महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(१७) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या 'रोशनी' या योजनेबाबत पुढील विधांनांचा विचार करा.

a) नक्षलग्रस्त व आदिवासी तरुण मुला-मुलींचे रोजगार पूरक असे कौशल्ये निर्माण करणे.
b) या योजनेला केंद्र सरकार व राज्य सरकार यांकडून ७५:२५ या प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्यात येईल.
c) या योजनेमध्ये 18 ते 35 या वयोगटातील तरुंनांना लक्ष कार्यात येईल.

वरील कोणती विधाने चूक आहेत?
  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) पाकिस्तानच्या 27 व्या पंतप्रधानपदी 'नवाज शरीफ' यांची निवड झाली.
b) नवाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची दुसर्‍यांदा शपथ घेतली.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

a) सेबी ही भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्या संस्था आहे.
b) सेबीने नुकतेच आपल्या स्थापनेची २५ वर्षे पूर्ण केली.
c) सेबीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व

------------------------------------------------------------------------
४) 'रफेल नदाल' संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत?

a) फ्रेंच ओपन आठव्यानदा जिंकलेला तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
b) एकाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत आठ विजेतेपदक जिंकलेला पहिला टेनिसपटूही तोच आहे.
c) 'रफेल नदाल' हा स्पेन देशाचा नागरिक आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त c)

-------------------------------------------------------------------------
५) 'अभिजात भाषा' संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत.

a) मल्याळम भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.
b) अभिजात भाषा म्हणजे ज्या प्राचीन आहेत, स्वतंत्र आहेत आणि ज्या कोणत्याही दुसर्‍या परंपरेपासून तयार केल्या गेलेल्या नाही.
c) सध्या देशात एकूण पाच अभिजात भाषा आहेत.
d) हिंदी ही अभिजात भाषा आहे.

  A. a), b) आणि c)
  B. b), c) आणि d)
  C. a), c) आणि d)
  D. a), b) आणि d)

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने विचारात घ्या?

a) हिमाचल प्रदेशातील पालमपुर येथील 'इंस्टीट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलजी' या संस्थेने भारतातील पहिली बिनकाट्याची गुलाबाची जात विकसित केली आहे.
b) या गुलाबाचे नामकरण 'हिमालयन वंडर' असे करण्यात आले आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) खलील विधाने विचारात घ्या:

a) 'बॅलिस्टिक मिसाइल डिफेंस शील्ड' कार्यक्रमाआंतर्गत डीआरडीओ ने आपला पहिला टप्पा पूर्ण केला.
b) पहिल्या टप्प्यात बीएमडी शील्ड ची क्षमता शत्रूचा 2000 की. मी. आंतरवरून झालेला हल्ला परतवून लावण्याची आहे ते दिल्लीत तैनात करण्यात येणार आहे.
c) दुसर्‍या टप्प्यात 5000 की. मी. पर्यंत क्षमता वाढवण्यात येईल.

  A. फक्त a) बरोबर
  B. a), b), c) बरोबर
  C. b) आणि c) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) अन्न सुरक्षा विधेयकाबाबत खलील विधाने पहा.

a) प्राधान्य गटासाठी धान्याचे प्रमाण दरमहा प्रतिव्यक्ती ७ किलो व दर १ रु. भरड धान्य, २ रु. गहू व ३ रु. तांदूळ असे असतील. सर्वसाधारण गटाला धान्याचे प्रमाण दरमहा प्रतिव्यक्ती ३ किलो.
b) प्रत्‍येक गरोदर व स्‍तनदा मातेला एकवेळचे जेवण स्‍थानिक अंगणवाडीद्वारे मोफत मिळेल तसेच अन्‍य पौष्टिक आहारासाठी दर महिन्‍याला 1000 रु. प्रमाणे 6 महिने मातृत्‍व लाभ मिळेल.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
९) रिजर्व बँक ऑफ इंडिया चे २३वे गव्हर्नर म्हणून कोणाची निवड झाली?

  A. आनंद सिन्हा
  B. सुबीर गोकर्ण
  C. मनमोहन सिंह
  D. डॉ. रघुराम राजन

-------------------------------------------------------------------------
१०) नुकतेच मायक्रोसॉफ्ट ने फिनलंड येथे मुख्यालय असलेली कोणती मोबाइल कंपनी विकत घेतली आहे?

  A. आय बॉल
  B. कारबोन
  C. नोकीया
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.