महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(३५) सामान्य विज्ञान

General Science Multiple Choice Questions for Competitive examination

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) खालील विधाने पहा.

a) आपल्याला कापूस,केळ,काटेसावर,नारळ,आम्बडी,ताग,घायपात या वनस्पतींपासून धागा मिळतो.
b) नायलॉन,रेयॉन,टेरेलीन,पॉलिस्टर या कपड्यांच्या धाग्यांचा शोध माणसाला प्रयोगशाळेत लागला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) दुध,मांस,मासे,अंडी यांमध्ये प्रथिने असतात. प्रथिनयुक्त पदार्थांमुळे शरीराची झीज भरून निघते.
b) लोणी,तूप,तेल या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात.स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला सर्वात जास्त उर्जा प्राप्त होते.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) जीभेमुळे आपल्याला आंबट,खारट,कडू आणि गोड चवींचे ज्ञान होते.
b) तिखट हि चव नाही. तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे जिभेची आग होते.

   A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक असतात आणि कोलाजन हा तंतुमय पदार्थ असतो.
b) मुल जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरात २७० हाडे असतात. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये २०६ हाडे असतात.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) भाज्या चिरून नंतर धुतल्यास त्यांतील ब,क जीवनसत्वे पाण्यात विरघळून नाहीशी होतात.
b) मोड आल्यामुळे कडधान्ये पचनास सुलभ होतात. तसेच त्यात बी जीवनसत्व तयार होते.

  A. a)
  B. b)
  C. a) आणी b)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने पहा.

a) काकडी, कोबी, मुळा, गजर, बिट यांसारखे पदार्थ न शिजवता खावेत.
b) त्यांच्यात असलेल्या तंतुमय पदार्थामुळे मलोत्सर्जन सुलभ होण्यास मदत होते.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधाने पहा.

a) पाण्याच्या घरगुती वापरत पाण्यात तुरटी फिरवली जाते. त्यामुळे पाण्यातील अविद्राव्य कान तळाशी बसतात आणि पाणी स्वच्छ होते.
b) ब्लिचिंग पावडर किंवा पोटॅशियम परमैंगनेंट सारखी रसायने विशिष्ट प्रमाणात पाण्यात मिसळ्यास रोगजंतूंचा नाश होतो. त्यामुळे निर्जंतुक पाणी मिळते.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे.
b) पृथ्वीच्या कललेल्या आसामुळेच पृथ्वीवर ऋतू निर्माण झालेले आहेत.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) हवेतील वाफ एकदम थंड झाली, तर पाण्याचे थेंब होण्याऐवजी तिचे सूक्ष्म कण बनतात. असे सूक्ष्म कण हवेत तरंगत राहतात. अशा कानांनी वातावरण भरून गेल्याने धुके पडल्याचे जाणवते.
b) उंचावरची वाफ एकदम थंड झाली. तर तिच्यापासून बर्फाचे लहान कण बनतात. त्यांना हिम म्हणतात. या हिम कणांचे पुंजके बनतात. हे पुंजके हळू हळू खाली येतात आणि हिमवर्षाव होतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्य आहेत?

a) पाऊस पडण्यास योग्य असे ढग आढल्यास विमानातून मीठ किंवा सिल्व्हर आयोडाइड ची फवारणी केली जाते.
b) त्यामुळे ढगातील बाष्प थंड होऊन पाऊस पडू शकतो.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि b)
  D. एकही असत्य नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.