महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(३१) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) केंद्रीय गृह राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या माहिती संबंधी खालील विधाने पहा.

a) २०१३ या वर्षात देशभरात घडलेल्या दंगलींच्या घटनांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून, तेथे २४७ दंगली झाल्या आहेत. त्यामध्ये ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, ३६० जण जखमी झाले आहेत.
b) दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून, राज्यात दंगलीच्या ८८ घटनांमध्ये १२ जणांना जीव गमवावा लागला आहे.
c) त्या खालोखाल मध्य प्रदेश (८४), कर्नाटक (७३), गुजरात (६८), बिहार (६३) आणि राजस्थान (५२) यांचा क्रमांक लागतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) अमृतसरच्या सुवर्णमंदिरात आश्रय मिळवलेल्या शीख दहशतवाद्यांविरुद्ध १९८४मध्ये करण्यात आलेल्या 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'मध्ये ब्रिटनने भारताला माफक सल्ला दिला होता, अशी कबुली ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विल्यम हॉग यांनी मंगळवारी संसदेत दिली.
b) या काळामध्ये भारताचे 'Chief Of Army Staff' अरुण वैद्य हे होते.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) 'एक कुटुंब, एक गाडी' असे धोरण निश्चित करायला हवे. आरटीओने त्या दृष्टीने विचार करावा,' अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्या शहरासाठी केली आहे?

  A. पुणे
  B. मुंबई
  C. ठाणे
  D. नाशिक

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.
a) पाकिस्तानच्या दुर्गम भागात महिला शिक्षणासाठी प्रयत्न करताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार झालेल्या मलाला युसफझाई हिला स्वीडनच्या 'वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज'साठी नामांकन मिळाले आहे.
b) 'वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज' हे २००० पासून देण्यात येते. 'बाल नोबेल' म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक बाल हक्क आणि शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना दिले जाते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) सॉफ्टवेअर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतात जन्मलेल्या सत्या नाडेला यांची निवड झाली.
b) १९९५ मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत मायक्रोसॉफ्टने आपला स्वत:चा 'इंटरनेट एक्स्प्लोरर' नावाचा इंटरनेट सर्च इंजिन निर्माण केला.
c) नाडेला यांचे वडील, बी. एन. युंगधर हे १९६२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना ते त्यांचे विशेष सचिव होते. नंतर त्यांनी नियोजन आयोगावरही सदस्य म्हणून काम केलं.
d) विद्यमान सीईओ स्टीव्ह बॉलमर यांची त्यांनी जागा घेतली असून, कंपनीच्या गेल्या चार दशकांच्या कारकिर्दीतील ते तिसरे सीईओ ठरले आहेत.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) दिल्लीच्या लाजपत नगर बाजारपेठेत स्थानिक दुकानदारांच्या मारहाणीचा बळी ठरलेला विद्यार्थी निदो तानिया हा ईशान्य भारतातील कोणत्या राज्यातला होता?

  A. मिझोरम
  B. आसाम
  C. अरुणाचल
  D. यापैकी नाही

-------------------------------------------------------------------------
७) फिलिप हॉफमनसंबंधी खालील विधाने पहा.

a) हॉलिवूडमध्ये गेली २० वर्षं अमेरिकेतील रंगभूमी आणि ७० एमएम पडद्यावर बहुरंगी, बहुढंगी भूमिका साकारणा-या फिलिप हॉफमन यांचा नुकताच मृत्यू झाला.
b) २००५ मध्ये कॅपोट चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) 'दया अर्जावर निर्णय घेण्यास आवश्यकतेपेक्षा अधिक उशीर झाला असेल, तर आरोपीची शिक्षा कमी होऊ शकते,' असा निकाल सुप्रीम कोर्टाने २१ जानेवारी रोजी दिला.
b) या निकालाचा आधार घेत १९९१ मध्ये झालेल्या राजीव गांधी यांच्या हत्येतील मारेकरी संथन, मुरुगन, पेरारिवलन यांचा दया अर्ज गेल्या ११ वर्षांपासून राष्ट्रपतींकडे असल्याने त्यांनी शिक्षेत सलवत देण्याबाबत याचिका दाखल केली होती.
c) अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) दिल्लीसंबंधी खालील विधाने पहा.
a) जर एकच कायदा केंद्रात आणि विधानसभेत, दोन्हीही ठिकाणी मंजूर केला जात असेल तर केंद्राचा कायदा मान्य केला जातो.
b) घटनेच्या कलम २३९ ए नुसार दिल्लीचे प्रशासन राष्ट्रपतींच्या हातात असते. त्यांच्या सल्ल्यानुसार नायब राज्यपाल हे दिल्लीचे प्रशासक म्हणून कार्य करत असतात.
c) घटनेननुसार सर्वप्रथम विधेयक नायब राज्यपालांकडे पाठविले जाते. नायब राज्यपाल हे विधेयक राष्ट्रपती किंवा गृह मंत्रालयाकडे पाठवितात. तेथे मंजूर झाल्यानंतर राज्यात मंजूर करण्यात येतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a),b) आणी c) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?
a) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. सीएनआर राव यांना मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला.
b) हा पुरस्कार मिळवलेला सचिन हा पहिला खेळाडू ठरला आहे.
c) सी. व्ही. रामन, एम. विश्वेसरय्या आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर हा पुरस्कार प्राप्त झालेले ते चौथे शास्त्रज्ञ आहेत.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि c)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.