महत्वाच्या पोस्ट

प्रश्नमंजुषा(३२) जैवविविधता

"MPSC,PSI-STI-ASSISTANT यांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या प्रकारे प्रश्नांच्या स्वरूपमध्ये बदल करण्यात आला आहे त्याच धर्तीवर खलील प्रश्न येथे देत आहोत."                                                               
                          



१) जैवविविधता समृद्ध क्षेत्रांबद्दल खालील विधाने पहा.

a) जैवविविधता समृद्ध क्षेत्र अशा ठिकाणांना हॉट स्पॉट म्हणावे ही कल्पना डॉ. सबिना विर्क यानी १९८८मध्ये मांडली.
b) म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचे वसतिस्थान आहे त्यास जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते.
c) समृद्धक्षेत्रे जगभर विखुरलेली असली तरी उष्ण कटिबंधातील वनांत आणि सदाहरित जंगलांत त्यांची संख्या सर्वाधिक आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणि c) बरोबर
  D. वरील सर्व बरोबर

----------------------------------------------------------------------
२) खलील दोन विधाने पहा.

a) जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.
b) उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.

   A. फक्त a) बरोबर
   B. दोन्ही चूक
   C. फक्त b) बरोबर
   D. a) आणी b) बरोबर

-----------------------------------------------------------------------
३) खालील विधाने पहा.

a) जागतिक जैवविविधता दिन २२ मे साजरा केला जातो.
b) संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

------------------------------------------------------------------------
४) पुढे दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे (१). जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता.
b) इसवी सनाच्या २००४ मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अॅन्थनी कँपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची(Molecular Diversity) भर घातली.

  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
५) खालील कोणती विधाने सत्य आहेत?

a) सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता वाढत जाते.
b) शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक असते.
c) विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते.
d) या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात.

  A. a) आणि b)
  B. a),b) आणि c)
  C. वरील सर्व
  D. फक्त d)

-------------------------------------------------------------------------
६) खलील दोन विधाने पहा.

a) इ.स.१९६८मध्ये रेमंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला.
b) हा शब्द त्यानी ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a) आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
७) खालील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा.

a) साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय.
b) याच काळात डायनोसॉर नष्ट झाले.
  A. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  B. एकही विधान बरोबर नाही
  C. विधान a) बरोबर b) नाही
  D. विधान b) बरोबर a) नाही

-------------------------------------------------------------------------
८)जैवविविधतेसंबंधी खालील विधाने पहा.

a) सजीवांमधील विविधता, तापमानावर, पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर, भूप्रदेशाच्या गुणधर्मावर, आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.
b) भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटीनी अधिक आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. फक्त b) बरोबर
  C. a) आणी b) बरोबर
  D. वरील सर्व चूक

-------------------------------------------------------------------------
९) दिल्लीसंबंधी खालील विधाने पहा.

a) चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कॅंब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली.
b) या प्रकारास कॅंब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे.

  A. फक्त a) बरोबर
  B. दोन्ही चूक
  C. फक्त b) बरोबर
  D. a)आणी b) बरोबर

-------------------------------------------------------------------------
१०) खालील कोणती विधाने असत्या आहेत?

a) जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता.
b) परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे.

  A. फक्त a)
  B. फक्त b)
  C. a) आणि b) सत्य
  D. वरील सर्व पर्याय चूक

-------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.