महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(१८) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

a) दमास्कस ही सीरियाची राजधानी आहे.
b) रसायनिक शस्त्रांच्या वापरामुळे अमेरिकेने याविरोधात सीरियावर लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
c) होस्नी मुबारक हे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. वरील सर्व

----------------------------------------------------------------------
२) खलील तीन विधाने पहा.

a) दौलत बेग ओल्डि जगातील सर्वाधिक उंच ठिकाणी असलेली विमानाच्या उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी धावपट्टी आहे.
b) नुकतेच चीनच्या पीपल्स लिबरेशन लष्कराच्या सैन्याने या भगत 19 km घुसखोरी केली होती.
c) भारताने भारताने DBO या धावपट्टीवर नुकतेच आपल्या C 130 J-30 Super Hercules या विमानाचे यशस्वी लँडिंग केले.

   A. फक्त a) बरोबर
   B. a), b), c) बरोबर
   C. b) आणि c) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

  A. जयराम रमेश
  B. डॉ. माधव गाडगीळ
  C. एन. श्रीनिवासन
  D. पृथ्वीराज चव्हाण

------------------------------------------------------------------------
४) 'अबेल पुरस्कार' कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

  A. सामाजिक कार्य
  B. गणित
  C. साहित्य आणि संगीत
  D. विज्ञान

-------------------------------------------------------------------------
५) मानव विकास निर्देशांकाबद्दल खलील विधांनांचा विचार करा.

a) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम(UNDP) ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करते.
b) हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.
c) पाकिस्तानी अर्थत़ज्ज्ञ महबूब उल हक ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली.
d) २०१३ च्या अहवालानुसार १८७ देशांच्या यादीत भारताचे स्थान ४४ वे आहे.
वरील कोणती विधाने चूक आहेत?

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. एकही नाही
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) जागतिक बँक गटामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थांचा समावेश होतो?

a) International Bank for Reconstruction and Development (IBRD)
b)International Finance Corporation (IFC)
c) International Development Association (IDA)
d) International Centre for Settlement of Investment Disputes (ICSID)
e) Multilateral Investment Guarantee Agency (MIGA)

  A. a), b) ,c),d) आणि e)
  B. b), c) आणि d)
  C. a), c) आणि d)
  D. a), b) आणि d)

-------------------------------------------------------------------------
७) खलील विधाने विचारात घ्या:

a) एलेन जॉन्सन-सर्लिफ या लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्ष आहेत.
b) त्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या आफ्रिकन देशांतील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत.
c) 2012 सालचे इंदिरा गांधी शांती पुरस्कार नुकतेच दिल्ली येथे त्यांना देण्यात आले.

  A. a) बरोबर
  B. a), b), c) बरोबर
  C. b) आणि c) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
८) अग्नी-५ या क्षेपणास्त्रा बाबत पुढील विधांनांचा विचार करा.

a) अग्नी-५ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.
b)अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची दहा हजार किलोमीटपर्यंत मारकक्षमता आहे.
c)संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असलेल्या पाच देशांव्यतिरिक्त अशी क्षमता सिद्ध करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व

-------------------------------------------------------------------------
९) भारताचे नवे नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

  A. शशिकांत शर्मा
  B. निर्भय शर्मा
  C. ए के रॉय
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
१०) 2013 सालचा आंतराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार कोणी जिंकला?

  A. लीडिया डेविस
  B. फिलिप रोथ
  C. हिलारी मंटेल
  D. अरविन्द अडीगा

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.