बुध ग्रह
- बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे.
- तो त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो.
- त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत.
- बुध हा ७०% धातू तर ३०% सिलिका यांचा बनला आहे.
- घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची घनता ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.
- बुध हा घन पृष्ठभाग असणाऱ्या चार ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे.
शुक्र ग्रह
- पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र.
- या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्याप्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो. तो पाहटे किंवा संध्याकाळी अत्यंत तेजस्वी दिसतो. त्याला 'पहाटतारा' असेही म्हणतात. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे.
- आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.
- शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
- शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि. मी. एवढे आहे.
- सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह एकसारख्याच दिशेने सूर्याभोवती म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो.
- शुक्राला एकही चंद्र नाही.
- बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे.
- सूर्यमालेतील, सूर्य आणि पृथ्वी यांदरम्यान येणाऱ्या ग्रहांना अंतर्वर्ती ग्रह म्हणतात. बुध आणि शुक्र हे दोनच अंतर्वर्ती ग्रह आहेत.
पृथ्वी ग्रह
- पृथ्वी सूर्यमालेतील सूर्या पासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे.
- सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे.
- सध्याच्या माहितीनुसार जीवसृष्टी धारण करणारा सूर्यकुलातील हा एकमेव ग्रह आहे.
- पृथ्वीला निळा ग्रह सुध्दा म्हणतात.
- पृथ्वीचा व्यास १२,७५६ कि. मी. एवढा आहे, व सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर साधारणपणे १४९,५९७,८९० कि. मी. एवढे आहे.
- पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात.
- पृथ्वी तिच्या आसाभोवती २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतूचक्र सुरू असते.
- आपल्या पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात.
- पृथ्वीला एक उपग्रह आहे तो म्हणजे चंद्र.
- पृथ्वी आपल्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी परप्रकाशित असून तिच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन होऊन ती निळसर छटेने चकाकते.
मंगळ ग्रह
- पृथ्वीच्या कक्षेच्या आत असलेल्या बुध व शुक्र यांना आंतरग्रह तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात, मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.
- मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे.
- त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुद्धा म्हटले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे.
- हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे.
- मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे.
- सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे.
- भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
- मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणत: २० अंश सेल्सीयस तर विरुध्द भागाचे तापमान १८० अंश सेल्सीयस असते.
- मंगळाला फोबोस व दिमोस हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत.
- मंगळाची त्रिज्या पृथ्वीच्या अर्धी आहे व त्याची घनता पृथ्वीपेक्षा कमी आहे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या १५% असून वस्तुमान ११% आहे. पृथ्वीवरील एकूण खंडीय प्रदेशापेक्षा मंगळाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ थोडेसे कमी आहे.
- जरी मंगळ बुधापेक्षा आकाराने व वस्तुमानाने मोठा असला तरी त्याची घनता बुधापेक्षा कमी आहे. यामुळे पृष्ठभागावर बुधाचे गुरुत्त्वाकर्षण मंगळापेक्षा जास्त आहे.
- मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर २३ कोटी किमी (१.५ खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिवलन काळ सुमारे ६८७ दिवस (पृथ्वीवरील) इतका आहे. मंगळावरील एक सौर-दिवस पृथ्वीपेक्षा थोडासाच मोठा असून तो २४ तास, ३९ मिनिटे व ३५.२४४ सेकंद इतका भरतो.
- मंगळाच्या अक्षाचा कल २५.१९ डिग्री इतका आहे, जो जवळपास पृथ्वीच्या अक्षाच्या कलाइतकाच आहे. यामुळे मंगळावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात, फक्त मंगळावरील दीर्घ वर्षामुळे तिथले ऋतू पृथ्वीवरील ऋतूंच्या दुप्पट काळ चालतात.
- इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फोनिक्स मार्स लँडरला मंगळावर आढळले होते.
गुरु ग्रह
- गुरू (Jupiter) सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे.
- सूर्याचे वस्तुमान गुरूच्या १००० पट असले तरीही इतर सर्व ग्रहांच्या एकूण वस्तुमानाच्या अडीच पट वस्तुमान केवळ एकट्या गुरूचे आहे.
- गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोवियन प्लॅनेट्स" ( jovian planets) असेसुद्धा म्हटले जाते.
- गुरू ग्रह हा मुख्यत्वेकरून हायड्रोजन व थोड्या प्रमाणात हेलियमचा बनला आहे. त्याला इतर जड मूलद्रव्यांचा उच्च दाबाखालील खडकाळ गाभा असणे शक्य आहे.
- गुरूच्या जलद परिवलनामुळे त्याचा आकार गोलाकार न राहता विषुववृत्तावर थोडासा पण जाणवण्याइतका फुगलेला आहे.
- गुरूचे बाह्य वातावरण वेगवेगळ्या उंचीवर वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये विभागलेले आहे. यामुळे या विभागांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. याचा परिणाम म्हणजे गुरूवर दिसणारा प्रचंड लाल डाग. वास्तविकरीत्या हा डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे.
- गुरूच्या भोवती एक अंधुक कडा आहे व शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र आहे.
- गुरूला कमीतकमी ६३ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्यांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा यापैकी सर्वांत मोठा उपग्रह असून त्याचा व्यास बुध ग्रहापेक्षाही जास्त आहे.
- बरेचसे कमी परिभ्रमण कालावधी असणारे धूमकेतू हे गुरूभोवती परिभ्रमण करतात; लघुग्रह पट्ट्यामध्ये असणार्याॅ कर्कवुड फटी (Kirkwood gaps) या गुरूमुळेच आहेत.
- सूर्यमालानिर्मितीनंतर बऱ्याच काळानंतर अंतर्ग्रहांवर झालेल्या अशनीवर्षावाला गुरू ग्रहच कारणीभूत आहे.
- गुरू सूर्यमालेमध्ये सर्वांत जास्त वेगाने प्रदक्षिणा घालतो. त्याचा परिभ्रमण काळ हा दहा तासांपेक्षा किंचित कमी आहे. इतक्या जास्त वेगाने परिभ्रमण केल्याने त्याच्या विषुववृत्तावर फुगवटा तयार झाला आहे. हा फुगवटा पृथ्वीवरून साध्या दुर्बिणीने सहज दिसू शकतो.
- अणूंच्या संख्येनुसार गुरूचे वातावरण सुमारे ९०% हायड्रोजन व १०% हेलियमने बनलेले आहे. गुरू ग्रहाच्या वातावरणात मिथेन, पाण्याची वाफ, अमोनिया व खडक यांचे अंश आहेत. या व्यतिरिक्त कार्बन, इथेन, हायड्रोजन सल्फाइड, निऑन, ऑक्सिजन, फॉस्फिन व गंधक यांचेही अंश आहेत. बाह्य वातावरणात अमोनियाचे स्फटिकही आढळून आले आहेत.
शनी ग्रह
- सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे.
- त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे असून सूर्यमालेतील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे.
- शनीभोवती बर्फ व अंतरीक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. या कड्यांमध्ये एक मोठी पोकळी दिसते या पोकळीला "कॅसिनी डिव्हिजन" असे म्हणतात. या पोकळीतील दोन कड्यांध्ये ४,००० किलोमीटरची पोकळी आहे.
- शनीचा आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात.
- शनी ग्रह आकाराने प्रचंड असला तरी याची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, म्हणजे जर शनी पाण्यात पडला तरी तो त्या पाण्यावर सहज तरंगेल.
- शनीला एकूण सुमारे ६२ चंद्र आहेत. त्यांतले ज्यांची निश्चिती झालेली नाही असे ९ हंगामी चंद्र आहेत.
युरेनस ग्रह
- युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे.
- तो बराचसा वायूंचा बनलेला आहे.
- तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे.
- युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे.
- युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात.
- आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह मार्च १३ १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.
नेपच्यून ग्रह
- नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत बाहेरचा ग्रह आहे.
- या ग्रहाला हिंदीत व मराठीत वरुण असे म्हणतात.
- नेपचून हा दिसायला निळ्या रंगाचा आहे.
- एकूण १३ चंद्र आहेत.
No comments:
Post a Comment