महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(२९) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) 'जीएसएलव्ही' च्या संबंधी खालील विधाने पहा.

a) भारताच्या जीसॅट-१४ या कृत्रिम उपग्रहाचे स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ रॉकेटद्वारे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
b) क्रायोजेनिक तंत्रज्ञान अवगत असणाऱ्या अमेरिका , रशिया , चीन , जपान आणि फ्रान्स या मोजक्या पाच देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे.
c) जीएसएलव्हीच्या यशामुळे दोन टनांपेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता आपल्या देशाकडे आली असून भविष्यात अग्निबाणाच्या मदतीने भारतीय अंतराळवीर अवकाशातही जाऊ शकतील.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) केंद्र शासन आता लवकरच 'नेत्रा' नावाची इंटरनेट पाळत यंत्रणा कार्यान्वित करीत आह़े
b) 'नेत्रा' ही यंत्रणा 'सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक्स' व 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(डीआरडीओ)' यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आह़े.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) 'बिटकॉइन' हि संज्ञा कशाशी संबंधित आहे?

  A. प्लाटीनमचे नाणे
  B. डिजिटल चलन
  C. Android App
  D. यापैकी नाही

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) हृदय रुग्णाला किमान पाच वर्षांचे अधिकचे आयुष्य देऊ करणारे पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
b) कारमॅट या फ्रेंच बायोमेडिकल कंपनीने या हृदयाचे डिझाइन तयार केले असून, लिथियम-आयन बॅटरीवर ते चालते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) भूसंपादन विधेयाकासंबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) 'भूसंपादनातील न्याय्य भरपाई, पारदर्शकता आणि पुनर्वसन कायदा' १ जानेवारी २०१४ पासून लागू होणार आहे.
b) या विधेयकानुसार आता खासगी कंपन्यांना देशात कुठल्याही ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी जमीन संपादित करायची असेल तर त्यासाठी ८० टक्के जमीनमालक म्हणजे शेतकऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल.
c) सार्वजनिक आणि कंपन्या मिळून प्रकल्प उभारत असतील तर त्यासाठी संपादित करण्यात येणाऱ्या ७० टक्के जमीनमालकांची मंजुरी गरजेची असेल.
d) भूसंपादन करताना शहरी भागातल्या जमीन मालकांना बाजारभावापेक्षा दुप्पट तर ग्रामीण भागातल्या जमीन मालकांना चौपट अधिक भरपाई देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची निकडीची गरज असली तरी पैशाअभावी या सेवेचे अत्याधुनिकीकरण करता आलेले नाही. आता नीमशहरी रेल्वे कॉरिडॉर, हायस्पीड ट्रेन्स तसेच, खाणी ते बंदर अशा प्रकल्पाधारित रेल्वेमार्गांचा नव्याने विकास आणि अस्तित्वात असलेल्या मार्गाचे नूतनीकरण अशा तीन क्षेत्रात किती टक्के ' एफडीआय ' ला परवानगी देण्यात येणार आहे?

  A. ४९
  B. ७५
  C. १००
  D. ३५

-------------------------------------------------------------------------
७) शांघाय येथे शाखा सुरू करत ....... ही चीनमधील पहिली भारतीय खासगी बँक ठरली आहे?

  A. HDFC Bank
  B. Axis Bank
  C. ICICI Bank
  D. ING Vysya Bank

-------------------------------------------------------------------------
८) महिलांच्या सुरक्षेसाठी ' गार्डियन ' नावाचे मोबाइल अॅप विकसित केल्याची घोषणा कोणत्या कंपनीने केली?

  A. Apple
  B. SAMSUNG
  C. Microsoft
  D. Nokia

-------------------------------------------------------------------------
९) देशाच्या ६५ व्या प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास शिन्झो आबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?

  A. चीन
  B. जपान
  C. दक्षिण कोरिया
  D. भूतान

-------------------------------------------------------------------------
१०) आर्क्टिक खंडाकडून ताशी १०० किलोमीटर वेगाने हिमकण घेऊन येणाऱ्या 'पोलर व्हर्टेक्स' नामक वादळाने सध्या कोणत्या देशात धूमाकूळ घातला आहे?

  A. रशिया
  B. इंग्लंड
  C. जर्मनी
  D. अमेरिका

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.