महत्वाच्या पोस्ट

अणुविज्ञान- प्रश्नमंजुषा (३७)

Mpsc Nuclear Science- Multiple Choice Questions                                             

                          



१) केंद्रकीय विखंडन संबंधी खालील विधाने पहा.

a) जेव्हा एखाद्या अस्थिर जड मुलद्रव्याच्या केंद्रकावर उच्च उर्जा असलेल्या न्यूट्रॉन्सचा मारा केला जातो, तेव्हा त्या केंद्रकाचे विखंडन होऊन कमी वस्तुमान असलेल्या दोन अणू केंद्रकात रुपांतर होते. या प्रक्रियेत प्रचंड उर्जा निर्मिती होते.
b) U-235 च्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रीप्टोन(Kr) व बेरियम(Ba) हि कमी वस्तुमानाची केंद्रके तयार होतात आणि प्रचंड प्रमाणात उर्जा निर्माण होते.
c) केंद्रकाचे विखंडन होण्यासाठी आवश्यक असणार्या उर्जेला क्रांतिक उर्जा(Critical Energy) म्हणतात.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) काही पदार्थांतून जाताना न्यूट्रॉन्सचा वेग कमी होतो. अशापैकी एक म्हणजे कार्बनचे शुद्ध स्वरूप असलेले ग्राफाईट. अशा पदार्थांना मंदायक(moderator) म्हटले जाते.
b) न्यूट्रॉन्स शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करणाऱ्यांना नियंत्रक म्हणतात. बोरॉन, कॅडमियम हे नियंत्रक म्हणून वापरतात.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) अनु भट्टीत तयार होणारा कचरा शिशाचा जड पत्र असलेल्या भक्कम पेटीत ठेवतात.
b) कारण गामा किरण फक्त शिशाचा जड पात्राच अडवू शकतो.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) 'Deuteron' संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) 'Deuteron' ची संमिलन प्रक्रिया घडवून आणून उर्जा मिळवणे हा सुद्धा उर्जेचा एक खात्रीलायक स्त्रोत आहे.
b) निसर्गतः समुद्राच्या पाण्यात 'Deuteron' सापडते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) युरेनिअम संबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) निसर्गात 'Pitchblende' या खनिजापासून युरेनिअम मिळवले जाते.
b) काही विशेष प्रक्रियांच्या आधारे नैसर्गिक युरेनिअममधिल U-235 चे प्रमाण वाढवण्याच्या प्रक्रियेला युरेनिअम संवर्धन(Uranium Enrichment) असे म्हणतात.
c) अनु विद्युत निर्मितीसाठी ३ ते ५% संवर्धन केले जाते. मात्र अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी ८५% आवश्यकता असते.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. फक्त a)
  D. फक्त d)

सामान्य विज्ञान प्रश्नमंजुषा

६) खलील दोन विधाने पहा.

a) दोन हलक्या वजनाच्या अनु केंद्राकांचा संयोग होऊन त्यापासून जास्त वजनाचे व स्थिर अनुकेंद्रक तयार करण्याच्या प्रक्रियेला केंद्रकीय संमिलन असे म्हणतात.
b) हायड्रोजनच्या ४ केंद्राकांचा संयोग घडवून आणल्यास त्यापासून हेलिअमचे एक केंद्रक तयार होते व उर्जा निर्मिती होते.
c) सूर्यापासून निघणार प्रकाश हा केंद्रकीय संमिलन या प्रक्रियेतून निर्माण झालेला असतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
७) हायड्रोजन बॉम्बसंबंधी खालील विधाने पहा.

a) हायड्रोजन बॉम्बचे कार्य केंद्रकीय साम्मिलनावर आधारित असते.
b) हायड्रोजन केंद्राकांचा संयोग घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेले अत्युच्य तापमान मिळवण्यासाठी तेथे प्रथम केंद्रकीय विखंडन घडवून आणले जाते.
c) Edward Teller हा हायड्रोजन बॉम्बचा जनक होय.

  A. वरील सर्व बरोबर
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) अल्फा किरण म्हणजे हेलीअमचे अनु केंद्रक असून ते धन विद्युतप्रभारित असतात. त्यांची भेदक शक्ती 'क्ष ' किरणांपेक्षा कमी असते.
b) बीटा किरण म्हणजे निव्वळ इलेक्ट्रॉन असतात. त्यांची भेदक शक्ती अल्फा कानांच्या भेद्शक्तीच्या १०० पट अधिक असते.
c) गामा किरण म्हणजे लाघुप्रकाशलहरी असतात. त्यांची भेदानशक्ती 'क्ष' किरणांपेक्षा जास्त असते. त्यांवर कोणताही प्रभार नसतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या एकूण वस्तुमानाच्या निम्या वस्तुमानाचे विघटन होण्यासाठी जो काळ लागतो त्यास त्या मूलद्रव्याचे अर्धआयुष्य असे म्हणतात.
b) रेडियोकार्बन वायामापन या पद्धतीच्या सहाय्याने भूतकाळातील वनस्पती व प्राण्यांच्या वयाचे मोजमाप केले जाते. त्यामध्ये C14 या कार्बनच्या किरणोत्सारी सामस्थानिकाचा वापर केला जातो.
c) C14 चे अर्ध आयुष्यकाल ५७३० वर्ष आहे. या पद्धतीचा विकास 'Willard Libby' या संशोकाने केला.

  A. फक्त a) बरोबर
  B. a),b) आणी c) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) THALLIUM-२०१ या किरणोत्सारी सामस्थानिकाचा उपयोग हृदयातून रक्तप्रवाहाचा मार्ग शोधण्यासाठी होतो.
b) आर्सेनिक-७४ या किरणोत्सारी सामस्थानिकाचा उपयोग शरीरातील गाठींचा शोध घेण्यसाठी होतो.
c) आयोडीन-१३१ या किरणोत्सारी सामस्थानिकाचा उपयोग थायरॉईड ग्रंथींचे काम योग्य रीतीने चालू आहे कि नाही बघण्यासाठी होतो.
d) कोबाल्ट- ६० या किरणोत्सारी सामस्थानिकाचा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी होतो.
e) आयोडीन- १२५ या किरणोत्सारी सामस्थानिकाचा उपयोग डोळ्यांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी होतो.

  A. a),C),E)
  B. b),c),d)
  C. b) आणि d)
  D. एकही नाही


MPSC Prelims Syllabus


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.