेश कामत (परिस)
विशेष पुरस्कार (अभिनेत्री) - हेमांगी कवी (पिपाणी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) - उषा जाधव (धग)/प्रिया बापट (काकस्पर्श)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सचिन खेडेकर (काकस्पर्श)

"चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारा"-पंढरीनाथ जुकर
"राज कपूर जीवनगौरव पुरस्कारा"-दिग्दर्शक बासू चटर्जी



No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.