महत्वाच्या पोस्ट

भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष


इंग्रजी भाषा ही सत्ता संपत्ती, संधी आणि प्रतिष्ठेचे हत्यार बनली असून मराठी ही मागासलेपणा, दुबळेपणा आणि कमकुवतपणाचे प्रतीक बनल्याची भावना पुढे येताना दिसते. मराठी भाषा आज अडचणीत असल्याची चिंता सातत्याने व्यक्त होत असते. खरेतर सव्वाअकरा कोटी लोकांची मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. संपन्न ज्ञानभाषा असणारी मराठी महानुभवांची धर्मभाषाही आहे. मराठी ही राजभाषा असणारे सातवाहन, राष्ट्रकुट आणि मराठे हे राज्यकर्ते भारतभर राज्य करत होते. आजच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठी सत्तोची पताका फडकत होती. ही भाषा बोलणारे लोक आज जगातील 72 देशांत पसरलेले आहेत. ते भारताच्या 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात महत्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे.

मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात, पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटी - मोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाखो रसिक उपस्थिती लावतात. दरवर्षी कोटयवधी रुपयांची मराठी पुस्तकांची विक्री होत असते. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वैचारिक आणि ललित पुस्तकांची वार्षिक उलाढाल वीस ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंत असून पाठयपुस्तके, धार्मिक ग्रंथ, पाककृती, व्यक्तिमत्तव विकासविषयक तसेच ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारेअ250कोटीअरुपयेअआहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी 25 टक्के ग्रंथालये एकटया महाराष्ट्रात आहेत. मराठीत जेवढे कोश वाड.मय आहे तेवढे भारतातील अन्य कोणत्याही भाषेत नाही. ज्ञानेश्वर,तुकारामांवरुन शेकडो नोबेल ओवाळून टाकावीत असे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ लेखन मराठीत झालेले आहे. मराठी भाषेत आजवर सुमारे एक लाख ग्रंथ प्रकाशित झालेले असून त्यातील असंख्य ग्रंथ वैश्विकदृष्टया श्रेष्ठ ठरावेत असे आहेत.

‘अमृतातेही पैजा जिंकणाऱया आणि भाषामाजी भाषा साजरी असणाऱया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री, श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट स्थापन केला आहे. आजवर तमिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे.

भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.


  •  High antiquity of its early texts/recorded history over a period of 1500-2000 years.- भाषेची प्राचीनता
  • A body of ancient literature / texts, which is considered a valuable heritage by generations of speakers.- भाषेची मौलिकता आणि सलगता
  • The literary tradition be original and not borrowed from another speech community.-भाषिक आणि वाड्.मयीन परंपरेचे स्वयंभूपण
  • The Classical language and literature being distinct from modern, there may also be a discontinuity between the Classical language and its later forms of its offshoots.- प्राचीन भाषा व तीचे आधुनिक रुप यांच्यात पडू शकणाऱया खंडासह जोडलेले / असलेले नाते.

या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हे सबळ पुराव्यानिशी सिध्द करता येते मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही दुषित पुर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा मोठा अडथळा आहे. मराठी ही संस्कृतोदभ्व भाषा आहे आणि तिचे वय 1000 वर्षांपेक्षा कमी आहे अशी लोकसमजुत करुन देण्यात आली आहे. काही स्त्रिया वय चोरतात त्याप्रमाणे मराठी हीती असल्यामुळे बहुधा तिचे वय चोरण्यात आले आहे.

प्राचीन महारट्ठीभाषा, मरहट्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषाआणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झाला आहे.या वेगवेगळया भाषा नसून ती मराठी या एकाच भाषेची तीन रुपे आहेत असे ल.रा.पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे.लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू हे मराठीतले आद्यग्रंथनाहीत. तर ते मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत.हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षापूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्याआधी बारा-पंधराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झालेले आहेत.मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे 2000 वर्षे जुना असून त्याचे नाव `गाथा सप्तशती' असे आहे.संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता.

एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात यावरुनही या दोन वेगळया भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्‍वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्राचे देशी नाममाला हे या भाषेचे व्याकरण प्रसिध्द आहे. पाणिनीच्या समकालीन वररुची (कात्यायन) याने लिहिलेला प्राकृत प्रकाशश हा व्याकरण ग्रंथ ख्यातनाम आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दिड ते दोन हजार वर्ष जुन्या असलेल्या सुमारे 80 ग्रंथामध्ये मराठी भाषा आढळते. त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (4 थे शतक), शुद्रकाचे मृच्छकटीक (6वे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (5 वे शतक), भद्रबाहुचे अवश्‍यका निरयुक्ती (3 रे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (1 ले ते 3 शतक) यांचा समावेश आहे.

Source: 'महान्यूज' 

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.