महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२५) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) क्रायोजेनिक इंजिनमध्ये अतिशीत तापमानातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचा वापर इंधन म्हणून करण्यात येतो.
b) 'जीएसएलव्ही' प्रक्षेपक विकसित करण्यात यश आले, तर २००० ते २५०० किलोपर्यंतच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करता येणे शक्य होणार आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

----------------------------------------------------------------------
२) भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कारासंबंधी खालील विधाने पहा.

a) भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी 'रतन थिय्याम' यांना प्रदान करण्यात आला.
b) भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार सरहद संस्थेतर्फे देण्यात येतो.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
   B. एकही विधान बरोबर नाही
   C. विधान a) बरोबर b) नाही
   D. विधान b) बरोबर a) नाही

-----------------------------------------------------------------------
३) अवैध पद्धतीने कर्मचाऱ्यांचा व्हिसा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमेरिकन सरकारकडून कोणत्या भारतीय कंपनीला दंड ठोठावण्यात आला?

  A. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
  B. विप्रो
  C. एनआईआईटी
  D. इन्फोसिस

------------------------------------------------------------------------
४) मेट्रो मॅन ई श्रीधरन 'ऑर्डर ऑफ द राइजिंग सन- गोल्ड एंड सिल्वर स्टार' हा पुरस्कार नुकताच कोणत्या देशातर्फे प्रदान करण्यात आला?

  A. फ्रांस
  B. जर्मनी
  C. इंग्लंड
  D. जपान

-------------------------------------------------------------------------
५) कॉमनवेल्थ राष्ट्रप्रमुखांची (चोगम) बैठक कोणत्या देशात घेण्यात येणार आहे?

  A. बांग्लादेश
  B. श्रीलंका
  C. भारत
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
६) मिस युनिव्हर्स २०१३ स्पर्धेसंबंधी खालील विधाने पहा.

a) मिस युनिव्हर्स २०१३ स्पर्धेत मिस व्हेनेझुएला गॅब्रिएला इसलर यंदाची मिस युनिव्हर्स झाली.
b) ८६ देशांच्या सौंदर्यवतीमध्ये भारताची मानसी मोघे टॉप टेन पर्यंतच मजल मारू शकली.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) भास्कराचार्यांसंबंधी खालील विधाने पहा.

a) बाराव्या शतकातील प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचे ९०० वे जयंती वर्ष २०१४ मध्ये सुरू होणार आहे.
b) भास्कराचार्यांनी 'सिध्दांत शिरोमणी' हा गणितावरील ग्रंथाचे लेखन केले.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) ' द टाइम्स ऑफ इंडिया ' या अग्रगण्य वृत्तपत्राला १७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १७५ महत्त्वपूर्ण घटनांचा मागोवा घेणारे ' मोमेंटस टाइम्स ' हे पुस्तक सोमवारी नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले?

  A. मनमोहन सिंघ
  B. सोनिया गांधी
  C. मनोज तिवारी
  D. हमीद अन्सारी

-------------------------------------------------------------------------
९) खालील तीन विधाने विचारात घ्या.
a) महाराष्ट्राची महिला नेमबाज 'हीना सिद्धू' हिने म्युनिक, जर्मनी येथे झालेल्या 'आयएसएसएफ जागतिक चषक नेमबाजी' स्पर्धेत पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास घडवला.
b) १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हीना भारताची पहिली नेमबाज ठरली आहे.
c) यापूर्वी अंजली भागवत (२००२) आणि गगन नारंग (२००८) यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

  A. a) आणि b)
  B. a)आणि c)
  C. a), b)आणि c)
  D. फक्त a)

-------------------------------------------------------------------------
१०) 'विक्रम साराभाई जेष्ठ वैज्ञानिक' पुरस्काराने नुकतेच कोणाचा गौरव करण्यात आला?

  A. विजय भाटकर
  B. माधव गाडगीळ
  C. अनिल काकोडकर
  D. जयंत नारळीकर

-------------------------------------------------------------------------

3 comments:

  1. khup chan project aahe . sarvana yacha fayda hoil. thanx a lot

    ReplyDelete
  2. sir, तुम्ही या ब्लॉग वर multiple choice question कश्याच्या सहाय्याने पोस्ट करीत आहात? म्हणजे यासाठी काही apps वगैरे आहे का? कृपया करून सांगा सर, धन्यवाद.

    ReplyDelete

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.