महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(३३) चालू घडामोडी

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) हंगामी अर्थसंकल्पासंबंधी खालील विधाने पहा.

a) लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केंद्र सरकारला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. परिणामी प्रथेप्रमाणे अर्थमंत्र्यांनी संसदेत लेखानुदान(vote on account) मांडले.
b) या अर्थसंकल्पात निर्भय निधीसाठी एक हजार कोटींची तरतूद असून लष्कराची 'एक पद एक निवृत्ती वेतन' योजना राबवण्यासाठी पाचशे कोटींची तरतूद आहे.
c) मागासवर्गीय उद्योजक निर्मितीला प्रोत्साहन देण्यसाठी २०० कोटी रुपयांचा 'साहस निधी' स्थापन करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आम आदमी पक्षाकडून लोकसभेचं तिकीट जाहीर झालं आहे.
b) त्या ईशान्य मुंबई मतसंघातून निवडणूक लढणार आहेत.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) 'द हिंदूजः अॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री' या पुस्तकासंबंधी खालील विधाने पहा.

a) पेंग्विन इंडिया या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले अमेरिकन इतिहासतज्ज्ञ 'वेंडी डॉनिजर' यांनी लिहिलेल्या 'द हिंदूजः अॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री' या पुस्तकाच्या प्रती बाजारातून मागे घेण्याचे ठरवले आहे.
b) 'शिक्षा बचाओ आंदोलन कमिटी'ने या पुस्तकाविरोधात तक्रार केली होती या पुस्तकामध्ये अनेक त्रुटी असल्याचे कारण देत कोर्टात धाव घेतली होती.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) पाकिस्तानातील लाल मशिदीवर २००७ मध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत तेथील धर्मगुरू अब्दुल रशीद गाझी ठार झाले होते.
b) त्या प्रकरणी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानी न्यायालयात खटला भरवण्यात आला आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) तेलंगाना राज्यासंबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) राज्याचे विभाजन झाल्यानंतर निर्माण होऊ शकणारा कृष्णा-गोदावरी नद्यांतील पाणीवाटपाचा पेच सोडवण्यासाठी या नद्यांच्या व्यवस्थापन मंडळावर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च परिषदेची स्थापना. या परिषदेत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय जलसंपदामंत्र्याचा समावेश असेल.
b) हैदराबाद दहा वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी. यामध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंतचा परिसर असेल.
c) तेलंगणमध्ये १७, तर उर्वरित आंध्रमध्ये २५ लोकसभा मतदारसंघ. उर्वरित आंध्र प्रदेशची विधानसभा १७५ सदस्यांची असेल, तर तेलंगण विधानसभेत ११९ सदस्य असतील.
d) आंध्र प्रदेशचे राज्यपाल दोन्ही राज्यांचे राज्यपाल असतील. दोन्ही राज्यांतील जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेची विशेष जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने पहा.

a) पत्रकारांची गळचेपी करण्यात आपला देश १८० देशांच्या यादीत १४०व्या स्थानावर असल्याचे धक्कादायक चित्र सन २०१४च्या जागतिक पाहणीतून पुढे आले आहे.
b) २०१३मध्ये भारतात पत्रकारांवर हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडल्या असून, या काळात देशभरात ८ पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे या पाहणीतील आकडेवारी सांगते.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) दयामरणाचा अधिकारसंबंधी खालील विधाने पहा.

a) दुर्धर आजाराने पीडित असलेल्या कोणत्याही वयोगटातील मुलांना दयामरणाचा अधिकार देणारे विधेयक बेल्जियमच्या पार्लमेण्टमध्ये मंजूर करण्यात आले.
b) या विधेयकावर तेथील राजाची सही होईल तेव्हा कोणत्याही वयोगटातील मुलांना दयामरणाचा अधिकार देणारे बेल्जियम हे जगातील पहिले राष्ट्र ठरणार आहे.
  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) भारत हा मसाल्याच्या पदार्थांचा जगातला सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदारही आहे. ५०हून अधिक प्रकारचे मसाले आपल्याकडे उत्पादन होतात.
b) देशातील मसाल्याचे एकूण उत्पादन- २.७ दशलक्ष टन आहे.
c) मसाल्याच्या व्यापारातील देशाचा जागतिक हिस्सा- ४५ टक्के आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) इलिनॉईस विद्यापीठातील भारतीय शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून डिझेल, नैसर्गिक गॅस आणि इतर पेट्रोलियम पदार्थ तयार केले आहेत. ब्रजेंद्र कुमार या भारतीय शास्त्रज्ञाचा प्रमुख सहभाग असलेल्या गटाने हे संशोधन केले आहे.
b) ऑक्सिजनमुक्त वातावरणात प्लॅस्टिक पिशव्या जाळण्याच्या "पायरॉलिसिस' या प्रक्रियेद्वारा हे संशोधन करण्यात आले आहे.
c) नेहमीच्या क्रूड ऑइलवर केलेल्या प्रक्रियेतून 50 ते 55 टक्के इंधन मिळते. मात्र प्लॅस्टिक हेच पेट्रोलियम पदार्थांपासून बनलेले असल्याने त्यापासून आम्हाला 80 टक्के इंधन मिळाले असे सांगण्यात आले आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a),b) आणी c) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) केवळ स्थानिक उपकरणांचाच वापर असलेल्या भारताच्या सौर ऊर्जा मोहिमेविरोधात अमेरिकेने भारताविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागितली आहे.
b) अमेरिकेतील उपकरणांऐवजी भारतीय उपकरणांचा वापर करण्याचा निर्णय अमेरिकेच्या निर्यातीशी सापत्नभाव दर्शविणारा आहे असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि b)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.