Vidarbha- Mineral Wealth
Vidarbha- Mineral Wealth |
विदर्भातील खनिज संपदा गुंतवणुकीसाठी पोषक
विपूल खनिज संपदा हे विदर्भाचे वैभव आहे. महाराष्ट्राच्या एकूण खनिज क्षेत्रापैकी 70 टक्के क्षेत्र हे विदर्भात आहे. त्यापैकी नागपूर विभागात 60 टक्के तर अमरावती विभागात 10 टक्के आहे. वन क्षेत्रातील खनिजयुक्त क्षेत्रामध्येही विदर्भ आघाडीवर आहे. विदर्भातील भूगर्भात 68 टक्के खनिज हे जंगलक्षेत्राच्या परिसरात आहे.खनिजावर आधारित उद्योग धंद्यासाठी मध्यभारतामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात अत्यंत पोषक वातावरण आहे. भू-विज्ञान व खनिजकर्म संचालनालयामार्फत खनिज संपत्तीचा शोध घेऊन उद्योगधंद्यांना उपयुक्त असलेल्या खनिजबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येते. कोळसा, चुनखडक, बॉक्साईट, लोहखनिज, क्लेनाईट, सिलिनेनाईट आदी खनिजाच्या संशोधनामुळे आतापर्यंत 7 हजार 474.08 दशलक्षटन साठे अंदाजित करण्यात आले आहेत.
समृद्ध खनिज क्षेत्र असलेल्या विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात कोळाशासह मॅगनिज ओअर, लोहखनिज, कायनाईट, लिलोमेनाईट, पयरोलिलाईट, कॉपर ओअर, क्रोनाईट, डोलोमाईट, वॅनेडियम ओअर, झिक व लेड ओवर, ग्रेनाईट आदी प्रकारचे खनिज मोठ्या प्रमाणत आहे.
विदर्भातील समृद्ध खनिजावर आधारित मोठ्या प्रमाणात उद्योगांना विदर्भात चांगली संधी आहे. कोळसा हे विदर्भातील प्रमुख खनिज असले तरी विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खनिजावर आधारित उद्योगांना चालना मिळणार आहे.
राज्य खनिज धोरण
राज्याच्या आर्थिक विकासात खनिजाचे प्रामुख्याने असलेले महत्व विचारात घेऊन शासनाने भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि विविध खनिजांच्या पूर्वेक्षण कार्याला तसेच खनिज आधारित उद्योगांना विकासाला प्राधान्य दिले आहे.केंद्रशासनाच्या राष्ट्रीय खनिज धोरणाशी सुसंगत राहून राज्य खनिज धोरण 1990 मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये खनिज साठ्याचा शिघ्रतेने शोध घेणे तसेच जास्तीत जास्त खाण उद्योगांना खाजगी क्षेत्रांनी सहभागी करून घेण्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे. खनिज क्षेत्रात पायभूत सुविधा विकसित करण्याला प्राधान्य असल्यामुळे विदर्भात खनिजावर आधारित उद्योगांना चालना मिळण्यास या धोरणामुळे उद्योजकांना आकर्षित करणे सुलभ होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे खाण व खनिज संपत्ती विजनिर्मिती प्रकल्प स्पॉन्ज आयर्न व सिमेंट निर्मीती प्रकल्प यासारख्या मोठ्या उद्योगामध्ये स्वउपयोगाकरीता कोळसा खंडासह इतर खनिज उपलब्ध करण्याची तरतूद केली आहे. त्यानूसार विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा साठे सीबीए अंतर्गत लिजवर वाटप करण्यात आले आहेत.
नागपूर व भंडारा जिल्ह्यातील मॅगनिजच्या 40 खाणी लिजवर वाटप करण्यात आल्या आहे. आयर्न अॅन्ड स्टिल उद्योगांसाठी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील 11 लीज चुनखडकासाठी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात 54 लीज तसेच भंडारा जिल्ह्यात 13 लीज कायनाईट, लिलीमानाईट साठे मंजूर करण्यात आल्या आहेत.
खनिजवार आधारित उद्योग
विदर्भात प्रामुख्याने कोळशावर वीज उत्पादन प्रकल्प सुरू आहेत. सिमेंट उद्योगासांठी लागणाऱ्या चुनखडकारवर आधारित यवतमाळ (एसीसी प्रकल्प) चंद्रपूर जिल्ह्यातील चुनखडकावर आधारित एल ॲन्ड सी, मानिकगड सिमेंट, अंबुजा सिमेंट आणि मुरली इंडस्ट्रिज सुरू आहेत. आर्यन ओवर खनिजावर भंडारा जिल्ह्यातील सनफ्लॅग आर्यन ॲन्ड स्टिल प्रकल्प लॅईटस मेंटलस (वर्धा) महाराष्ट्र इंलेक्ट्रोमेस्ट, लॉईटस, मेटालिक्स ॲन्ड स्टिल, गुप्ता मेटालिक्स, गोपानी आर्यन पावर इंडिया (चंद्रपूर), इस्पात ईन्डस्ट्रिज (कळमेश्वर नागपूर), विरांगना स्टील (नागपूर), चिंतेश्वर स्टील नागपूर, ग्रेज इंडस्ट्रिज, चमन मेटालिक्स आणि सिद्धबली इस्पात (चंद्रपूर) आदी उद्योग सुरू आहेत.खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य शासनाचे असल्यामुळे देशातील उद्योजकांना गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.
No comments:
Post a Comment