महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(३४) चालू घडामोडी

Mpsc Current Affairs

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार २०१४ संबंधी खालील विधाने पहा.

a) अमेरिकेतील गुलामगिरीचे अस्वस्थ करणारे चित्र उभे करणाऱ्या 'ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह' या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून त्यातील प्रमुख अभिनेता शिवेटल एजिओफोर (वय ३६) याला उत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले.
b) उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'ग्रॅव्हिटी' चित्रपटाचे हेल्मर क्युरॉन यांना मिळाला.
c) उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लानचेट हिला 'ब्लू जस्मीन' या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कारासंबंधी खलील दोन विधाने पहा.

a) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नावाचा पुरस्कार गैरमराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो.
b) जेष्ठ पंजाबी साहित्यिक डॉक्टर 'सुरजित पातर' यांना २०१४ चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) वनसंवर्धनाच्या चळवळीत वन कर्मचारी आणि अधिकारी यांना अद्ययावत ठेवण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ लवकरच 'व्याघ्र अकादमी'
b) तर, इको टुरिझमला चालना देण्यासाठी चिखलदरा येथे 'पर्यटन प्रशिक्षण अकादमी' सुरू करण्याची घोषणा वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केली.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

------------------------------------------------------------------------
४) 'सीडॅक' संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्युटिंग (सीडॅक) बायोइन्फर्मेटिक्समधील अद्ययावत संशोधनासाठी सीडॅकने 'परम बायोब्लेझ' हा सुपरकॉम्प्युटर तयार केला आहे.
b) या प्रणालीच्या माध्यमातून माणसाच्या पेशी आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास अधिक बारकाव्याने करता येणार आहे. रेणूंच्या हालचाली, त्यांच्या परस्पर क्रिया यांच्या अभ्यासासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) 'केअर रेटिंग्ज' व 'फिक्की' या संस्थांनी तयार केलेल्या अहवालासंबंधी खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) २००४-२०१३ या १० वर्षांत महाराष्ट्राने ९.२५ टक्क्यांनी विकास केला.
b) महाराष्ट्रापेक्षा अधिक गतीने विकास करणाऱ्यांमध्ये गुजरात व तामिळनाडू आहेत. या राज्यांनी अनुक्रमे १०.१ व ९.४५ टक्क्यांनी विकास केल्याचे अहवाल सांगतो.
c) देशाच्या विकासात महाराष्ट्राची हिस्सेदारी १५ टक्के आहे.
d) थेट विदेशी गुंतवणुकीत २००९मध्ये ४६ टक्क्यांवर असलेला महाराष्ट्र २०१३मध्ये ३९ टक्क्यांवर आला.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने पहा.

a) आयुर्वेदासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी केरळमध्ये २० फेब्रुवारीपासून पाच दिवस 'जागतिक आयुर्वेद महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.
b) मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष राजकेस्वर पुरयाग या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे आहेत. ''आयुर्वेद हे केवळ वैद्यकीय उपचार नाहीत, तर ते जीवनमार्ग आहे,'' असे मत मॉरिशसचे अध्यक्ष राजकेस्वर पुरयाग यांनी व्यक्त केले.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि b) बरोबर
  D. दोन्ही चूक

-------------------------------------------------------------------------
७) राज्य सांस्कृतिक पुरस्कारासंबंधी खालील विधाने पहा.

a) नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, मराठी चित्रपट, कीर्तन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींना 'राज्य सांस्कृतिक पुरस्काराने' सन्मानित करण्यात येते.
b) सन 2012-13 या वर्षीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- प्रशांत दामले (नाटक), शरद साठे (कंठसंगीत), उत्तरा केळकर (उपशास्त्रीय संगीत), अलका कुबल (मराठी चित्रपट), मीरा उमप (कीर्तन), रघुवीर खेडकर (तमाशा), बजरंग आंबी (शाहिरी), आशा जोगळेकर (नृत्य), छाया खुटेगावकर (लोककला), वसंतराव शिरभाते (आदिवासी गिरीजन), परशुराम खुणे (कलादान)

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८) खालील विधाने पहा.

a) औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाचे मोठय़ा प्रमाणावर ज्वलन केल्यानंतर निर्माण होणारी राख म्हणजे 'फ्लाय अॅश'.
b) ही राख हलकी आणि अगदी बारीक कणांनी बनलेली असते. ती हवेत तरंगत राहात असल्यामुळे तिचा वेळीच योग्य वापर न झाल्यास ती आरोग्यास हानीकारक ठरते.
c) 'फ्लाय अॅश' चा वापर बांधकामाच्या विटा बनवण्यासाठी होतो.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
९) खालील विधाने पहा.

a) ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००ने जागतिक पातळीवर पाचशे मौल्यावान ब्रँडची यादी मंगळवारी जाहीर केली.
b) देशातील २०१३ मधील सर्वांत मौल्यवान ब्रँड टाटा ग्रुप ठरला असून, त्याचे मूल्य २१.१ अब्ज डॉलर आहे.
c) अमेरिकेतील अॅपल कंपनी जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर कायम आहे. या कंपनीचे मूल्य १०५ अब्ज डॉलर आहे.
d) अॅपल कंपनीनंतर ब्रँड मूल्याच्या बाबतीत सॅमसंग (७९ अब्ज डॉलर) दुसऱ्या स्थानावर आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. a),b) आणी c) बरोबर
  C. फक्त b) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) भारत सरकारच्या कृषी मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या कृषी आणि सहकार विभागामार्फत 2010-11 पासून दरवर्षी `कृषी कर्मन` पुरस्कार दिल्या जातात.
b) यावर्षी हा पुरस्कार मध्य प्रदेशला 10 दशलक्ष टनापेक्षा आधिक उत्पादनासाठी, ओडीशाला 1 ते 10 दशलक्ष टन उत्पादनासाठी तर मणिपूरला 1 दशलक्ष टनापेक्षा कमी उत्पादनासाठी प्रदान करण्यात आला.
c) पीक निहाय पुरस्काराकरिता तांदुळासाठी छत्तीसगड, गव्हासाठी बिहार, डाळीसाठी झारखंड, कडधान्यासाठी आंध्र प्रदेशला गटवार पुरस्कृत करण्यात आले.
d) तांदुळ उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याला सन 2012-13 वर्षासाठीचा विशेष प्रोत्साहन पुरस्कार सोमवारी प्रदान करण्यात आला.

  A. फक्त a)
  B. फक्त c)
  C. b) आणि d)
  D. एकही नाही

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.