मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची भाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या लोकभाषांमधून ती तयार झाली आहे. अशाच दुसऱया एका लोकभाषेतून संस्कृत जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलभाषा, वैदीक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम झाला आहे. मराठीत तत्सम, तदभव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात.ततमहाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्.मयीन भाषा तीच मराठी होय.
मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षापूर्वीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतील असून तो पुणे जिल्हातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात`महारठिनो'लोकांचास्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या `सातवाहनआणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख', या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''... य महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस... य महतो मह....`` अनुवाद- ''.... महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ .... महान अशा पुरुषात श्रेष्ठ अशा ...``) ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वर्षे अस्तित्वात असली पाहिजे.
महाराष्ट्र या देशनामापेक्षा महाराष्ट्री भाषा जुनी आहे. अश्मक, कुंतल, अपरान्त, विदर्भ या प्रदेशात प्राकृत महाराष्ट्री प्रचारात होती. इतकेच नाही तर सातवाहनांच्या राजवटीत (इ.स.पूर्व 2 रे शतक ते इ.स.2 रे शतक) त्यांचा राज्यविस्तार कुरुक्षेत्र, पेशावर इथपर्यंत झाल्यामुळे ती भारताच्या बऱयाच मोठया भूभागात प्रचलित होती. म्हणूनच `गाहासतसई' उर्फ `गाथासप्तशती' या हाल सातवाहन राजाने संकलित केलेल्या गाथांच्या प्रतींची हस्तलिखिते देशभर अनेक ठिकाणी सापडलेली आहेत.
महारट्ठी-मरहट्ठी-मऱहाटी-मराठी असा उरभ्रमाचा प्रवास `महाराष्ट्री हे महारट्ठी' चे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती, एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची `सत्तासई' जयवल्लभाचा `वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे `रावणवहो' वाक्पतीराजाचे `गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी सत्तासई व रावणवहो नि;संशय महाराष्ट्रातलिहिलेगेले.''महाराष्ट्राश्रया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।`` असे महाकवी दंडी म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलत: ही भाषा महाराष्ट्राचीच, हे नि:संशय. शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते व साम्य आहे हे अनेक उदाहरणांवरुन व व्युत्तपत्यांवरुन सिद्ध होते. महाकवी बाणभ+ (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथाकोशाचा उल्लेख केला आहे.
यानंतर गाथासप्तशतीचा महत्वाचा उल्लेख राजशेखराने (इ.स. 880 ते 920) केलेला आहे. ''सातवाहन राजाने अनेक ठिकाणांहून गाथा जमवून त्यांचा संग्रह केला. यामुळे लोकांचा आनंद संकोच पावला नाही, उलट विस्तार पावला. केवढी ही आश्चर्याची परंपरा!`गाथासप्तशती' तील भौगोलिक स्थाने, नद्या सारे महाराष्ट्र देशातीलच आहे. गिरणा, गोदावरी, तापी, नर्मदा, मुळायानद्या या ग्रंथात प्रामुख्याने आहेत. बहुसंख्य उल्लेख त्र्यंबकेश्वर, गोदावरी, पैठण यांचे आहेत. गाथासप्तशती हे महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य आहे. त्यात काव्यगत कृत्रिमता अजिबात नाही. जीवनाची करुण, दारुण वहृदयस्पर्शी अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने तिच्यात रेखाटलेली आहेत.
अपभ्रंशापासून मराठी निघाली हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्.मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. ज्ञानेश्वरीत मराठी भाषेला `मऱहाठी' या शब्दाबरोबरच' देशी हा शब्दही वापरलेला आहे. किंबहुना मराठीचे `देशी' हेच नाव अधिक रुढ होते. अपभ्रंश ग्रंथातून त्यातील भाषेला `देसी' च म्हटले आहे. अपभ्रंश भाषेचे साहित्यांतर्गत नाव `देसी' असेच आहे. अपभ्रंश नव्हे. यादेसीचा विकास होवून जी भाषा निर्माण झाली ती देशी किंवा मराठी. ती अपभ्रंशाच्या`नागर' या प्रकारापासून निघाली.
देशी याचा अर्थ त्या त्या भूमीशी जोडलेले असणे असा होतो. ज्ञानेश्वरसुध्दा दाऊ वेल्हाळ देशी नवी असे आक्रमक होतात आणि भटोबासासारख्या गाढया पंडितालाही तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे, निरुपिली मऱहाटी : तियाचि पुसा असे म्हणावे लागते.इ.स. 778मध्येलिहिलेल्या उद्योतनसुरी याच्या `कुवलयमाला' या ग्रंथात अठरा देशी भाषांचा उल्लेख आहे. ग्रंथ अपभ्रंश भाषेतला अठरा देशी भाषापैकी एकीचे नाव `मरहट्ठ' असे आहे. मरहट्ठांचे भाषेचे वर्णन येणे प्रमाणे-
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य।
दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्ठे।।
(अर्थ: धरमुट, काळासावळा, सहनशील, अभिमानी, कलहशील व`दिण्णले गहिल्ले' बोलणारा मरहट्ठा....)
गाथा सप्तसती या ग्रंथातील गाथा पाहिल्या की, या गाथांमधील समाजजीवन आणि सामाजिक पर्यावरण मराठी असल्याचे, महाराष्ट्रीयन असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
महाराष्ट्राचा प्राचीनतम, परंतु अप्रत्यक्ष उल्लेख पहिल्या शतकातरचिलेल्यावररुचीच्या प्राकृतव्याकरणांत मिळतो. वररुचीनें `महाराष्ट्री' हे त्या प्रदेशांतील प्राकृत भाषेंचे नाव दिलें आहे. हाग्रंथ पाणिनीच्या काळातील आहे. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची, महाराष्ट्रीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर सर्वात महत्वाचा नियम सांगितला आहे कि,शेषं महाराष्ट्रीवतत (`बाकी सर्व नियम मराठीप्रमाणे असतील-`)यावरुनमराठीहीप्रमुख भाषा होती हे निर्विवाद आहे. देशावरुन भाषेला नाव पडतें हे लक्षांत घेतांयानंतरचा उल्लेख शकनृपति श्रीधरवर्मा याच्या चौथ्या शतकातील (इ. स. 365) एरण येथील स्तंभलेखात सापडतो.त्यात श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग आपणास `महाराष्ट्र' म्हणजे महाराष्ट्रीय म्हणवितो (''सेनापति सत्यनागेन ... प्रमुखेन महाराष्ट्रेन.. ``,).
पुढे वराहमिहिराने `बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी `भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र:' असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्तयाश्रय पुलकेशी (चालुक्य) हा तीनही महाराष्ट्रांचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवाशी हुएनत्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास `मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो. वात्स्यायन, वररुची व दंडी यांनी केलेले महाराष्ट्राचे उल्लेख प्रसिद्धच आहेत.राजशेखर स्वत:ला महाराष्ट्र चुडामणी म्हणवून घेतो.
ज्ञानकोषकार श्रीधर व्यंकटेश केतकर, राजारामशास्त्री भागवत, दुर्गा भागवत, वा. वि. मिराशी, डॉ. कृ. पां. कुलकर्णी, डॉ. वि. भि. कोलते. डॉ. शं. गो. तुळपुळे, ल.रा.पांगारकर, डॉ. ह. धि. सांकलिया आणि इतर अनेक मान्यवरांच्या गंथांचे पुरावे पाहता मराठीचे वय सुमारे 2500 वर्षे असल्याचे सिध्द होते.शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखीत पोथ्या, प्रकाशित गंथ, या साऱयांच्या संशोधनातून मराठीबाबत एक'प्रमाणक परिवर्तन` (पॅराडाईम शिफट) होणार आहे.
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment