Indian general election, 2014
Indian general election, 2014 |
७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत नऊ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रात मतदान होईल. देशाच्या इतिहासातील सर्वात दीर्घ काळ चालणारी निवडणूक ठरणार आहे.
विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ १ जून रोजी संपत असून ३१ मे पूर्वी नव्या लोकसभेची स्थापना होणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकांसोबतच तेलंगणचा समावेश असलेला आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही विधानसभांचे निकालही 16 मे रोजीच लागणार आहेत. निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिताही अमलात आली.या आधीची, म्हणजे 2009ची लोकसभा निवडणूक 16 एप्रिल-13 मे या काळात व पाच टप्प्यांत झाली होती.
एकूण टप्पे : नऊ
- पहिला टप्पा: ७ एप्रिल, दोन राज्ये
- दुसरा टप्पा: ९ एप्रिल, पाच राज्ये
- तिसरा टप्पा: १० एप्रिल, १४ राज्ये
- चौथा टप्पा: १२ एप्रिल, तीन राज्ये
- पाचवा टप्पा: १७ एप्रिल, १३ राज्ये
- सहावा टप्पा: २४एप्रिल, १२ राज्ये
- सातवा टप्पा: ३० एप्रिल, ९ राज्ये
- आठवा टप्पा: ७ मे, १२ राज्ये
- आठवा टप्पा: १२ मे, ३ राज्ये
- मतमोजणी : १६ मे रोजी
या वर्षीच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये
- ८१.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार
- ८ लाख मतदान केंद्रे
- १२ लाख मतदान यंत्रे
- गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदार केंद्रांची संख्या 12 टक्क्यांनी वाढली
- उमेदवारांना नाकारण्याचा 'नोटा'चा पर्याय प्रथमच मिळणार
- देशाच्या इतिहासातील सर्वात दीर्घ निवडणूक
- विभाजनानंतर आंध्र प्रदेशात प्रथमच निवडणुका होणार
- गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 कोटी मतदार वाढले
- मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी 9 मार्चला राबविण्यात येणार विशेष मोहिम
- 98.6 टक्के मतदारांकडे ओळख पत्र
- १८ ते ३० वयोगटातील २.३ टक्के मतदार
- खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यंवेक्षक
महाराष्ट्र
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. १० एप्रिल, १७ एप्रिल आणि २४ एप्रिलला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
- १० एप्रिल २०१४
दहा मतदारसंघ
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
- १७ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- २४ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड.
No comments:
Post a Comment