महत्वाच्या पोस्ट

अर्थव्यवस्था


Market Economy


अर्थव्यवस्था : स्वरूप 

उत्पादन, विभाजन, विनिमय, आणि उपभोग या चार प्रकारच्या व्यवहारांना 'आर्थिक व्यवहार' म्हणतात. या चार व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या समुच्चयाला 'अर्थव्यवस्था' असे म्हणतात.  

उत्पादन साधनसंपत्तीच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे खालील प्रकार पडतात. 

१) भांडवलशाही अर्थव्यवस्था (Capitalistic Economy):

वैशिष्ट्ये- 
या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात आणि उत्पादनाचे कार्य आणि उत्पादनाचे विभाजन बाजारयंत्रानेकरवी होते.
भांडवलशाही प्रकारच्या आर्थाव्यावास्थेमध्ये सरकारचे नियंत्रण आणि हस्तक्षेप नसतो.  
खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहिचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. 
किंमत ठरवण्याची प्रक्रिया मुक्तपणे चलते. तिला "Laissez Faire" (हस्थक्षेप-विरहित) असेही म्हणतात. 
वस्तू व सेवांच्या किंमती बाजारात मागणी व पुरवठ्याच्या परस्पर संयोगाने ठरतात.म्हणून भांडवलशाहीला 'बाजार अर्थव्यवस्था' (Market Economy) असेही म्हणतात. 
नफा मिळवण्याच्या हेतूने उत्पादन केले जाते. 

दोष- 
आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता वाढते. 
नफा कमावणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने समाज कल्याणाचा विचार केला जात नाही. 

२) समाजवादी अर्थव्यवस्था (Socialistic Economy): 

वैशिष्ट्ये- 
या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सार्वजनिक मालकीची असतात आणि उत्तपादनाचे कार्य आणि विभाजन सरकारमार्फतच होते. 
वस्तू आणि सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. 
समाजकल्याणाच्या हेतूने वस्तू आणि सेवांचे उत्पादन घेतले जाते. 

दोष- 
व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप. 
सरकारी नियंत्रणाचा अतिरेक. 
साधनसामग्रीचा अपव्यय. 
कर्यक्षमता, उत्पादकता कमी होणे. 

३) मिश्र अर्थव्यवस्था (Mixed Economy):

मिश्र प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचे सहस्थित्व असते. 
भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरुपाची अर्थव्यवस्था आहे. 

आर्थाव्यावास्थेची क्षेत्रे(Sectors of Economy) :

व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची खालील क्षेत्रांमध्ये विभागणी होते-

प्राथमिक क्षेत्रे (Primary Sector)- या क्षेत्रात नैसर्गिक साधनसामुग्री संबंधित शेती, जंगलसंपत्ती, खाणी आणि खनिज उत्पादने यांचा समावेश होतो. 

द्वितीयक क्षेत्रे (Secondary Sector)- प्राथमिक क्षेत्रातील साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपयोगितेची उत्पादने निर्माण करते. या क्षेत्रात कारखानदारी, बांधकाम, विज निर्मिती यांचा समावेश होतो. 

तृतीयक क्षेत्रे (Tertiary Sector)- या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीयक क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. उदा. वाहतूक, दळणवळण, प्रशासकीय. 

चतुर्थक क्षेत्रे (Quaternary Sector)- या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश  होतो. असे व्यायसाय उच्च ज्ञानशी संबंधित असून त्याचा संबंध संकल्पनेची निर्मिती,संशोधन व विकास यांच्याशी असतो. उदा. संशोदन व विकास. 

पंचम क्षेत्रे- यामध्ये समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. 

मालकीनुसार अर्थव्यवस्थेची खालील क्षेत्रांमध्ये विभागणी होते-

सार्वजनिक क्षेत्रे (Public Sector)- या क्षेत्रावर सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते. उदा. रेल्वे,शस्त्रास्त्रे. 

खाजगी क्षेत्र (Private Sector)- यावर खाजगी व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहाची मालकी व नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी उद्योगांचे मुलभूत उद्दिष्ठ असते. उदा.कृषी,व्यापार. 

संयुक्त क्षेत्रे (Joint Sector)- सरकार तसेच खाजगी व्यक्ती यांची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते. 

सहकार क्षेत्रे (Co-operative Sector)- या क्षेत्रात सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा/उद्योगांचा समावेश होतो.सहकारात मालकी खजगीच पण व्यक्तिएवजि समूहाची असते. सहकार लोकशाही तत्त्वानुसार चालते.     


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.