महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२४) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन(A) व त्याचे कारण(R) यांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

प्रतिपादन(A):२७ ऑक्टोबर हा दिवस पायदळ दिन (Infantry Day) म्हणून साजरा केला जातो.
कारण(R):काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहावा म्हणून २७ ऑक्टोबर १९४७ ला विमानाद्वारे पायदळाची पहिली तुकडी काश्मीरमध्ये उतरवण्यात आली.

  A. (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत व (R) हे (A) चे योग्य कारण आहे.
  B. (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत परंतु (R) हे (A) चे योग्य कारण नाही.
  C. (A) सत्य आहे पण (R) असत्या आहे.
  D. (A) असत्या आहे पण (R) सत्य आहे.

----------------------------------------------------------------------
२) ९७ व्या घटनादुरुस्तीसंबंधी खालील विधाने पहा.

a) सहकारी संस्था स्थापन करण्याचा भारतीय घटनेच्या कलम १९ खाली मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला.
b) राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वे या भागामध्ये कलम 43B चा समावेश करण्यात आला.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) खालीलपैकी कोणत्या देशांसोबत भारताने गुन्हेगार हस्तांतरण करार केला आहे?

a) बांग्लादेश
b) थायलंड
c) पाकीस्थान
d) अमेरिका

  A. a), b) आणि c)
  B. b), c) आणि d)
  C. a), c) आणि d)
  D. a), b) आणि d)

------------------------------------------------------------------------
४) खालीलपैकी कोण कोणत्या खेळाडूने एकदिवसीय सामन्यामध्ये २०० रन्स केले आहेत?

a) सचिन तेंडूलकर
b) रोहित शर्मा
c) वीरेंद्र सेहवाग
d) रिकी पोंटिंग
e) क्रिस गेल

  A. e), b) आणि c)
  B. b), c) आणि d)
  C. a), b) आणि c)
  D. a), b) आणि e)

-------------------------------------------------------------------------
५) खालील पैकी कोणता देशातील पहिला 'भूमिहीन विमुक्त जिल्हा' म्हणून ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी घोषित केला?

  A. रायगड (महाराष्ट्र)
  B. कन्नूर (केरळ)
  C. मदुराई (तामिळनाडू)
  D. रिवा (मध्य प्रदेश )

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने विचारात घ्या?

a) निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर मतदारांना नकाराधिकार बजावण्यासाठी "NOTA " असे लिहिलेले आयताकृती बटन हे निवडणूक चिन्ह म्हणून घोषित केले.
b) एखाद्या मतदारसंघात जर ५० टक्क्यांहून अधिक मतदारांनी 'NOTA'चं बटण दाबल्यास तिथे पुन्हा मतदान घ्यावं लागू शकतं.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील दोन विधाने पहा.

a) भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नुकतीच क्युबाचे माजी अध्यक्ष आणि क्युबन क्रांतीचे हिरो 'फिडेल कॅस्ट्रो' यांची भेट घेतली.
b) क्यूबा हा अलिप्त राष्ट्रगट चळवळ गटाचा संस्थापक सदस्य देशांपैकी आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) नुसार देशातील सर्वाधिक महिला गुन्हेगार कोणत्या राज्यात आहेत?

  A. बिहार
  B. उत्तरप्रदेश
  C. छत्तीसगड
  D. महाराष्ट्र

-------------------------------------------------------------------------
९) नुकतेच युरोपियन युनियने कोणत्या देशासोबत ४५ बिलिअन डॉलर्स चा "करन्सी स्वॅप करार" केला?

  A. भारत
  B. चीन
  C. इंडोनेशिया
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
१०) सातारा नगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला?

  A. बाबा आमटे
  B. अभय बंग
  C. अन्ना हजारे
  D. मेधा पाटकर

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.