महत्वाच्या पोस्ट

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना


rajiv gandhi jivandai aarogya yojana


ध्येये: दारिद्र्य रेशे खालील आणि दारिद्र रेशे वरील (पांढरी शिधा पत्रिका धारक वगळता)अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या करिता राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी (महाराष्ट्र सरकार उपक्रम) व नेशनल इंसुरंस का. लिमिटेड यांच्या तर्फे हि योजनाराबवली जात आहे..

योजना: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ३ वर्षात टप्याटप्याने राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ खालील आठ जिल्ह्यातील कुटुंबांना घेता येईल : गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई,मुंबई उपनगर

फायदे: या योजने अंतर्गत ९७२ शस्त्रक्रिया / औषधोपचार व १२१ फेरतापासणी उपचारांचा लाभ घेता येईल.


जनरल सर्जरी
ई ऍन टी सर्जरी
ओप्थाल्मोलोजी सर्जरी
गाय्नोकोलोजी एंड ओब्स्टेट्रिक्स सर्जरी
ओर्थोपेडिक सर्जरी एंड प्रोसीजर्स
सर्जीकल गेस्ट्रो एंन्टेरोलोजी
कार्डियाक एंड कार्डीयोथोरासिक सर्जरी
पेडीआट्रिक सर्जरी
जेनिटोयुरीनरी सिस्टम
१० न्यूरोसर्जरी
११ सर्जीकल ओन्कोलोजी
१२ मेडिकल ओन्कोलोजी
१३ रेड़ीयेसन ओन्कोलोजी
१४ प्लास्टिक सर्जरी
१५ बर्न्स
१६ पोली ट्रोमा
१७ प्रोस्थेसीस
१८ क्रिटिकल केर
१९ जनरल मेडिसिन
२० इन्फेक्सिय्स डिसीज़
२१ पेडियाट्रिक्स मेडिकल मेनेजमेंट
२२ कारडियोलोजी
२३ नेफ्रोलोजी
२४ न्यूरोलोजी
२५ पल्मोनोलोजी
२६ डरमेटोलोजी
२७ रेमेतोलोजी
२८ एंडोक्रिनोलोजी
२९ गेस्ट्रोइंट्रोलोजी
३० इंतर्वेंसनल रेडियोलोजी

उपभोक्ता कुटुंब: गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई आणि मुंबई उपनगर. या जिल्ह्यातील खालील अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. १) पिवळी शिधा पत्रिका धारक कुटुंब २) अंत्योदय अन्ना योजना कार्ड ३) अन्नपूर्णा कार्ड ४) नारंगी शिधा पत्रिका धारक कुटुंब. पांढरी शिधा पत्रिका धारक कुटुंबांला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासना टार्फे उपभोक्ता कुटुंबाला राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल

ओळखपत्र: राजीव गांधी योजनेच्या सर्व उपभोक्त्यांना राजीव गांधी आरोग्य ओळख पत्र देण्यात येईल, या ओळख पत्राचे वाटप मुख्यतः महाराष्ट्र सरकारच्या पिवळ्या व नारिंगी शिधा पत्रिकेचा व आधार कार्ड चा पूर्व सूचीनुसार केले जाईल. आधार कार्ड व अनुक्रमान्काचा अनुपास्थिती मध्ये व्यक्तीची शिधा पत्रिका व पासपोर्ट चा उपयोग छायाचित्र परिचयासाठी केला जाईल.

योजनेचा कालावधी आणि कुटंब साठी ग्राह्य केलेली रक्कम : योजने अंतर्गत रुग्णालय मध्ये भारती झाल्या नंतर १५०००० रु. पर्यंतचा खर्च प्रत्येक वर्षामध्ये पूर्ण कुटुंबा साठी देण्यात येईल या करिता अधिकृत रुग्णालयामध्ये पैसे न भरता वैद्यकीय सेवा घेता येईल, ह्यासाठी आरोग्य कार्ड किव्वा पिवळी व नारिंगी शिधा पत्रिका दाखवणे गरजेचे आहे. ह्या सेवे अंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पारिवारिक योजने अंतर्गत लाभ गेटा येईल. प्रत्येक कुटुंबा साठी १५०००० रु. एकासाठी किव्वा सगळ्यात मिळून वापरता येईल. तसेच मूत्रपिंडा प्रत्यारोपण साठी २,५०,००० रु. पर्यंत लाभ घेण्यात येईल. हि विमा योजना लागू झाल्या पासून १ वर्षा पर्यंत सर्व उपभोक्त्यांना लाभ घेता येईल.

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.