महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीसाठी सन 2012-13 च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून एकूण 31 लेखक / साहित्यिकांना वेगवेगळ्या साहित्यकृतीसाठी सन्मानित केले जाणार आहे. एक लाख रुपये आणि 50 हजार रुपये असे दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्य शासनातर्फे उत्कृष्ट साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार दिले जातात.
सन 2012-13 या वर्षाकरिता उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक/ साहित्यिकांची यादी पुढील प्रमाणे :-
- प्रौढ वाङमय (काव्य) - कवी केशवसुत पुरस्कार: प्रज्ञा दया पवार (दृश्यांचा ढोबळ समुद्र), 1 लाख रुपये; प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : अभय दाणी (एरवी हा जाळ), 50 हजार रुपये;
- प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : आनंद विनायक जातेगांवकर (अस्वस्थ वर्तमान),1 लाख रुपये ; प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : अवधूत डोंगरे (स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट) , 50 हजार रुपये ;
- प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : नीरजा (पावसात सूर्य शोधणारी माणसं), 1 लाख रुपये; प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : गुणवंत मधूकर पाटील (भरळ), 50 हजार रुपये;
- प्रौढ वाङमय –(ललितगद्य) (ललित विज्ञानासह) – अनंत काणेकर पुरस्कार : हेमंत देसाई (बाबू मोशाय)- (सुहाना सफर), 1 लाख रुपये; प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : ऋषिकेश पाळंदे (दोन चांक आणि मी), 50 हजार रुपये;
- प्रौढ वाङमय (विनोद) – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार : अनिल पंढरीनाथ सोनार (विश्वसुंदरी सुलभ हप्त्यात), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: बाबा भांड (लोकपाळ राजा सयाजीराव), 1 लाख रुपये; प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : मधु मंगेश कर्णिक (करुळचा मुलगा), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार: डॉ.ऋषीकेश कांबळे (दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री), 1 लाख रुपये; प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : हेमंत खडके (अर्वाचीन कवींचा काव्यविचार), 50 हजार रुपये;
- प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : संध्या नरे- पवार (तिची भाकरी कोणी चोरली ?), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (इतिहास)- शाहू महाराज पुरस्कार : अविनाश दिगंबर फुलझेले (आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (भाषाशास्त्र/ व्याकरण)- नरहर कुरुंदकर पुरस्कार : सुरेश पांडुरंग वाघे (संकल्पना कोश खंड 2,3,4,5), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (विज्ञान व तंत्रज्ञान) (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार : प्रदीपकुमार माने (मुंगी : एक अदभूत विश्व), 1 लाख रुपये ;
- प्रौढ वाङमय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) –वसंतराव नाईक पुरस्कार: अनिल पाटील (गावगाडा शतकानंतर..), 1 लाख रुपये ;
- प्रौढ वाङमय (दलित साहित्य);- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : ॲड. नानासाहेब निकम (जोहार), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (तत्वज्ञान व मानसशास्त्र)- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार: डॉ. मुहम्मद आजम (सुफी तत्वज्ञान: स्वरुप आणि चिंतन), 1 लाख रुपये ;
- प्रौढ वाङमय (शिक्षणशास्त्र)- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार: नामदेव शंकर माळी (शाळाभेट), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (पर्यावरण)- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : अतुल देऊळगावकर (विश्वाचे आर्त), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (अनुवादित)- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार: सुजाता गोडबोले (भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा), 1 लाख रुपये;
- प्रौढ वाङमय (संकीर्ण- क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार : प्रसाद नामजोशी (शॉर्टकट), 1 लाख रुपये;
- बालवाङमय (कविता)- बालकवी पुरस्कार : इंद्रजित भालेराव (गावाकडं), 50 हजार रुपये;
- बालवाङमय (नाटक व एकांकिका)- भा.रा. भागवत पुरस्कार : अरुणा भागवत (आनंद फुलवू या), 50 हजार रुपये;
- बालवाङमय (कादंबरी)- साने गुरुजी पुरस्कार : ल.म. कडू (खारीच्या वाटा), 50 हजार रुपये;
- बालवाङमय (कथा- छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार : गौरी पटवर्धन (नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया), 50 हजार रुपये ;
- बालवाङमय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार : आनंद घैसास (आकाश कसे पाहावे), 50 हजार रुपये;
- बालवाङमय (संकीर्ण) –ना.धो. ताम्हणकर पुरस्कार : मदन हजेरी (गायबगळा), 50 हजार रुपये;
- बृहन्महाराष्ट्र पुरस्कार – सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार : डॉ. प्रतिभा आठवले (पूर्वरंग-हिमरंग), 1 लाख रुपये.
No comments:
Post a Comment