महत्वाच्या पोस्ट

विदर्भ- पर्यटन

Vidardh-Development through Tourism

Vidardh Development Through Tourism
Vidardh Development Through Tourism

पर्यटनातून विदर्भ विकास

ॲडव्हॉटेज विदर्भाच्या निमित्ताने पर्यटनातून विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भात वन्यजीव व धार्मिक स्थळाशिवाय इतर पर्यटन स्थळे भरपूर असून पर्यटन विकासातून विदर्भ विकासाला भरपूर वाव आहे.  मेळघाट, ताडोबा, नवेगावबांध, पेंच यासारखी पर्यटन स्थळे देशी-विदेशी पर्यटकांना नेहमी आकर्षित करतात. ताडोबा, व्याघ्र प्रकल्प जागतिक नकाशावर असून या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देतात. महाराष्ट्र शासनाने नवे पर्यटन धोरण जाहीर केल्यामुळे विदर्भ तसेच राज्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळाली आहे. 

ॲडव्हाँटेज विदर्भच्या अनुषंगाने विदर्भ पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकदारांना आकर्षित केल्या जाणार आहे. मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्यास विदर्भ पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकदारांची पहिली पसंती राहणार आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याचा बृहत पर्यटन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून यात वनपर्यटन, कृषी पर्यटन यासोबतच मेडिकल टुरिझमला वाव देण्यात येणार आहे. या नव्या पर्यटन धोरणामुळे गुंतवणुकदारांचा कल मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे असणार आहे. विदर्भात तीन व्याघ्र प्रकल्प, 13 नॅशनल पार्कपासून धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2011 मधील आकडेवारीनुसार विदेशी पर्यटकांची सर्वाधिक पसंती महाराष्ट्रास होती. 

नवीन उपक्रम 

विदर्भातील पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले. सद्या विदर्भ निसर्ग पर्यटनाअंतर्गत 38 कोटीची कामे प्रगतीपथावर आहेत. यात पर्यटन निवास, टेन्ट हाऊस, नेचरलट्रेल व मचान यासारखी पारंपरिक पद्धतीची निवासस्थाने उभारून पर्यटकांना आकर्षित करण्याचा मानस आहे. या ठिकाणीही छोट्या गुंतवणुकदारांना वाव असणार आहे. पेंच, नवेगावबांध, इटियाडोह, ताडोबा, चपराळा, भामरागड, चिखलदरा, मेळघाट, नरनाळा आदी पर्यटन स्थळे पर्यटकांची पहिली पसंती आहे. या ठिकाणी जाण्यासाठी दळण-वळणाची साधने व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील. 1999 साली महाराष्ट्र शासनाने पर्यटनाला इंडस्ट्रीचा दर्जा दिल्यामुळे गुंतवणुकदारांना पर्यटनात गुंतवणुक करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या मेगा सर्कीट कार्यक्रमाअंतर्गत विदर्भात निसर्ग पर्यटनासाठी जवळपास 50 कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. 

वन्य पर्यटनासोबतच विदर्भात धार्मिक व कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. धार्मिक स्थळांना विविध सण व प्रसंगानिमित्त लाखो नागरिक भेटी देतात. या धार्मिक पर्यटनातून विदर्भाच्या पर्यटन क्षेत्रात गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध आहेत. सोबतच कृषी पर्यटनासाठीही विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्यासाठी पर्यटन विभाग कार्यरत आहे. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांसाठी ‘हुनर से रोजगार तक’ ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरु केली आहे.या योजनेत स्थानिक युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येत असल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

विदर्भात 3 व्याघ्र प्रकल्प, 13 राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव क्षेत्र तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासाला मोठा वाव आहे. जागतिक तसेच देशातील पर्यटकांसाठी दळण-वळणासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न सुरु आहेत.त्यासाठी खाजगी गुंतवणुकदारांना आकर्षित केल्या जात आहे. पर्यटन विकासामध्ये खाजगी व व्यावसायिक गुंतवणूक वाढविल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ॲडव्हाँटेज विदर्भ ही परिषद गुंतवणुकदारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.


(MPSC परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे हायलाइट केले आहेत.)


Source: 'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Online MPSC Guidance Designed by Templateism.com Copyright © 2014

Powered by Blogger.