Systematic Voters' Education And Electoral Participation
निवडणुका सर्वसमावेशक बनवण्यासाठी
आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर विश्वास ठेवत, अशी प्रतिज्ञा करतो की देशाची लोकशाही परंपरा तसेच मुक्त, न्यायीक आणि शांततापूर्ण निवडणुकांची प्रतिमा कायम ठेवून आणि प्रत्येक निवडणुकांमध्ये निर्भयपणे तसेच कुठल्याही धर्म, स्पर्धा, जात, समाज, भाषांच्या विचारांना किंवा अन्य प्रलोभनांना न विसरता मतदान करु.
गेल्या तीन वर्षात देशातील नवीन पात्र मतदारांमध्ये ही प्रतिज्ञा बरीच लोकप्रिय झाली. तसेच देशातील निवडणुकांबद्दलचा युवा वर्गाचा दृष्टीकोनही प्रतिज्ञेमुळे बदलला. यासाठी SVEEP (सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन) यांचे आभार मानले पाहिजेत. SVEEP चे हे पाऊल भारतीय निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आले.
मतदानातील मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी SVEEP ने निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक गोष्टींना प्रोत्साहन दिले. गेल्या तीन वर्षात मतदार नोंदणीतील विशेषतः युवा वर्गाच्या सहभागामध्ये 10-15 टक्क्यांवरुन 30-35 टक्के वाढ झाली आहे. 2010 पासूनच्या सर्व राज्यातील निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. यात युवा आणि महिला वर्गाचा मोठया प्रमाणावर सहभाग होता.
पार्श्वभूमी
निवडणूक व्यवस्थापन प्रक्रियेत मतदार नोंदणी आणि मतदारांना शिक्षण या बाबी केंद्रस्थानी आहेत. तथापि गुणवत्ता आणि आकडेवारीचा विचार करता देशातील मतदारांचा सहभाग, आदर्श लोकशाहीपासून अजून बराच दूर आहे. तथापि नोंदणी, मतदान ओळखपत्र/ओळखीचा पुरावा, मतदानाचे ठिकाण, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर, मतदानाची वेळ, आदर्श आचारसंहितेसंदर्भातील करावयाच्या आणि न करावयाच्या गोष्टी, मतदारांच्या दुर्लक्षित घटकाला भुलवण्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या सहका-यांकडून पैसा/शक्तीचा वापर इत्यादी गोष्टींच्या बाबतीत मतदारांना 'काय माहिती असायला हवे' आणि त्यांना काय माहिती आहे यात बरेच अंतर आहे. मतदार जनजागृतीमुळे मतदार मतदानासाठी नेहमीच प्रोत्साहित झाल्याचे आतापर्यंतच्या निरिक्षणातून दिसत नाही. मतदार जनजागृती आणि मतदानामध्ये वृध्दी करण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन (SVEEP) प्रोग्रॅम स्थापन करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलत त्याद्वारे मतदारांना जागरुक, शिक्षित, प्रोत्साहित करुन भारतीय लोकशाही अधिक सर्वसमावेशक आणि अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
यशस्वीता
निवडणूक जनजागृती आणि मतदानात यासंदर्भात असलेली घट या मुद्दयांवर तात्काळ प्रकाश टाकण्यासाठी ECI ने 2010 मध्ये आपल्या हिरक महोत्सवी वर्षात मजबूत लोकशाहीसाठी अधिक सहभाग ही संकल्पना निवडली. याच वर्षात बिहार विधानसभा निवडणूकांबरोबर देशाच्या सर्वात मोठया मतदार सहभाग कार्यक्रमाला अर्थात SVEEP ला सुरुवात झाली. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर SVEEP म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील लोकांचा सहभाग वाढविण्यासाठीचे धोरणात्मक पाऊल आणि कार्य होय. माहिती, प्रोत्साहन आणि सुलभीकरणातील निवडणुकांतील मतदार वर्ग वाढवण्यासाठी SVEEP द्वारे विविध प्रयत्न केले जात आहेत. 2009 च्या अखेरीला झारखंड निवडणूकांमध्ये नियोजित IEC चा (इर्न्फमेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन) अंतर्भाव करण्यात आला जो नंतर SVEEP कार्यक्रमाच्या रुपात 2010 च्या बिहार विधानसभा निवडणुका आणि तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि 2011 मध्ये पॉंडेचेरी विधानसभा निवडणूकांमध्ये आणण्यात आला. हाच कार्यक्रम पुढे उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आणि पुन्हा हिमाचल प्रदेशामध्ये दोन सर्वसाधारण निवडणुकांसाठी आणि 2012 मध्ये गुजरात तर 2013 मध्ये त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांच्या निवडणुकांसाठी कायम ठेवण्यात आला.
राज्य आणि जिल्हा पातळीवरील SVEEP योजनेची मांडणी
ECI ने राज्य पातळीवर काही संघटनात्मक बदल सुरु केले आणि SVEEP च्या कार्याबरोबर समन्वय साधण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य तसेच जिल्हा पातळीवर प्रमुख गट स्थापन केले. राज्य आणि जिल्हा स्तरीय योजना संपूर्ण वर्षभरासाठी तयार करण्यात आल्या. या योजना राष्ट्रीय आराखडयाला अनुरुप असल्या पाहिजेत, आयोगाकडून योजला पाहिजेत. मात्र प्रत्येक पातळीवर योग्य लवचिकता आणि विश्वासर्हता दिली गेली पाहिजे.
सहयोग
18-19 वर्ष वयोगटातील नवीन मतदारांची माहिती मिळवण्यासाठी, युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच मतदार नोंदणी सुरळीत होण्याकरिता त्यांचे सहकार्य घेण्यासाठी निवडणूक आयोगाने NYKS, NSS, NCC अशा शैक्षणिक संस्था आणि युवा संघटनांचे सहकार्य घेतले आहे. ECI ने केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य, शिक्षण, WCD, सहकार, समाजकल्याण आदी विभागांच्या सहयोगाने निवडणूकीसंदर्भातील जागृतीचे कार्य सुरु केले आहे. सरकार, खासगी प्रसार माध्यमे, स्थानिक सोसायटी आणि स्वयंसेवी संस्थांबरोबरच्या सहकार्यामुळे निवडणूक सहभागासंदर्भातील लोकांच्या जागृतीत वाढ झाली आहे.
ECI ने 2013 मध्ये NLMA अर्थात राष्ट्रीय साक्षरता आयोग प्राधिकरणाबरोबर सामंजस्य करार केला. यानंतर भारत सरकारच्या साक्षर भारत कार्यक्रमामध्ये निवडणूक साक्षरता हा एक प्रमुख घटक बनला. मतदार शिक्षणासंदर्भातही ECI आणि UNDP मध्ये करार झाला आहे. डिसेंबर 2013 पासून ''कॅम्पसमधील अॅम्बेसेडर्स' संकल्पना सुरु करण्यात आली आहे. कॅम्प्समधील विदयार्थी हा या आयोगाच्या राजदूताची भूमिका साकारत SVEEP कार्यक्रम अधिक सोपा करेल. आता तर खासगी प्रसार माध्यमे आणि सहकार क्षेत्रही यात समाविष्ट होऊन ECI च्या SVEEP कार्यक्रमासाठी मदतीचे हात देत आहेत.
SVEEP धोरणाअंतर्गत सुविधा
मतदार नोंदणी, प्रक्रिया, मतदार ओळखपत्र वाटप प्रक्रिया मतदारांसाठी सोप्या सुलभ व्हाव्यात यासाठी SVEEP ने नवीन उपाय सुरु केले आहेत. तसेच निवडणूक प्रक्रिया मतदाराभिमुख व्हावी यासाठी SVEEP ने काही मार्ग सुचवले आहेत. याअंतर्गत सर्व जिल्हयांमध्ये मतदारांसाठी हेल्पलाईन, इंटरनेट आणि SMS च्या माध्यमातून मतदार यादीत नाव शोधणे, मतदार सुविधा केंद्र, आदर्श मतदार कक्ष, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्यासंदर्भातील शिबीरे, मतदार स्लिप, मतदानासाठी EPIC व्यतिरिक्त इतर ओळखपत्र ग्राहय धरणे आदी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय मतदार दिन
मोठया लोकसंख्येला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ECI ने 2011 पासून आपल्या स्थापना दिनाच्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्याचे ठरवले. SVEEP च्या विविध उपायांपैकी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. प्रत्येक नागरिकाला त्याचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 'मतदार नोंदणीत वाढ' या उद्देशाने दरवर्षी 25 जानेवारी हा 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा केला जातो तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने नवीन पिढीमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिनाचा भाग म्हणून सुमारे 8 लाख मतदार केंद्रातील नवीन मतदार नोंदणी केलेल्या सर्व पात्र मतदारांना ECI सुविधा पुरवली जाते. मतदारांना त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र आणि 'मतदार असल्याचा गर्व आहे मतदानाला तयार आहोत असे घोषवाक्य असलेला बिल्ला दिला जातो. निवडणूकीत सहभागी होऊन लोकशाही मजबूतीकरणाची शपथही घेतात. 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिन मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी देशभरात परिसंवाद, सायकल रॅली, मानवीसाखळी, लोककला कार्यक्रम, मिनी-मॅरेथॉन, स्पर्धा आणि जनजागृतीपर शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
No comments:
Post a Comment