'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात.
पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो. पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत. १. पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. २. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.
अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.
- प्राथमिक लहरी (P Waves)
- दुय्यम लहरी (S Waves)
- पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.
प्राथमिक लहरींची वैशिष्ट्ये:
- भूकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.
- प्राथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते.
- प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात.
- प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात.
- परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.
- प्राथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते.
- प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.
- वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते.
- पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात.
- दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात.
- मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.
पृष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:
- पृथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात.
- या लहरींचा वेग कमी असतो.
- या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते.
- या लहरी अतिशय विध्वंसख असतात.
पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष
- पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.
- भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.
- भाय्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.
- कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा.
- कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.
No comments:
Post a Comment