महत्वाच्या पोस्ट

कर संरचना

Taxation


जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय. 

  • कर हे सक्तीचे देणे असते. 
  • एखाद्या व्यक्तीने कर म्हणून सरकारला दिलेली रक्कम व सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे त्या व्यक्तीस मिळणारा लाभ यांमध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो. 
  • घटनेच्या कलम २६५ नुसार सरकारला कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार कर आकारता येतो. 

करासंबंधी काही संज्ञा:
  • लॉफर वक्ररेषा (Laffer Curve) - कराचा दर आणि त्यातून प्राप्त कर महसुल, यांमधील संबंधाचे आलेखरूप प्रदर्शन म्हणजे लॉफर वक्ररेषा होय. कारचा असा एक पर्याप्त दर असतो जेव्हा सरकारी कर महसुल महत्तम असतो. या पर्याप्त दरापेक्षा कारचा दर कमी किंवा जास्त असला तरी सरकारी महसुल कमी प्राप्त होतो. 

  • काराघात (Impact of Taxation) - कायद्याने सरकारला कर भरण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीची असते त्यावर कारघात पडला असे म्हटले जाते. 

  • कारभार (Incidence of Taxation) - ज्या व्यक्तीला वास्तविक कराचे ओझे सोसून स्वताच्या उत्पन्नातून कर भरावे लागते त्याला कारभार असे म्हणतात. उदा. व्यापारी कर सरकारकडे भारत असला तरी कारचा भर हा ग्राहकाला सोसावा लागतो.    

  • कर संक्रमण (Shifting of Tax Burden) - एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कराची जबाबदारी ढकलणे, त्यास कर संक्रमण असे म्हणतात. 

करांचे वर्गीकरण : 

  •  प्रगतीशील कर (Progressive Tax)- व्यक्तीच्या उत्पन्नाच्या वाढीबरोबरच या करांचा दर देखील वाढत जातो. या कारला 'सामाजिक न्यायाचा' कर  म्हणतात. या काराने गरीब व श्रीमंत दरी कमी होण्यास मदत होते. 

  • प्रतिगामी कर (Regressive Tax)- या करत उत्पन्न वाढताना कर दारात वाढ न होता करदर कमी होत जातो. 

  • समप्रमाणात कर (Proportionate Tax)- उत्पन्नात जरी बदल झाला तरी करदर समान राहतो. उदा. विक्रीकर, करमणूक कर. 

  • प्रत्यक्ष कर (Direct Tax)- ज्या करांच्या बाबतीत करभार आणि करघात एकाच व्यक्तीवर पडतो त्या करांस प्रत्यक्ष कर असे म्हणतात. उदा. उत्पन्न कर. 

  • अप्रत्यक्ष कर (Indirect Tax)- ज्या करांच्या बाबतीत करघात एका व्यक्तीवर व कारभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो, त्या करांस अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. उदा. वस्तू व सेवांवरील कर. या करामुळे किंमती वाढतात. गरीब व श्रीमंत यांना हा कर सामानच भरावा लागतो. 

करविषयक राज्याघातनेतील तरतुदी :

केंद्र व राज्ये यांच्यात आर्थिक समतोल साधण्यासाठी घटनाकारांनी घटनेतच उत्पन्न विभागणीची तरतूद करून ठेवली आहे. 

१. जे कर केंद्र सरकारकडून आकारले जातात, वसूल केले जातात व उत्पन्न सर्व केंद्र सरकारलाच मिळते असे कर-
      आयकारावरील अधिभार 
      महामंडळ कर / निगम कर 
      सीमा शुल्क / कस्टम ड्युटी 

२. जे कर केंद्र सरकारकडून आकारले जातात, वसूल केले जातात, परंतु त्याची वाटणी केंद्र व राज्य सरकारांत केली जाते असे कर -
      शेती उत्पन्नाव्यातिरिक्त वायक्त्तिक आय कर 
      केंद्रीय उत्पादन शुल्क / अबकारी कर 

३. जे कर केंद्र सरकारकडून आकारले जातात व वसूल केले जातात पण सर्व उत्पन्न राज्य सरकारांना मिळते असे कर-
      शेत जमिनीव्यतिरिक्त इतर उत्पन्नावरील वारसा कर, संपत्तीकर 
      वृत्तपत्रांची खरेदी विक्री व त्यातील जाहिरातींवरील कर 
      रेल्वे, समुद्र किंवा विमान मार्गाने प्रवास करणारे उतरू व मालांवरील कर 

४. जे कर केंद्र सरकार आकारते, वसुली मात्र राज्यांनी करावयाची असते व उत्पन्नही राज्यांनाच मिळते असे कर -
      मुद्रांक शुल्क 
      औषधे व सौंदर्यप्रसाधने यांवरील अबकारी कर.      


Read More:प्रश्नमंजुषा(६) भारतीय अर्थव्यवस्था
Read More:अर्थसंकल्प

  

          

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.