86th Academy Awards
Academy Awards 2014 Nominees |
ऑस्कर पुरस्कारासंबंधी
- ऑस्कर पुरस्कार अर्थात अकॅडमी पुरस्कार हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स अकादमीची स्थापना केली, तसेच ऑस्कर पुरस्कारांचीही सुरुवात केली.
- ऑस्कर अॅवॉर्डची ट्रॉफी ३.५ इंच उंच आणि ८.५ पाऊंड वजनाची ऑस्कर ट्रॉफी असते. एक ट्रॉफी बनवण्याचा खर्च ५०० डॉलर इतका असतो. अशा ५० ट्रॉफीज बनवण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालवधी लागतो.
- ऑस्कर ट्रॉफी तयार करण्याची जबाबदारी शिकागोच्या आरएस ओवस अॅण्ड कंपनीकडे आहे.
- ट्रॉफीला मेट्रो गोडवायन मेयरच्या डायरेक्टर सेड्रिक गिब्सन यांनी डिझाइन केले आहे.
- या ट्रॉफीत एक व्यक्ती तलवार घेऊन चित्रपटाच्या रिलवर उभा आहे. चित्रपटाचे रिल अॅकडमीच्या पाच शाखा अर्थातच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखकांचे प्रतीक आहे.
- ८५ वा ऑस्कर पुरस्कार २०१३
८६ वा ऑस्कर पुरस्कार २०१४
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- मॅथ्यू मॅकॉन्वे (डल्लास बायर्स क्लब-एचआयव्ही-एड्सवर काम करणारे कार्यकर्ते रॉन वूड्रॉफच्या जीवनावर आधारित)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- केट ब्लँचेट (ब्ल्यू जास्मिन)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अल्फान्सो क्युरॉन (ग्रॅव्हिटी)
- व्हिज्युअल इफ्केट्स- ग्रॅव्हिटी
- बेस्ट साऊंड मिक्सिंग- ग्रॅव्हिटी
- बेस्ट साऊंड एडिटिंग- ग्रॅव्हिटी
- बेस्ट सिनेमॅटॉग्राफी- ग्रॅव्हिटी (इमॅन्युअल लुबेझ्गी )
- बेस्ट एडिटिंग- ग्रॅव्हिटी (अल्फान्सो कॉरॉन, मार्क सँगर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- जॅरेड लेटो (डल्लास बायर्स क्लब)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- ल्युपिता नियांगो (12 इयर्स अ स्लेव्ह)
- बेस्ट अॅनिमेटेड फिचर- फ्रोजन
- बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म- हेलियम (अँडर्स वॉल्टर, किम मॅग्नसन)
- बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म- मि. हुब्लॉट
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा- द ग्रेट गॅट्स्बी (कॅथरिन मार्टिन)
- बेस्ट डॉक्युमेंटरी फिचर- 20 फीट फॉर्म स्टारडम
- बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट- द लेडी इन नंबर 6: म्युझिक सेव्ह्ड माय लाईफ
- बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म- द ग्रेट ब्युटी (इटली)
- बेस्ट मेक अप आणि हेअरस्टायलिंग- डल्लास बायर्स क्लब
- बेस्ट ओरिजनल साँग- क्रिस्टन अँडरसन-लोपेझ आणि रॉबर्ट लोपेझ
- बेस्ट ओरिजन स्कोअर- स्टीव्हन प्राइस (ग्रॅव्हिटी)
ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह (12 Years a Slave)
- अमेरिकेच्या इतिहासातील गुलामगिरीचा सर्वात काळाकुट्ट कालखंड दाखवणारा '१२ इयर्स अ स्लेव्ह' ८६व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. दिग्दर्शक स्टीव्ह मॅक्वीनच्या रूपाने कृष्णवर्णीय दिग्दर्शकाच्या चित्रपटाला ऑस्करच्या इतिहासात प्रथमच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. सॉलोमन नॉर्थप यांच्या गुलामगिरीच्या दिवसांतील आठवणींवर आधारित या चित्रपटातील विषय हॉलिवुडने गेली अनेक वर्षे अस्पर्शच ठेवला होता.
- १२ इयर्स ए स्लेव्ह या चित्रपटाला सर्वोत्तम सहायक अभिनेत्री, सवरेत्कृष्ट रुपांतरित पटकथेसह मानाचा सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. कृष्णवंशीय दिग्दर्शकाने ऑस्कर पटकावण्याचा मान पहिल्यांदाच स्टीव्ह मॅकक्वीन यांना मिळाला आहे.
- ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह या चित्रपटाला पुरस्कार मिळणे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे, कारण यापूर्वी कृष्णवंशीय दिग्दर्शकांमध्ये जॉन सिंगलटन यांना बॉयझ इन द हूड्स (१९९१) आणि ली डॅनियल्स यांना प्रेशियस (२००९) या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट गटात नामांकन मिळाले होते.
ग्रॅव्हिटी (Gravity)
३डी स्पेस थ्रिलर ‘ग्रॅव्हिटी’ने सर्वाधिक सात पुरस्कार पटकावले. याच चित्रपटासाठी दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक व संकलनाचा पुरस्कार मिळाला. सँड्रा बुलकची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटास ध्वनी संकलन, साऊंड मिक्सिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी व ओरिजिनल स्कोअर या विभागातही पुरस्कार मिळाले.
No comments:
Post a Comment