महत्वाच्या पोस्ट

मोटार वाहन कायद्यातील तरतूदी

Motor Vehicle Act


 मोटार वाहन कायद्यातील काही महत्वाची कलमे 


  • कलम 122 मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे करणे:- मोटार वाहन चालकाने सार्वजनिक ठिकाणी आपले वाहन उभे करताना इतर वाहन चालकांना धोका, अडथळा किंवा त्रास होणार नाही यांची खबरदारी घ्यावी.
  • कलम 123 पायफळीवरुन प्रवास:- मोटार वाहन चालकाने आपले वाहनाचे पायफळीवरुन कोणासही प्रवास करू देऊ नये. वाहनाचे बाहेर लटकून अथवा वर बसून कोणत्याही इसमास प्रवास करू देऊ नये.
  • कलम 125 चालकास अडथळा:- चालकाने वाहन चालविताना अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे कोणत्याही इसमास बसवू नये अथवा वस्तू ठेवू नये.
  • कलम 126 मोटार वाहन थांबविले असता:- चालकाने वाहन उभे करुन जाताना वाहनाचे इंजिन बंद करावे. वाहन गियरमध्ये ठेवून, हातरोधक लावून ते पूर्ण लॉक करावे. चावी स्वत:जवळ घेवून जावी. टायरला मागे उटी लावावी. जेणेकरुन वाहन आपोआप चालू होणार नाही.
  • कलम 128 दुचाकी वाहनांच्या मागील बाजूस बसणे:- दुचाकी वाहन चालकाने आपले वाहनाचे मागील सीटवर एकापेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत.
  • कलम 130 वाहनाची कागदपत्रे सादर करणे:- वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण नियंत्रण दाखला व आपले ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी जवळ बाळगा आणि गणवेशातील पोलीस किंवा आर.टी.ओ. अधिकाऱ्याने मागितल्यावर त्वरीत सादर करा. व्यावसायिक वाहन असल्यास वरील कागदपत्रांशिवाय परवाना व योग्यता प्रमाणपत्रदेखील जवळ बाळगणे आवश्यक आहे.
  • कलम 134 अपघात घडल्यास चालकाची कर्तव्ये:- अपघातास कारणीभूत झालेल्या वाहनचालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे बंधनकारक आहे व तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्वरीत खबर देणे आवश्यक आहे.
  • कलम 180 ड्रायव्हिंग लायसन्स नसताना वाहन चालविणे:- कायदेशीर गुन्हा असून त्यास 3 महिने कैद, 500 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
  • कलम 181 ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास:- वाहन मालकास 3 महिने कैद, रुपये 1000 दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
  • कलम 185 दारु पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास:- पहिल्या अपराधाबद्दल 6 महिने कैद किंवा दंड रु.2000 किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द होते.
  • कलम 185:- मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 अन्वये रक्तातील मद्याकांची पातळी (बल्ड अल्कोहोल कॉन्सेंट्रेशन ABC) ही 100 मिलीलिटर रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास काद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी रु.2000 दंड किंवा सहा महिने कैद अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 20(2) अन्वये सदर चालकाचे लायन्सेस सहा महिने निलंबित होऊ शकते. तसेच पुन्हा त्याच व्यक्तीने सदर गुन्हा केल्यास 22(2) कलमान्वये लायसेन्स कायमचे रद्द होते.
  • कलम 207 वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार:- ड्रायव्हिंग लायसन्स, परवाना, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसताना चालविण्यात येणारी वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार आर.टी.ओ. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना आहेत.
  • कलम 66 / 192 अ अवैध प्रवासी वाहतूक:- विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम 66 / 192 - अ अन्वये न्यायालयीने कारवाई होऊन रु.5000 पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन 120 दिवसांपर्यत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतूकीस विम्याचे संरक्षण नसते.
  • कलम 138:- सिटबेल्ट न वापरता वाहन चालविणे.
  • महाराष्ट्र मोटार वाहन नियम 250 अ:- वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करु नये.
  • नो फॉल्ट लायबिलिटी, (मोटार वाहन कायदा कलम 140):- मोटार वाहन अपघात एखाद्या व्यक्तीला मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास सदर वाहन चालकाची मोटार वाहन चालकाची काहीही चूक नसली तरी कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस किंवा मृत व्यक्तीच्या वारसदारास सदर वाहनाच्या मालकाला अथवा त्या वाहनाच्या विमा कंपनीस मृत्यूसाठी किमान 50 हजार रुपये व अपंगत्वासाठी किमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई देणे मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 140 अन्वये बंधनकारक आहे. या व्यक्तीरिक्त कलम 163 अ अन्वये अपघातग्रस्त व्यक्तीचे वय आणि वार्षिक उत्पन्न यावर आधारित सुप्रिम कोर्टाने निर्धारित केलेल्या तक्त्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो.
  • अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास:- मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 163 (1) अन्वये केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे ‘सोलॅशियम स्कीम’ (अनुकंपा योजना) तयार केली आहे त्याद्वारे ज्या तालुक्यात अपघात झाल असेल त्या तालुक्याच्या तहसिलदारांकडे सहा महिन्याच्या आत विहित नमुन्यात अर्ज केल्यास सरकारतर्फे मृत व्यक्तिच्या वारसदारास 25 हजार रुपये व गंभीर इजा होणाऱ्या व्यक्तीस 12 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळते.
  • अनावश्यक हॉर्नचा वापर:- चालकाने गरज नसतांना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे(जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्स हॉर्न ) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. सायलेल्स झोनमध्ये(हॉस्पिटल, न्यायालये इ.) हॉर्न वाजविणे गुन्हा आहे.

(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज'


No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.