महत्वाच्या पोस्ट

मराठवाडा मुक्तिसंग्राम

Marathwada Liberation War 

Marathwada Liberation War
Marathwada Liberation War 

मराठवाडा मुक्तिसंग्राम 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैदराबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेल्या संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती . स्वातंत्र्यापूर्वी पासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.  

हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेंव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाडयाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठया प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.

हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा कांही भाग सामील होता.  हैदराबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्यूत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.

मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक

आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाडयाच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाडयात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्हयातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला.  या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.

 पोलीस ॲक्शन 

भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्यांने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैदराबाद संस्थांनावर चारी बाजूनी हल्ले सुरु केल्याने निजामास  सैन्य माघार घेण्यास भाग पाडले.  हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैदराबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी  करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटी विरुध्दचा लढा यशस्वी केला.

(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.